ह्या समस्या तुम्हाला लग्नानंतर आहेत का? असतील तर काय कराल !

एकमेकांसाठी त्याग, समजूतदारपणा, मदत, थोडा धीर, कौतुकाचे चार शब्द आणि आदर हा कोणत्याही दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा मुलभूत पाया आहे. जसे जसे तुमचे नाते बहरत जाते तसे तसे तुम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी नव्याने कळत जातात आणि तुम्ही एका उत्तम साथीदार बनण्याचा नेहमीच प्रयत्न करत असता.

पण तुमचा हा प्रवास सरळ आणि सोप्पा नसतो. प्रत्येक व्यक्ती मध्ये काही कमतरता असतेच आणि कोणत्याही दोन व्यक्ती पूर्णपणे सारख्या असू शकत नाहीत. या कारणामुळे मजबूत नात्यांमध्येही अनेकदा खटके उडतात, मतभेद होतात. तुमच्या नात्यांमध्ये उद्भवणारे नेहमीचे मतभेद आणि अशावेळी समस्या सोडवण्याचे उपाय इथे देत आहोत.

१) एकमेकांना मदत


तुमच्यात एकमेकांविषयी केलेल्या कामाची दखल घेण्याची किंवा त्याबद्दल कौतुक करण्याची कमतरता असू शकते. पत्नीची तिच्या नवऱ्याकडून अपेक्षा असते की तिला घरकामात त्याच्याकडून थोडी मदत व्हावी. जर तीपण नोकरी करत असेल तर कामावरून घरी येऊन सगळी कामे तिलाच करावी लागल्याने तिच्याकडून तक्रारी येत राहतात. पत्नी नोकरी करत नसेल तर घरातला पसारा नवऱ्यालाही सहन होत नाही आणि त्याची अपेक्षा असते की तिनेच घरातली सगळी कामे करावीत.

उपाय :

अशावेळी तुमच्यात घरातल्या कामाची आणि जबाबदाऱ्यांची वाटणी होणे गरजेचे आहे, असे केल्याने कोणावरच कामाचा ताण येणार नाही. काही खटकले असेल तर त्याविषयी लगेच चर्चा करा अशा भावनांचा जास्त विचार करून मनात धरून ठेवणे तुम्हाला पडवरणारे नाही. जी कामे तुम्हाला करायची आहेत किंवा तुमच्या साथीदाराला करायची आहेत याची एक लिस्ट बनवा. दोघांना करायला नकोशी वाटणारी कामे तुम्ही आळी-पाळीने करू शकता. तक्रार करण्याऐवजी समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रित करा.

२) कामाचा ताण


तुम्हाला एखादा आठवडा किंवा महिनाभर कामाचे ओझे असेल आणि तुम्ही व्यग्र असणार असाल तर तुम्हाला त्यामुळे मानसिक ताण येतो, चिडचिड होते. अशावेळी आपण समोरच्याला नको ते बोलून जातो. आपल्याला जे म्हणायचे असते ते योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही आणि गैरसमज होतात.

उपाय :

यावर पुन्हा एकदा हाच तोडगा आहे तो असं की एकमेकांशी योग्य संवाद हवा. तुम्हाला कामाचे किती ओझे आहे आणि तुम्ही आता किती काळ बिझी राहणार आहात याची तुमच्या जोडीदाराला कल्पना दया. तुम्हाला घरी आल्यावर काय करायचे आहे हे सांगा. तुमचा मूड नसेल किंवा तुम्हाला आराम करावासा वाटत असेल तर सरळ तसे सांगा.

३) खूप व्यवहारी


अनेक जोडप्यांमध्ये पैशावरून भांडणे होतात. दोघांपैकी एक पैशांबद्दल अतिजागरूक असेल आणि दुसरा विचार न करता पैसे खर्च करत असेल तर पैशांवरून खटके उडतात. पैसे कसे खर्च करायचे याविषयीचे मतभेद तुमच्यात एकमेकांच्या निर्णयाबद्दल राग निर्माण करतात. आर्थिक परिस्थिती सांभाळणे दोघांनाही अवघड जाते.

उपाय :

या परिस्थितीला तुम्ही दोघांनी एक टीम होऊन तोंड दिले पाहिजे. एक परिवार म्हणून या आर्थिक परिस्तिथीकडे बघायला हवे. यात तुमच्या मुलांसाठी काढलेले शैक्षणिक कर्ज असू शकते, घर, गाडी, हॉलिडे , निवृत्तीसाठी जमवाजमव असेल. धोघाने बँकेत एक जॉइंट खाते उघडा आणि त्यामध्ये दोघांनी जमवलेले पैसे टाकायचे असे ठरवून घ्या. उरलेले पैसे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणासाठी वापरू शकता. आपल्या सगळ्या खर्चांवर लक्ष ठेवा आणि यासाठी नियोजन करा.

४) एकमेकांशी संवाद


अनेकदा होणारे भांडणे ही एकमेकांशी पुरेसा संवाद न घडल्याने आणि त्यातून होणाऱ्या गैरसमजामुळे होतात. तुम्ही कदाचित तुमच्या जोडीदाराशी बोलत असाल पण त्यामागील त्याचे किंवा तिचे उद्देश तुम्हाला कळले नसतील अथवा तुमच्यातील अंतरामुळे तुम्हाला समजून घेण्यास अडचण येत असेल तर यातून गैरसमज उद्भवतो. एकमेकांशी बोलण्याची इच्छा कमी झाल्याने अशा प्रकारचे निरस बोलणे घडते.

उपाय :

एकमेकांना सामोरे जा. तुमच्या घरातच एकमेकांसमोर बसून जे काही सांगायचे-बोलायचे आहे त्याची चर्चा करा. मुले घरी असतील तर त्यांना झोपवा किंवा आजी-आजोबांकडे पाठवा. एकमेकांशी मते स्पष्ट करून घेण्याची आणि गोष्टी सोडवण्याची हीच वेळ आहे. बोलतांना एकमेकांचे आधी पूर्ण ऐकून घ्या आणि स्वतःचे मत स्पष्टपणे मांडा. चर्चेतून तोडगा नक्की निघेल.

५) शंका असल्यास


एकमेकांवर संशय घेणे आणि अविश्वास हे आजकाल जोडप्यांमधील भांडणाचे सगळ्यात मोठे कारण असते. तुम्ही इतर कोणाशी मानसिक पातळीवर संबंधित असाल किंवा शारीरिक, विवाहबाह्य संबंध असणे ही एकमेकांची फसवणूकच आहे. ह्या गोष्टी हाताळणे खूप अवघड असते. यातून एकमेकांविषयी विश्वास आणि नातेसंबंधांचा मूळ पायाच ढासळतो.

उपाय :

अविश्वासाला सामोरे जाणे हाच एक उपाय असतो. जर तुम्ही तुमच्या साथीदाराची फसवणूक करत असाल तर त्याला किंवा तिला हे बाहेरून कळण्याआधीच प्रामाणिकपणे सांगून टाका. जर तुमच्या जोडीदाराचे बाहेर संबंध असतील तर तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे हे त्याला किंवा तिला सांगा. यानंतर पुढची पायरी तुम्ही दोघेमिळून ठरवू शकता. जर तुम्हाला तुमच्या नात्याला अजून एक संधी द्यायची असेल तर यापुढे एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवून नात्यातील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करा .एकेमकांविषयी पुन्हा नव्याने विश्वास संपादन करणे हे खूप धीराचे काम आहे. यासाठी बराच वेळ लागू शकतो. शेवटी निर्णय हा तुमच्या दोघांचा असणार आहे.

६) मुलांच्या बाबतीत 


तुमच्या दोघांपैकी एकाला मुलांना कडक शिस्त असावी असे वाटत असेल आणि दुसऱ्याला मुलांचे संगोपन हे मोकळ्या मनाने व्हावेसे वाटत असेल किंवा संगीत शिकवायचे कि खेळात करिअर करू द्यायचे याविषयी तुमची मते भिन्न असतील. या कारणांमुळे अनेकदा संगोपन कसे करावे यातील मतभेदातून भांडणे होतात.

उपाय :

या प्रश्नावर तत्काळ काहीही प्रतिक्रिया देण्याआधी एक दीर्घ श्वास घ्या. तुमच्या जोडीदाराचे बोलणे पुर्णपण ऐकून घ्या. मुलांसाठी गाणे शिकणे योग्य आहे की एखाद्या खेळात रस घेणे फायद्याचे आहे हे ठरवतांना मुलांच्या कलाकडे देखील लक्ष दया. मुलांना काय आवडते आणि काय नाही याबद्दल त्यांचेही मत जाणून घ्या. कोणताही निर्णय घेण्यासाठी त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू पडताळून पहा. तुमचे मत मांडतांना त्याची कारणे आणि भविष्यातील फायदा समजावून सांगा. आणि दोघे मिळून निर्णय घ्या.  खरं म्हणजे तुमच्या समस्या ह्या तुम्हालाच चांगल्या माहित असतात पण काहीवेळा त्याच्यावर वरती दिलेल्या काही गोष्टींचा उपयोग होऊन मतभेत मिटत जातात. आणि तुमचा संसार आनंदी होतो. त्यासाठी संवाद घडू द्या एकेमकांत भांडण नाही.   

Leave a Reply

%d bloggers like this: