गर्भावस्थेत मधुमेहापासून कसे दूर राहाल ?

सुदैवाने तुमची गर्भावस्थेची चाचणी सकारात्मक आली आहे किंवा मूल होऊ देण्याचा तुमचा मानस आहे तर मग मधुमेहा सारख्या व्याधीपासून दूर राहावे असे तुम्हाला नक्कीच वाटत असेल. आजच्या काळात, ३०% हून अधिक लोकांमध्ये मधुमेह आढळतो आणि ६५% महिलांना गर्भावस्थेत होणाऱ्या मधुमेहाचा धोका असतो. मधुमेहाचा हा प्रकार मधुमेह टाईप -२ मध्ये येतो ज्यात होणाऱ्या आईच्या शरीरात स्रवणाऱ्या संप्रेरकांमुळे इन्सुलिन तयार होण्यात अडथळा येतो आणि याचाच परिणाम म्हणजे शरीरात साखरेचे वाढलेले प्रमाण ज्याला आपण मधुमेह म्हणून ओळखतो.

गर्भावस्थेत होणारा हा मधुमेह बरेचदा बरा होतो किंवा बाळाच्या जन्मानंतरही कायमस्वरूपी राहू शकतो. गर्भावस्थेत मधुमेह असणाऱ्या आईच्या होणाऱ्या बाळाला टाईप १ या प्रकारचा मधुमेह असण्याची शक्यता असते.घाबरून जाऊ नका ,आम्ही तुच्या साठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्याने तुमची गर्भावस्था,कोणतीही गुंतागुंत नसलेली आणि अगदी आनंदी असेल त्याचबरोबर तुम्ही गरोदरपणातील मधुमेहापासू स्वतःला दूर ठेऊ शकाल.

आपण गर्भावस्थेची दिनदर्शिका (प्रेगनेन्सी कॅलेंडर ) आणि गर्भावस्थेचे मापक (प्रेगनेन्सी कॅलकुलेटर) अशा काही विशिष्ट तंत्राचा वापर करून मधुमेहापासून कसा बचाव करावा त्याच बरोबर गरोदरपणातील आणि बाळाच्या जन्मानंतर होणाऱ्या धोक्यांचा सामना कसा करावा हे जाणून घेऊ. 

पायरी १ मधुमेह विषयक सामान्य माहिती/जागरूकता

 

१. या आजाराबद्दलची माहिती घेणे 

 या आजाराशी संबंधित घटकांचा विचार करतांना सर्व माहिती मिळवणे हि पहिली पायरी असायला हवी. मूल होऊ देण्यासाठी प्रयत्न करत असतांना किंवा गर्भावस्थेची सुरवातीची लक्षणे जाणवताच तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि मधुमेहाच्या टाईप १ आणि टाइप २ या प्रकारातील फरक जाणून घेण्याचा प्रयत्न करा.याने तुम्हाला तुमच्या संपूर्ण गरोदरपणात काय काळजी घ्यायची हे समजेल.

२. आजाराशी संबंधित कुटूंबाचा पूर्व इतिहास 

गर्भावस्थेत जाणवणारी सुरवातीची लक्षणे जाणवताच तुमची गुणसूत्रीय माहिती गोळा करा आणि तुमच्या बाळाच्या गुणसूत्रांवर परिणाम करू शकणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचीही माहिती असू द्या. मधुमेहाशी संबंधित तुमच्या कुटुंबाचा पूर्व इतिहास पूर्णपणे माहित केल्यानेच तुमच्यात मधुमेहाला बळी पडण्याची सहजवृत्ती आहे कि नाही हे कळू शकेल. मधुमेह असणारा नातलग जितका तुमच्या जवळच्या नात्यातील असेल तेवढाच तुमच्या बाळाला मधुमेह असण्याचा धोका असू शकतो. तसेच,टाईप २प्रकारच्या मधुमेहात तुम्हाला आणि तुमच्या बाळाला कमी धोका असतो ,तेव्हा तुम्हाला टाईप २ मधुमेह होण्याचा धोका किती आहे हे जाणून घ्या.

३. तुमचे आरोग्य आणि शरीरप्रकृती 

 तुम्हाला आताच्या गर्भावस्थेत मधुमेहाचा धोका आहे किंवा नाही हे पूर्वीची गर्भावस्था आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारे इतर घटक यांवर अवलंबून असते. तुमचे वय हा सर्वात पहिला आणि महत्वाचा घटक ठरतो,तुमचे वय २५ पेक्षा जास्त असेल तर आजाराचा धोका थोडा जास्त असू शकतो. तुम्ही गरोदर झाल्यानंतरचे तुमचे वजन आणि जर तुम्ही मुलं होण्यासाठी प्रयत्न्य करताय तर सध्याचे वजन हे भूमिका पार पाडतात. वजनावर लक्ष ठेवा आणि गर्भावस्थाची दिनदर्शिका हाताशी असू द्या जेणेकरून भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकेल. आरोग्यावर परिणाम करणारे इतर काही घटक म्हणजे,PCOs (पॉलीसिस्टिक ओव्हरीज) ,या पूर्वी साखरेचे शरीरातील असामान्य प्रमाण,आधीच्या गर्भावस्थेत मधुमेह असणे आणि आधीच्या प्रसूतीमधील बाळाचे वजन जास्त असणे, किंवा गर्भात असतांना बाळ मृत पावणे.

४. गर्भावस्थेतील तुमचे स्वतःचे नियोजन

मधुमेहाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वीच स्वतः गर्भावस्थेशी संबंधित सर्व गोष्टींची आखणी करणे आणि गर्भावस्थेची दिनदर्शिका तयार करणे या गोष्टी नक्की करा.सर्व स्त्रिया गर्भावस्थेदरम्यान,गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेसोबतच गर्भावस्थेच्या मापकाचाही वापर करतात पण याचा वापर मूल होऊ देण्यासाठीचे प्रयत्न कारण्याअगोदरच करा. याची योजना तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून किंवा अगदी घरी सुद्धा तीन महिन्यातून एकदा साखरेची तपासणी करून,बनवू शकता. तुमची गर्भावस्थेची चाचणी झाल्यानंतर येणाऱ्या काळात करावयाच्या उपायांची माहिती मिळवण्यासाठी गर्भावस्थेचे मापक खूप सहाय्यक ठरते. गर्भावस्थेतील त्रासांकडे वेळीच लक्ष द्या जेणेकरून या अवस्थेत होणाऱ्या पुढील अडचणीचा सामना करणे तुम्हाला सोपे जाईल. वजन जास्त असणे हि देखील गरोदरपणात आजारांना आमंत्रण देणारी बाब ठरते.वजन कमी करण्याचा प्रयत्न्य अवश्य करा आणि या गोष्टीची नोंद गोष्ट तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेमध्ये जरूर करा.

पायरी क्रमांक २ -वैद्यकीय तपासणी 

 

गर्भावस्थेशी संबंधित सुरुवातीची लक्षणे जाणवताच डॉक्टरांकडून केल्या जाणाऱ्या वैद्यकीय तपासणीमधूनच तुम्हाला मधुमेहाचा धोका आहे की नाही हे स्पष्ट होते. तुमच्या सर्व शंकाचे समाधान आणि कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी करणे गरजेचे आहे याची कल्पना तुम्हाला या चाचण्या केल्यानंतरच येते.

१. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ

गर्भावस्था नक्की होताच तुमच्या डॉक्टरांना लवकात लवकर भेटा. या काळात तुमचे डॉक्टर हेच तुम्हाला गर्भावस्थेच्या दिनदर्शिका आणि सर्व गोष्टीबद्दलचे योग्य मार्गदर्शन करू शकतात. जेव्हा तुम्ही गर्भावस्थेत डॉक्टरांना पहिल्यांदा तेव्हाच तुमची मधुमेहासाठीची चाचणी आणि इतर वैद्यकीय तपासण्या करून घ्या.तुम्हाला साखरेची तपासणी करायला सांगितली नसेल तरीही डॉक्टरांना याबद्दलच्या लक्षणांची माहिती विचारून घ्या . याने तुमचा गर्भावस्थेतील मधुमेह टाळला येऊ शकतो.कुटुंबात असणाऱ्या मधुमेहाच्या पूर्व इतिहासाची कल्पना डॉक्टरांना द्या,ते तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवणाऱ्या उपचार नक्कीच सुरु करतील.

२. तपासणी

गर्भावस्थेच्या चाचणीनंतर लगेचच करायची चाचणी म्हणजे साखरेची तपासणी करणे जिला ‘इनिशियल ग्लुकोज चॅलेंज ‘ म्हणतात आणि यानंतर केली जाणारी दुसरी चाचणी म्हणजेच ‘ग्लुकोज टॉलरन्स टेस्टिंग ‘ पहिल्या चाचणीमध्ये साखरेच्या द्रावाचे सेवन करून एका तासानंतर तपासणी केली जाते तर दुसऱ्या चाचणीमध्ये आदल्या रात्री काहीही ना खाता सकाळी रक्तातील साखरेची तपासणी केली जाते. या चाचण्या केल्या नंतर दोन गोष्टी निश्चित केल्या जाऊ शकतात.एक म्हणजे, तुम्हाला मधुमेहाचा धोका आहे का आणि दुसरे म्हणजे, रक्तातील साखरेचे नियंत्रण कश्या प्रकारे केले जाऊ शकते. या दोन चाचण्याना तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेमध्ये अग्रक्रम द्या कारण याने तुमच्या साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवले जाईल.

पायरी क्रमांक ३ मातेचा आहार

गर्भावस्थेचे सुरुवातीचे दिवस ते तुमच्या बाळाचा जन्म या पूर्ण काळात तुमच्या आहाराची खूप मोठी भूमिका असते. गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी तुमचा आहार कसा असायला हवा हे समजून घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे गरजेचे आहे. तुमच्या आहाराच्या तक्त्यात खालील गोष्टींचा समावेश करा आणि गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेमध्ये यांस स्थान द्या.

१.  तंतुमय पदार्थांचा समावेश

तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेत, आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करणे हि पहिली पायरी असायला हवी.गर्भावस्थेत तंतुमय पदार्थांचे सेवन करण्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे सोपे जाते. ज्या स्त्रियांना मधुमेहाचा धोका जास्त प्रमाणात आहे त्यांनी आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवल्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाचे प्रमाण २६% नि कमी होते. गर्भावस्थेच्या आधी आणि त्या दरम्यान असा आहार घेण्याने साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण येते. भाज्या,फळे ,धान्य इ . चा समावेश तंतूमय पदार्थांमध्ये होतो.

२. प्रथिनांचा समावेश करणे

एका स्वस्थ गर्भावस्थेसाठी आहारात प्रथिनांचा समावेश करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या शरीरात स्नायू अधिक प्रमाणात तयार होतात आणि शरीराला जास्त ऊर्जा मिळते. तसेच चरबीचे प्रमाण कमी होते. जीवनसत्व ब च्या सेवनाने बाळात दोष निर्माण होण्यात आळा बसतो. सर्व डाळी,चिकन आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिने असतात. 

३. आहाराचे प्रमाण

मधुमेहाचा धोक्याचे प्रमाण आणि नियंत्रण ठेवण्यात तुमच्या आहाराचे प्रमाण किती आहे याने खूप मोठा फरक पडतो.गर्भावस्थेत आहाराचे प्रमाण संतुलित ठेवणे डॉक्टरांकडून सुचवले जाते. तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेत खाण्याच्या प्रमाणाच्या तक्त्याचा समावेश करा कारण तु किती खाता याचा परिणाम थेट तुमच्या इन्सुलिन वर होत असतो. जास्त प्रमाणात खाणे,दोन जेवणाच्या मध्ये थोडेसे खाणे अयोग्य आहे.अशा अनियंत्रित खाण्यामुळे तुमच्या साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या दिवसभराच्या खाण्यातील कॅलरीजचे प्रमाण १५०० ते २००० ठेवा ज्याला तुम्ही ३ ते ४ खाण्यात विभागु शकता,म्हणजेच एका खाण्यातून तुम्हाला ३०० ते ४०० कॅलरीज मिळतील. तुम्ही किती आहार घेत आहात याचा तक्ता बनवून गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेत समाविष्ट करा,म्हणजे खाण्यातील चुका टाळता येतील.

४. टाळता आणि करता येण्यासारख्या काही गोष्टी ( पथ्य )

तुमच्या आहारात चरबीयुक्त आणि तळलेल्या पदार्थांचा समावेश टाळा,कारण अशा खाण्याने तुमचे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढू शकते आणि गर्भावस्थेतील मधुमेह होण्याचा धोका असू शकतो. गर्भावस्थेआधी तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि PMS ची लक्षणे टाळण्यासाठी अपायकारक खाणे टाळा. या सर्व गोष्टींची नोंद गर्भावस्थीच्या दिनदर्शिकेत करा.फळांचा समावेश तुमच्या आहारात विशिष्ट प्रमाणात असू द्या कारण काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते अशा फळांना खाणे टाळा. साखरेशिवाय बनवलेल्या फळांचे रस तुम्ही घेऊ शकता. पांढऱ्या रंगांचे पदार्थ म्हणजेच पिष्टमय पदार्थ,साखर ,पीठ यांना थोड्या प्रमाणात आहारात स्थान दया. या मुले तुमच्या साखरेचे प्रमाण लगेचच वाढू शकते. तुमच्या शरीरातील साखरेचे वाढलेले प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणता आहार योग्य आहे हे तुमच्या शरीरप्रकृतीवर अवलंबून असते.अशा आहार आणि पदार्थांची नोंद तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेत नक्की करा ज्याचा उपयोय तुमच्या पुढील गर्भावस्थेत आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी होईल

पायरी क्रमांक ४ व्यायाम

व्यायाम करणे गर्भावस्थेतच नव्हे तर त्या अगोदरही आवश्यक असते. गर्भावस्थेतील मधुमेहापासून दूर राहण्याच्या तुमच्या या मोहिमेचा एक भाग म्हणून व्यायामाच्या रोजच्या नेमाचा आणि तक्त्याचा समावेश गर्भावस्थेच्या दैनंदिनीमध्ये करा.

१. व्यायाम करणे सुरु करा.

गर्भावस्थेत आणि त्या आधीपासून व्यायाम करण्याने गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका आश्चर्यकाररित्या कमी होतो. व्यायाम करणाऱ्या स्त्रियांमध्ये ७०% पर्यंत कमी प्रमाणात मधुमेहाचा धोका टाळला जातो. गरोदरपणाआधी व्यायामाला सुरुवात करणे केव्हाही सोपे असते पण प्रसूतीनंतर व्यायाम सुरु करण्या बद्दल डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

२. व्यायामाचे स्वरूप

प्रसूतीनंतर केल्या जाणाऱ्या व्यायाम प्रकारात काही हलक्या कसरतीचा जसे कि चालणे,पोहणे याचा समावेश होतो. आठवड्यातून जास्तीत जास्त दिवस आणि दरवेळी ३० मिनिटांच्या चालण्याने तुम्ही कार्यक्षम तर रहालच तुमची अनावश्यक चरबीही कमी होईल ,ज्याने मधुमेहाचा धोका हि घटेल. कोणतेही मैदानी खेळ किंवा मेहनतीचे व्यायाम प्रकार टाळा. 

तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेत वरील उपायांचा समावेश करून,गर्भावस्थेपासून ते प्रसूतीपर्यंत तुम्ही मधुमेहापासून स्वतःचा बचाव करू शकता. तुम्हाला आता तणावमुक्त राहणे अगदी सोपे आहे कारण तुमच्या गर्भावस्थेच्या दिनदर्शिकेच्या साहाय्याने प्रत्येक गोष्टीचे नियोजन सहजतेने होऊ शकते.

Leave a Reply

%d bloggers like this: