बाळांमधील फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय ?

आपण एका नव्या जीवाला जन्म दिला आहे ही भावनाच मुळी आश्चर्याची आहे. हे विस्मयकारक आहे, नाही का? बाळा जन्माला आल्यावर आपण सर्व गोष्टी तपासता- हाताची १० बोटे, पायाची १० बोटे, एक गोंडस छोटेसे नाक, गुलाबी ओठ आणि डोळे जे उत्सुकतेने तुमच्याकडे पाहत असतात. आपल्या बाळाच्या डोक्याचा आकाराबाबत देखील जागरूक असणे गरजेचे आहे. काही बाळामध्ये फ्लॅट हेड सिंड्रोम आढळतो. हा फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय कश्यामुळे होतो हे आपण पाहून आहोत

फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय

फ्लॅट हेड सिंड्रोम, याला प्लॅगीयोसेफली असेही म्हणतात ज्यामध्ये बाळाच्या डोक्याचा आकार अनियमित असू शकतो किंवा डोक्याचा भाग सपाट होवू शकतो. जन्मा दरम्यान बाळाच्या डोक्याला मिळालेल्या दाबामुळे हा फ्लॅट हेड सिंड्रोम निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे थोडक्यात बाळाच्या डोक्याचा आकार हा इतर सामान्य बाळांपेक्षा सपाट असणे

करणे आणि त्यावरून पडणारे प्रकार

१.जन्मा दरम्यान बाळाच्या डोक्याला मिळालेल्या दाबामुळे हा फ्लॅट हेड सिंड्रोम निर्माण होण्याची शक्यता जास्त असते

२. नवजात अर्भकांमध्ये मानेचे स्नायू कमकुवत असतात त्यामुळे ती प्रत्येक वेळी एकाच स्थितीत झोपतात आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या मऊ कवटी वर दबाव येतो आणि परीणामी डोके सपाट होते. याला पोजिशनल प्लॅगियोसेफली असे म्हणतात.

३. कधीकधी बाळांना गर्भाशयात हालचाल करण्यास कमी जागा असते तेव्हा बाळांमध्ये पोजिशनल प्लॅगियोसेफली विकसित होते. जेव्हा आई, जुळ्या किंवा तीन अपत्यांना जन्म देणार असते किंवा गर्भस्थ भ्रूण उलट्या स्थितीमध्ये असतो तेव्हा हे घडते.

फ्लॅट सिंड्रोम आहे की नाही ?

बाळाने जर जन्मादरम्यान फ्लॅट स्पॉट विकसित केला तर डॉक्तरांच्या हि गोष्ट लक्षात आणून द्यावी. ही स्थिती सामान्यतः 6 आठवड्यात स्वतःच ठीक होते. जर 6 आठवड्यानंतर फ्लॅट स्पॉट अस्तित्वात असेल तर कदाचित ही स्थिती पोजिशनल प्लॅगीओसेफली असण्याची शक्यता असते . जर आपले बाळ खूप झोपत असेल तर आपल्या बाळाच्या फ्लॅट स्पॉट होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु सर्वच बाळांच्या डोक्याचा आकार एकसमान नसतो पण याचा अर्थ असा नाही की ती सर्व फ्लॅट हेड सिंड्रोम ने ग्रस्त आहेत. जेव्हा बाळे ही लहान असतात तेव्हा ही स्थिती ठीक करणे सोपे असते.

फ्लॅट हेड सिंड्रोम कसा टाळावा?

१. जेव्हा आपले बाळ निद्रावस्थे मध्ये असेल तेव्हा आपण प्रत्येक तासाला हळूवारपणे त्याच्या डोक्याची स्थिती बदला जेणेकरून त्याच्या डोक्यावर एकाच ठिकाणी दाब येणार नाही.

२. आपले बाळ जेव्हा जागे असते तेव्हा त्याला पलंगावर न ठेवता आपल्या कडेवर किंवा कुशीत घ्या. त्यामुळे आपल्या बाळाचे डोके घन पृष्ठभागाच्या संपर्कात येण्याची वेळ मर्यादित राहील.

३. आपल्या बाळाची झोपण्याची ठिकाणे प्रत्येक वेळी बदलत रहा. लहान मुलांचा पलंग, आच्छादनयुक्त पाळणा, झोका आणि पलंग यांसारखे विविध पर्याय आहेत. त्यांची झोपण्याची ठिकाणे बदलत राहील्यामुळे डोक्याच्या एका विशिष्ट जागेवर दाब कमी येईल.

४. जेव्हा आपले बाळ निद्रिस्त अवस्थेत असेल तेव्हा त्याला तुमच्या छातीवर झोपवू शकता द्या. अशाप्रकारे आपल्या बाळाच्या स्नायूंना डोक्याचे वजन संतुलित करण्याची गरज पडत नाही.

५. आपल्या बाळाला दररोज काही मिनिटांसाठी पोटावर पहूडू द्या पण खात्री करा की तिथे पुरेसे श्वसन क्षेत्र आहे आणि या काळात आपल्या बाळा जवळच उपस्थित रहा.

६. आपल्या बाळाला स्तनपान करताना फ्लॅट स्पॉटवर दबाव टाळण्यासाठी सतत त्याची स्थिती बदलत रहा.

Leave a Reply

%d bloggers like this: