तुमचे बाळ गर्भाशयात असताना या गोष्टी करत असते

                 प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपणा हा तिच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा काळ असतो. तुम्ही आई होणार आहात ही जाणीव तुमच्या मनाला विलक्षण आनंद देत असते आणि तुमच्या गोंडस नव्या बाळाला कडेवर घेऊन हे जग दाखवण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असता, आम्हाला माहित आहे !

आईला तिच्या गर्भात सुरक्षित असणाऱ्या बाळाची जाणीव व्हायला लागली की त्या बाळाच्या प्रत्येक हालचालींबद्दल तिला उत्सुकता लागून राहते. बाळ आता काय करत असेल? त्याचे काय काम चालू असेल? बाळाला आपले बोलणे कळते का? मी गाते आहे ते गाणे बाळाला आवडते आहे का? असे अनेक प्रश्न आईला पडतात. हे आईचे आणि बाळाचे एकमेकांसोबतचे क्षण खूप किमती असतात. सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे बाळ जेंव्हा पोटात लाथ मारते. त्याने लाथ मारली की खरेतर त्याच्या योग्य वाढीची आणि निरोगी आरोग्याची खात्रीच आईला मिळत असते.

१) तुमचे बाळ त्याचे पुरुषत्व घेते

ही गोष्ट बाळ स्वतः हून करत नाही कारण ती आपोआप त्याच्यासोबत घडते. गर्भधारणा झाल्याच्या ५-६ आठवड्यात गर्भातले अर्भक जर झाले तर Y –गुणसुत्राशी संलग्न होते. तुमच्यातल्या x गुणसुत्राचे Y गुणसुत्राशी संलग्न होणे बाळाचे स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग ठरवते.

२) तुमच्या बाळाची हालचाल

१२ आठवडे पूर्ण झाल्यावर गर्भातले बाळ केवळ २ इंचाचे असते. त्याचे विकसित झालेले हात, पाय आणि छोटी छोटी बोटे यामुळे ते हालचाल करू लागते. तुम्हाला हे आत्ताच जाणवणार नाही पण त्याची हालचाल आतापासूनच सुरु होते.

३) तुमचे बाळ डोळे मिचकावते

गर्भात असलेल्या अंधारामुळे बाळाला काही दिसत नसले तरीही बाळ गर्भातच डोळे मिचकावते. त्याचे डोळे विकसित झालेले असतात तेंव्हा त्यांची उघडझाप चालू असते.

४) तुमचे बाळ स्मितहास्य करते

तुमच्या बाळाला तुमचा आवाज ऐकू जातो. तुमचा आवाज ओळखीचा झाला की ते तुम्हाला ओळखू लागते आणि हा ओळखीचा आवाज त्याला ऐकू आला कि त्याच्या चेहेऱ्यावर हसू येते! हो, तुमचे बाळ जन्मले नसले तरीही त्याला तुम्ही आत्तापासूनच आवडता. तुमच्या गोड आवाजात त्याच्यासाठी काही छान छान गाणी म्हणा, ते तुम्हाला ऐकतच आहे.!

५) बाळ जांभई देते

बाळ गर्भात असतांना गर्भातील अॅम्निओटीक द्रवांमध्ये तरंगत असते पण त्यालाही जांभई येते. जांभई येणे ही मेंदूला ऑक्सिजन कमी पडत असल्याने घडणारी क्रिया आहे. बाळ तुमच्याद्वारे श्वास घेत असले तरीही त्याला बाहेर आल्यावर या परिस्थितीतला अशीच प्रतिक्रिया द्यावी लागते म्हणून गर्भात देखील असेच घडते.

६) बाळ शरीर ताणते

बाळाचे स्नायू जसे जसे त्याच्या शरीरात विकसित होतात तसे बाळ त्या स्नायूंची गर्भाशयातच तपासणी घेते आणि आपले हात पाय ताणून पाहते. ५ महिन्याचे बाळ ६ इंच लांब असते आणि आता तुमच्या पोटाला आलेला आकार वाढून तुम्हाला त्याच्या हालचाली जाणवू देखील लागलेल्या असतात.

७) तुमचे बाळ अंगठा चोखते

गर्भाशयातील द्रवामुळे बाळाला काही गिळता येईल किंवा सरळ त्याच्या तोंडाद्वारे आत जाईल असे काही नसते. परंतु बाळ अंगठा मात्र चोखू शकते. बाहेर आल्यानंतर स्तनपानासाठी दुध पिण्यासाठी त्याचा हा सराव असतो म्हणून ते गर्भात असल्यापासूनच अंगठा चोखते.

८) बाळ वेगवेगळे हावभाव करते

गर्भातून बाहेर आल्यावर अर्थातच बाळाला त्याच्या भावनांना हावभावाद्वारे व्यक्त करावे लागेल. त्याला बाहेर आल्यावर यात काही अडचणी येऊ नये म्हणून बाळ गर्भातच याचा सराव करत असते. या गोष्टीचा शोध अजून लागला नाहीये की त्याच्या हावभाव देण्यामागे त्याला लागलेली भूक असते की त्याला होणाऱ्या त्रासातून बाळ असे हावभाव देते. पण गर्भातल्या बाळाला अशाप्रकारे त्रास होत असण्याची शक्यता कमीच आहे.

९) बाळाने जागा बदलणे

आईच्या गर्भात बसलेले अर्भक गर्भधारणेच्या शेवटच्या काळात आपली जागा सरकावते. जशी जशी प्रसूतीची वेळ जवळ येते तशी तशी बाळाची जाणीव वाढते. बाळाला प्रसूतीची वेळ जवळ आली आहे हे कळताच ते आपले डोके आईच्या योनीच्या दिशेने सरकावयास सुरवात करते. हळू हळू त्या दिशेने ते शरीराची जागा बदलते जेणेकरून गर्भाशयातून योग्यरित्या बाहेर पडता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: