बाळाला आरोग्यदायी व काटक आहार द्यायचा आहे ना !

 महाराष्ट्रात ज्वारी – बाजरी खूप मोठ्या प्रमाणात पेरली जाते. ज्वारीची व बाजरीची भाकर प्रत्येक घरात बनत असते. मराठी संस्कृतीत भाकरीला खूपच महत्व आहे.  तेव्हा ह्याविषयी माहिती. ८ ते ९ महिन्याच्या बाळाला स्तनपान गरजेचे असते. आणि बाळाला १ वर्ष झाल्यावर विविध प्रकारचे आहार तुम्ही देऊ शकता. पण काही बाळांची तब्येत अशी असते की, त्यांना काही आहार पचत नाही तो आहार हलकाच असतो पण पचत नाही तेव्हा आईला खूप चिंता वाटते की, बाळाला आता कोणता आहार द्यायचा. अशा वेळी तुम्ही स्वतः लहान असताना आईने दिलेला आहार म्हणजे ज्वारी – बाजरीची पेज. ही पेज पचायला तर हलकीच असते पण ह्यात बाळांची वाढ लवकर होऊन जाते.


१) ज्वारी – बाजरीच्या पेजच्या आहाराने बाळ खूप सदृढ व चपळ बनत असते. ह्यात खूप प्रमाणात कर्बोदके असतात. आणि ते शरीराला खूप हितकारक असतात.

२) ह्या ज्वारी- बाजरीच्या पेज चा फायदा असा की, काही बाळांना मलावरोधाची समस्या येत असते तेव्हा ह्यामुळे बाळाला मलावरोधाचा त्रासापासून आराम मिळतो आणि जर तुम्ही पेज देत असाल तर मलावरोध होतच नाही.


३) सध्या फास्टफूड व पॅकिग फूडमुळे (अन्न) ज्वारी- बाजरीची पेज बऱ्याच माता विसरून गेल्या आहेत. तेव्हा हा आहार किती लाभदायक आहे त्याविषयी तुमच्या आईला पहा. जुन्या वेळेला ज्वारी – बाजरीची पेज म्हणजेच सेरेलॅक असायचे. आणि तेव्हा बाळ खूप कमी आजारी पडायचे आणि खूप जास्त ठणठणीत असायचे.


४) तर ह्या आहारासाठी : ज्वारी- बाजरीची पेज कशी बनवायची

ज्वारी- बाजरीचे सारखे प्रमाण घ्यावे त्यानंतर त्याला भाजून घ्यायचे. नंतर ते दळून घ्यायचे. तयार होणाऱ्या बारीक पिठापासून त्या पिठाला पाण्यात भिजवून पेज बनवावी. त्यात चवीपुरता मीठ व साखर घालावी. आणि ह्यात जर तुम्हाला पेज बनवण्याविषयी काही गोंधळ व शंका वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आईला किंवा अनुभवी स्त्रीला पेज बनविण्याविषयी घ्या.

५) दिवसातून २ ते ३ वेळा हा आहार देऊ शकता.


६) हा आहार गरिबांचा म्हटला जातो असे काही नसतं उलट हा आहार खूप सकस असल्याने बाळाला मजबूत बनवत असतो. आणि हा आहार खूप सोपा स्वस्त आहे. आणि महत्वाचे म्हणजे हा आहार ऑरगॅनिक आहे. तेव्हा बाळाला नक्कीच पेज खाऊ घाला. जर तुम्हाला जर आणखी ह्याविषयी माहिती तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा म्हणजे आम्ही इतर आईंना सांगू. आणि त्यात तुमच्या नावाचा उल्लेख करूच. 

Leave a Reply

%d bloggers like this: