प्रसूती दरम्यानच्या या ७ गोष्टीविषयी तुम्हांला माहिती आहे का ?

तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आई होत असतात त्यावेळी तुमच्यासोबत खूप आश्चर्यकारक घटना घडत असतात. आईच्या गर्भात बाळाचे वाढणे ही जगातली सगळ्यात अदभूत आणि सुंदर गोष्ट आहे. तुमची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली किंवा सिझेरियन झाली तरीही तुम्ही बाळाचा चेहरा पहिल्यांदा पाहता, त्यावेळी तुम्हाला होत असलेल्या वेदना विसरून चेहऱ्यावर हसू येते.  बाळाचे इवलूसे ओठ, त्याचे लहान- लहान  हात-पाय, त्याचा गोड चेहेरा पहिल्यांदा पाहण्याचा क्षण तुमच्याकरिता अवर्णनीय असतो. पण हा क्षण येण्यापूर्वी तुम्ही ज्या गोष्टींमधून जाता त्या कदाचित तुम्हाला त्यावेळी पहिल्यांदाच माहिती पडतात.  
ह्याठिकाणी  प्रसुतीबद्दल ७ अशा गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्हाला कदाचित यापूर्वी कोणीही सांगितल्या नसतील : 

१) प्रसूतीच्या तारीख चुकू शकते


स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या शेवटची एक तारीख कळावी असे वाटते. गरोदरपणात एक स्त्री ज्या प्रकारच्या वेदना, बदल आणि त्रासातून जाते तो त्रास त्या शेवटच्या तारखेकडे बघून संपणार आहे याचा तिला दिलासा मिळत असतो. कारण तसे पाहिले  तर केवळ ७% स्त्रिया त्यांच्या दिलेल्या प्रसुतीच्या तारखेलाच बाळाला जन्म देतात. त्यामुळे तुमची प्रसूती डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला झाली नाही तर वाईट वाटून घेऊ नका.     

२) एपीड्यूरल मध्ये तुम्ही पूर्णपणे बधिर नसतात

एपीड्यूरल हे एक वेदनाशामक असते जे प्रसूतीपूर्व दिले जाते व ज्यामुळे तुमचा कंबरेखालचा भाग बधीर होतो. हे औषध सुईद्वारे कंबरेच्या मागच्या बाजूने दिले जाते. पण या वेद्नाशामकाने तुम्हाला जाणवणाऱ्या वेदना पूर्णपणे बंद होतात असे नाही. काही स्त्रियांना हे दिल्यानंतरही पायात वेदना  किंवा पोटात देखील दुखत असते.  तुमच्या कळा अतिशय तीव्र असतील व सहन करता येत नसतील तरच एपीड्यूरलचा पर्याय निवडा.

३) एपीड्यूरल दिल्यानंतर खाणे –पिणे करता येत नाही

बाळाला जन्म देणे ही तर एक वेदनादायक गोष्ट आहेच, तुम्ही एपीड्यूरल घ्या किंवा नको, पण त्याहीपेक्षा अवघड आहे तुमची उपाशीपोटी प्रसूती होणे. जर तुम्ही एपीड्यूरलचा पर्याय निवडणार असाल तर प्रसूतीसाठी घरातून निघतांना व्यवस्थित खाऊन निघा.  काही दवाखान्यांमध्ये तुम्हाला यादरम्यान चावण्यासाठी आईसचिप्स दिल्या जातात पण त्याने तुमची भूक शमत नाही.

४) प्रसूतीच्यावेळी तुमचे मलविसर्जन होऊ शकते

प्रसुतीच्या दरम्यान तुम्ही तुमच्या पार्श्वभागावर जोर देता त्यामुळे मलविसर्जन होण्याची शक्यता असते. ही गोष्ट बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत घडते. यामध्ये लाज वाटून घेण्यासारखे काही नाही. हॉस्पिटलमधील परिचारिकांना या गोष्टीची सवय झालेली असते. तेव्हा त्याची काळजी तुम्ही करू नका.

५)  बाळ बाहेर आल्यानंतर प्रसूती थांबत नाही

बाळ बाहेर आल्यानंतर त्याच्या नाळेशी जोडलेली त्याची उशी म्हणजेच प्लासेन्टा देखील बाहेर येणे बाकी असते. त्यामुळे अजून थोडा जोर लावण्यासाठी तयार राहा. तुम्ही जर नशीबवान असाल तर नाळ बाळासोबत सहज आणि लगेच बाहेर येते. नाहीतर तुम्हाला थोडा जोर लावावा लागतो.

६)  तुमच्या बाळाच्या शरीरावर एक पातळ आवरणतुमच्या बाळाची त्वचा गळून पडत नाहीये किंवा ते त्वचेवरचे साल देखील नाहीये. दुधासारखा पातळ आणि चिकट द्रव तुमच्या बाळाच्या अंगाला चिकटलेला आहे तो कायमसाठी राहणार नाही. त्या आवरणाला वेर्निक्स म्हणतात. गर्भाशयात बाळाच्या त्वचेची रक्षा या आवरणामुळे होते. ४० आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जन्मलेल्या बाळांच्या अंगावर हे आवरण जास्त प्रमाणात असते.

७) बाळच्या  डोक्याव्यतीरिक्त इतर अंगावरही केसाळ असू शकतेतुमचे बाळ माणसापेक्षा जास्त माकडासारखे दिसत असेल तर चकित होऊ नका, हे नैसर्गिक आहे. काही नवजात बालकांच्या अंगावर खूप केस असतात. त्यांच्या हातावर, पायावर आणि पाठीवर देखील केस असू शकतात. हे केस दाट आणि काळे असतात पण काळजी करू नका काळानुसार ते गळून पडतात.

Leave a Reply

%d bloggers like this: