तान्ह्या बाळांची समस्या असते की, त्यांना कोणताही आहार दिला तरी ते उलटी करून पोटातून काढून टाकतात. त्याची करणे वेगवेगळी असतील कधी त्यांना दूध पचविण्यास अडचण येते. आणि बाळ जर उलटीच करून देत असेल तर बाळाच्या पोटात कोणतेच अन्न जाणार नाही. आणि बाळ भुकेच राहील तेव्हा ह्यावर काहीतरी उपाय असायला हवा.
१) बाळ उलटी का करते ?

बाळ खूप लहान असताना त्याचे पोट पूर्णपणे विकसित झालेले नसते. बाळाचे जे पोटाचे दार असते जे खाल्लेले अन्न बाहेर येण्यासाठी थांबवते. ते खूप मजबूत आणि सक्षम झालेले नसते. म्हणजे ते खाणे पोटात राहील. आणि काही वेळेला बाळाला खुराकापेक्षा जास्त खाणे झालेच तर त्याचीही बाळ उलटी करून देते.
१. काहीवेळा अन्न किंवा आहार पोटाच्या ऐवजी श्वासाच्या नळीत चालले जाते. आणि त्यामुळे बाळ खोकलते आणि अन्न बाहेर काढून देते.

२. बाळाचे पोट खराब होऊन जाते. त्यामुळे बाळाला अन्न पचत नाही. बाळाच्या पोटावर दबाव पडायला लागतो आणि त्यामुळे बाळ उलटी करून देते.
३. जर तुम्ही तुमच्या बाळाला झोपवून दूध पाजत असाल तर अशावेळी उलटी येण्याचे खूप चान्सेस असतात. खरं म्हणजे बाळाला खाणे, दूध, पाणी, बसून द्यायला हवे. कारण जर बाळाच्या पोटात आहार व्यवस्थित घेलाच नाही तर बाळ उलटीच करणार.

२) दुधाची उलटी कशी थांबवायची ?
जर तुम्हाला उलटीचे कारण समजले असतील तर :

१. बाळाचे पोट खराब असेल तर दूध पाजण्याचा दबाव त्यावर टाकू नका.
२. त्याचा जवळ नॅपकिन ठेवा आणि त्याला नॅपकिन घालून द्या. कारण त्याचे खाणे पडणार नाही.

३. लक्षात घ्या की, बाळाची नैपी खूप तंग बंधू नका. त्याचा गळा दुखेल. आणि त्यामुळे जेवण आत जाणार नाही आणि तेव्हाच त्याला उलटी होईल.
४. बाळाला काही पदार्थांची ऍलर्जी आहे का तपासून घ्या. आहार स्वच्छ ठेवा त्यात कोणत्याही प्रकारे जिवाणू जाणार नाही त्याची दक्षता घ्या.

५. सुरवातीला हलका आणि पचेल असाच आहार त्यांना द्या. जसे की, ज्वारी-बाजरीची पेज. बळजबरी खूप आहार बाळाला देऊ नका. त्यामुळेही बाळ उलटी करून टाकते.