तुमचे मुल शांत आणि खेळकर असले की तुम्हाला एक उत्तम पालक असल्याचा अभिमान वाटतो पण तेवढेच हतबल देखील होता जेंव्हा लहानगे हट्ट करतात आणि तुमचे अजिबात ऐकत नाहीत. लहान मुले हट्टीपणा करतांना गोंधळ घालतात, एखादी गोष्ट मिळाली नाही कि आरडओरड करतात, जमिनीवर पडून रडतात आणि हे सगळं सांभाळतांना तुमची मात्र तारांबळ होते. त्याचा हट्टीपणा, त्याचे चिडणे, रडणे, गोष्टींसाठी मागणी करणे हे सर्व त्याच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी खूप महत्वाचे ठरते. या सर्व गोष्टींमधून तुम्ही शांत राहायला देखील शिकता.
पण या खालील १० प्रकारे तुमच्या मुलाचे त्रागा करणे, हट्टी वागणे त्याच्यासाठी कसे उपयोगाचे ठरणार आहे हे पाहूया.
१. मोकळे वाटते.
मुले रडतात आणि अश्रूंमध्ये कुर्टोसिन असते ज्यामुळे मनावरील तणाव निघून जाण्यास मदत होते. जेंव्हा लहान मुले रडतात तेंव्हा त्यांना रडून झाल्यावर आधी पेक्षा अजून शांतच वाटते. आणखी एक म्हणजे रडल्याने रक्तदाब कमी होतो आणि रडल्यानंतर मुलांची कोणी प्रेमाने समजूत घातली की त्यांचे मानसिक आरोग्य ही चांगले राहते.
२. नवीन शिकायला मदत होते.
अनेकदा जेंव्हा मुल एखाद्या मानसिक तणावातून जात असते तेंव्हा त्याच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. चिडचिड करून रडून झाल्यावर त्यांच्या भावनांना मोकळी वाट मिळते आणि हा तणाव निघून जाण्यास कुठेतरी मदत होते. त्यांना आलेला वैताग कमी होतो आणि पुन्हा काहीतरी नवीन शिकण्यास ते तयार होतात. शास्त्रज्ञांच्या मते लहान मुलांना शिकण्यासाठी आणि नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांचे मन आणि डोके शांत असणे गरजेचे आहे. त्यामुळे भावनिकरीत्या त्यांच्या मनात असलेला गुंता सुटणे गरजेचे आहे.
३. चांगली झोप .
अनेक पालकांना असे वाटत असते की लहान मुलांच्या त्राग्याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर पुन्हा ते हट्ट करणार नाहीत. पण मुलांच्या बाबतीत त्यांचा हट्ट आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे होणारी चिडचिड बाहेर नाही पडली तर त्यांच्याही मनावर ताण येतो आणि त्यांची झोप बिघडू शकते. त्यांच्या दाबल्या गेलेल्या भावना त्याच्या झोपेत त्यांना त्रास देऊ शकतात. यापेक्षा त्यांचा हट्ट तुम्ही ऐकून घेतलात तर कमीतकमी त्यांच्या मनावर त्या गोष्टीचे ओझे राहणार नाही. गोष्टी मनात सुप्त राहिल्या तर त्यांचा परिणाम होतोच. त्यांचा हट्ट करून झाला कि त्यांच्या मनात काही राहणार नाही आणि झोप मात्र चांगली येईल.
४. कधी कधी ‘नाही’ म्हणणे सुद्धा चांगले असते.
कदाचित तुमचे मुल त्याला किंवा तिला तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी नकार दिलात म्हणून चिडचिड करत असू शकते. पण त्यांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणणे हे एका अर्थाने योग्य आहे. यामुळे मुलांना त्यांच्या मर्यादा कळतात. हवी ती गोष्ट हातात मिळाल्यामुळे मुले बिघडतात. तुमचे ‘नाही’ म्हणण्याने त्यांची चिडचिड होत असेल काही हरकत नाही.
५. मुलांना त्यांच्या भावनांविषयी तुमच्याजवळ सांगणे योग्य वाटते आहे.
लहान मुले चिडतात आणि त्रागा करतात याचा अर्थ नेहमी नकारात्मकच असेल असे नाही! त्यांच्या या त्राग्यातून ते खरेतर तुमच्या नाकाराला एकप्रकारे स्वीकारत असतात. त्यांचे चिडणे, गोंधळ घालणे म्हणजे ते परिस्थिती स्वीकारत आहेत आणि तुमचे म्हणणे एकप्रकारे त्यांनी मानले आहे. त्यांच्या मनातला राग तुम्हाला दाखवायला त्यांना योग्य वाटते ही एक चांगली खूण आहे. अशावेळी मुलांना प्रेमाने समजावून त्यांना सहानुभूती दाखवा.
६. त्यांचा राग तुम्हाला त्यांच्या जवळ आणतो.
तुम्हाला हे खरे वाटणार नाही पण निट निरीक्षण करा. लहानमुले त्रागा करतांना आई- वडिलांना तक्रार करतात तुम्ही त्यांना ‘नाही’ म्हणत आहात या गोष्टीचे दुख: व्यक्त करतात. त्यांची झालेली निराशा ते त्रागा करून तुम्हाला सांगतात. रडल्याने त्यांच्या भावना अजून बाहेर येतात. पण हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जेंव्हा प्रेमाने त्यांना समजावून सांगता आणि त्यांच्या मनावरील ताण कमी करून त्यांना दिलासा देता तेंव्हा मुले भावनिकरीत्या तुमच्या जवळच येतात त्यांना मिठी मारून जवळ घ्या आणि त्यांच्या मनावरील ताण कमी करा.
७. पुढील काळात तुमच्या पाल्याच्या वागण्यात यामुळे सकारात्मक बदल घडू शकतो.
लहान मुलांची नाराजी इतर प्रकारे बाहेर येऊ शकते जसे की, मोठ्याने बोलणे, आदळ-आपट करणे, अबोला धरणे, कामात रस न घेणे, एकटे बसणे वगैरे. याचा अर्थ तुमचे मुल त्याच्या भावनांच्या चढ-उतरांशी जमवून घेणे शिकत आहे. याचा उपयोग त्याला पुढील काळात होऊ शकतो जसे की त्याच्या मानसिक स्थिती हाताळणे त्याला जमू शकेल आणि स्वत:ला शांत करण्याचा उपयोग ते शिकतील.
८. घरी झालेली चिडचिड बाहेर घडणार नाही.
जेंव्हा मुलांना स्वत:ला पूर्णपणे व्यक्त करायचे असते तेंव्हा ते घरीच करतात जिथे त्यांचे ऐकून घेणारे पालक असतात. आपण मुलांना घरात शांत आणि नेहमी सामजूतदारपणेच वागायचे शिकवले तर त्यांची नाराजी आणि त्रागा घराबाहेर असतांना बाहेर येऊ शकतो. याऐवजी तुम्ही मुलांना समजून घ्या त्यांच्या समस्या आणि हट्ट ऐकून घ्या. त्यांना दिलासा दया जेणेकरून त्यांचा त्रागा घराबाहेर असतांना चिडचिड करून बाहेर पडणार नाही.
९. तुमचे मुल जे करत आहे ते तुमच्या वयात तुम्ही विसरून गेले आहात.
जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपण आपल्या भावनांना आवरायला शिकतो आणि आपण रडत नाही. पण लहान मुले त्यांच्या भावना लगेच व्यक्त करतात. त्यांच्या मनात असलेली चीड किंवा राग ते लगेच व्यक्त करतात. एक पालक म्हणून तुम्ही आता या वयात तुम्हाला वाईट वाटले तर रडू शकत नाहीत किंवा त्रागा करू शकत नाही त्यामुळे तुमच्या रडणाऱ्या मुलेकडे बघून तुम्हाला अजून सहानुभूती वाटते. मुलांना अशावेळी रडू दया त्यांच्या भावनांना मोकळी वाट मिळणे गरजेचे आहे.
१०. मुलांचा हट्ट तुमच्यासाठी देखील फायद्याचा असतो.
लहान मुलांचा हा हट्ट पाहून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवतात. लहानपणी तुम्ही हट्टापायी केलेल्या त्रागामुळे तुमच्या आई वडिलांना कसा त्रास झाला होता हे तुम्हाला आठवते. आणि त्याचमुळे तुम्हाला त्यावरचा उपायदेखील माहित असतो. तुम्ही यामागील त्यांचे साधेभोळे कारण जाणून घेतलेत कि तुमच्यासाठी सुद्धा मुलांचा हा त्रागा मानसिक तणावाला निवळण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.