झोपेत असताना तुम्ही का घोरतात?

      देशाची ५० टक्के लोक झोपताना घोरत असतात. आणि कदाचित ही समस्या तुमच्या घराशी सुद्धा संबंधीत असेल. घोरणे एक सामान्य आवाज आहे तर तो तुमच्या फुफ्फुसात येत असतो आणि बऱ्याच लोंकाना असे वाटते की,    तो आवाज नाकातून येत असेल. तुमच्या जिभेच्या पाठीमागे ओरोफॅरिक्स असते. तर तो झोपण्यावेळी तंग होऊन जातो. पण तुम्ही खरं म्हणजे घोरणे का येते ते माहिती आहे का तुम्हाला ?

तुम्ही का घोरतात ? 

झोपण्यावेळी फुफ्फस पूर्णपणे उघडे असते. आणि बाकी स्नायू आराम करत असतात. आणि असे खूप वेळा होत असते. आणि जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असताना स्वप्न बघतात. श्वास घेण्याच्या वेळी हवा जाण्याचा रस्ता छोटा होऊन जातो. आणि त्यामुळे हवेचा दबाव वाढायला लागतो. आणि गळ्याच्या मागे जे टिश्श्यू असतात ते व्हायब्रेट व्हायला लागतात. त्यामुळे तुम्ही घोरायला लागतात.

वय – जशी जशी तुमचे वय वाढते तसे घोरण्याची क्षमता वाढत जाते.

लिंग- स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषच घोरत असतात.

वजन- वाढत्या वजनाच्या व्यक्तीं जास्त घोरतात.

झोपण्याची स्थिती- घोरणे अधिक वेळा पाठीवर झोपण्यावेळी येत असतात. आणि काही व्यक्तींना कूस बदलल्यामुळे घोरत असतात.

दारू- जर तुम्ही खूप दारू पीत असाल तर घोरण्याची चान्सेस वाढतात.

स्लीप एपनिया विरुद्ध घोरणे

घोरणे हे झोपेच्या डिसऑर्डर मुले होत असते. आणि स्लीप एपनिया एक गंभीर स्लिप डिसऑर्डर आहे. ज्यावेळी झोपेत असेलल्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचण येत असते. आणि ह्यावर काही उपाय केला नाहीतर तर झोपेत तुमचा श्वास थांबण्याचा धोका असतो. आणि तुमच्या मेंदूला आणि शरीराला कमी ऑक्सिजन मिळत असतो. आणि त्यात तुम्ही ऑक्सिजण कमी घेणार. आणि जर तुम्हाला : दिवसा खूप झोप लागत असेल, अचानक श्वास घ्यायला अडचण येत असेल. तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. कारण तपासून घ्या, तुम्हाला स्लीप एपनिया तर नाही ना.

घोरणे थांबवण्याचे काही उपाय :

१. जर तुमचे वजन खूप असेल तर त्याला कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

२. कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करा.

३. दारू जर पीत असाल तर तुम्हाला घोरण्याच्या त्रासापासून सुटका हवी असेल तर दारू पिणे बंद करा आणि दुसऱ्यांनाही शांत झोपू द्या.

४. नोजल स्ट्रीप- ह्या स्ट्रीप ने घोरण्याच्या समस्यांवर काही प्रमाणात तरी आराम मिळत असतो. त्यासाठी तुम्हाला खूप प्रमाणात बाजारात नोजल स्ट्रीप मिळून जातील.

 

 

 

५. उशी – अशा उशीचा वापर करण्याचा प्रयत्न करा की, तुमचे विन्डपाइप खुलतील आणि घोरणे कमी होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: