बाळ चिमुकल्या हातांनी डोळे का चोळतो ?

 

बाळ डोळे कोणत्या वेळी चोळतात तर ते त्यावेळी खूप थकलेले असतात. त्यांना झोप येत असते. त्याचवेळी असेही होत असते की, त्यांची डोळे ही कोरडी होऊन जातात, डोळ्यांचा काहीतरी संसर्ग झाला असेल, किंवा धूळ किंवा कचरा काहीही गेले तर ते डोळे चोळत बसतात. तसे पहिले तर त्यांना चिमुकल्या हातांनी डोळे चोळत असते. तेव्हा त्यांना बघायला छान वाटते. पण काही वेळा सावध राहावे लागते. कारण बाळ काहीतरी सांगत असेल किंवा त्याला काहीतरी त्रास जाणवत असेल.

१) ते थकलेली आहेत

झोप येत असेल तर बाळ डोळे चोळत असते. आणि हे झोपेचे संकेत आहे. बऱ्याचदा बाळ डोळे चोळून डोळ्याच्या आजूबाजूला असलेल्या त्वचेला आराम देत असतो. जांभळी देणे, अस्वस्थ होणे, आणि रडणे ह्यावरूनही समजते की, बाळ आता झोप घेणार आहे. ह्यावरून एक गोष्ट समजून घ्यायची की बाळ थकले आहे आणि त्याला झोप येत आहे. तेव्हा त्याला आणखी त्रास देऊ नका. त्याला त्या वेळी झोपवा.

२) त्याची डोळे कोरडी पडत आहेत

बाळाची डोळे जर कोरडे व्हायला लागलीच तर बाळ डोळे चोळत असते. आणि जेव्हा बाळ रडत असते त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू निघतात आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यात आद्रता येऊन जाते. आणि मग नंतर अश्रूंची प्रोटेक्टिव्ह फिल्म जास्त वेळ हवेत राहिली तर डोळे सुखायला लागतात.

३) बाळासाठी सर्व गोष्टी नवीन आहेत

एक गोष्ट आपण विसरतो की, बाळासाठी सर्व गोष्टी ह्या नव्या असतात. लाईट चमकला तर ती घाबरून डोळे लावतात किंवा चोळतात कारण त्यांच्यासाठी सर्वच गोष्टी नव्या आहेत. म्हणून ते जिज्ञासूपणाने शिकत असतात बघत असतात.

४) त्यांच्या डोळ्यात काही गेले असेल

जर बाळाच्या डोळयात काही गेलेच तर बाळ अगोदर डोळे चोळते मग थोड्या वेळाने जोर-जोराने रडायला लागते. धूळ, कचरा, पीठ, गेले असेल. आणि जर बाळाच्या डोळ्यात काही गेल्यावर स्वच्छ ओले कापड घेऊन त्याच्या डोळ्याला त्रास होणार नाही असा कचरा काढायचा. कोमट पाण्याने त्याच्या डोळ्यावर शिंतोडे उडवून हळूहळू जे गेले असेल ते काढायचे. ह्यावेळी बाळाचा चेहरा पकडण्यासाठी कुणाची मदत घ्या. कापसाचीही तुम्ही मदत घेऊ शकता.

५) मुंगी किंवा किडा चावला असेल

बाळाच्या डोळ्यात वेदना किंवा खाज सूटत असेल त्यामुळंही बाळ डोळे चोळते. सुजलेली डोळे, लाल झालेली डोळे, ताप, ह्यामुळे डोळ्यांचा संसर्ग होत असतो. बऱ्याचदा झोपेत मुंगी किंवा बारीक कीडा बाळाच्या डोळ्यांना चावून घेतो.

तेव्हा बाळाची प्रकृतीमध्ये डोळ्यांची भूमिका लक्षात घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: