स्तनपानासाठी दूध कसे तयार होते

आतापर्यंत तुम्ही प्रसूती कशी होते ह्याविषयी माहिती घेतलीत आणि आणखी घेणार आहात. पण तुम्ही बाळाला जन्म दिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेलच की, स्तनातून नेमके दूध कसे येते ? आणि ते माहितीही करून घ्यायला हवेच. कारण ते तुमच्या आरोग्याशी आणि बाळाशी संबंधीत आहे. आणि बाळही कसे दूध पीत असते.

दूध केव्हापासून यायला लागते ?

बाळाच्या जन्मानंतर काही तासांत मातेच्या स्तनात दूध यायला लागते. काही मातांना दूध यायला काही दिवस लागतात. आणि जोपर्यंत बाळ दूध पिण्यास सक्षम होते तेव्हा स्तनात दूध आलेले असते. म्हणजे निसर्गाचे नियोजन किती परफेक्ट आहे.

कोलोस्ट्रम(मातेच्या दुधात असणारा घटक) चे काय महत्व आहे बाळासाठी

स्तनात येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम सुद्धा म्हणतात. ह्या कोलोस्ट्रममध्ये खूप पौष्टिक तत्व असतात. ह्यामध्ये अँटीबॅक्टरीयल आणि रोगाला प्रतिबंध करणारे घटक असतात. आणि जन्मजात बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी असते तेव्हा मातेच्या दुधाने ते भरून निघत असते. म्हणून मातेचे दूध बाळासाठी अमृत असते. आणि मातेने स्तनपान करायलाच हवे. कोलोस्ट्रम चा रंग पिवळा असतो आणि ते घट्ट असते. काही मातेचे दूध पाणी सारखेही असते.

स्तनातून दूध अगोदर खूप कमी का निघते ?

सुरुवातीला कोलोस्ट्रम खूप हळूहळू येत असते. कारण ह्यामुळे बाळाला मातेचे स्तन चोखण्याची सवय पडते. आणि कदाचित हे निसर्गानेच नियोजन करून ठेवले आहे. ह्यामुळे बाळाला स्तनातून दूध पिण्याची सवय लागते. कारण तो सर्व शिकून घेत असतो. कारण ह्यात बाळाला दूध चोखणे त्याचवेळी श्वास घेणे आणि ते दूध गिळून पचवणे म्हणजे किती गोष्टी तान्ह्या बाळाला कराव्या लागत असतात.

मातेच्या स्तनात काय बदल होतात ?

ज्या वेळी माता पहिल्यांदा बाळाला स्तनपान करत असते. त्यानंतर ३ -४ दिवसात मातेचे स्तन सुडौल आणि हलके वाटायला लागतात. आणि ह्याचे कारण म्हणजे तुमच्या दुधाची मात्रा बदलत आहे. कोलोस्ट्रम आता सामान्य दुधासारखे यायला लागले आहे. आणि आता हे दूध गायीच्या दुधासारखे दिसत असते. काही मातांना थोडे दिवस लागतील की, त्यांचे दूध गायीच्या दुधासारखे दिसण्यासाठी. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. काही दिवसांनंतर आपोआप ठीक होईल. हा ब्लॉग इतर मातांनाही शेअर करा. त्यांच्या बाळासाठी . 

{!{a

Leave a Reply

%d bloggers like this: