स्तनपानाच्या वेळी बाळ का चावते ?

स्तनपान करताना बाळ अनावधानाने चावते तेव्हा तुम्ही बाळाला हलकीशी थापट मारत असतात. पण आईचे हृदय असल्याने त्यांना लागत नाही. पण त्यावेळी त्या आईचा आईला खूप त्रास होतो. आणि बाळ जसे मोठे होत जाते. तसे बाळाचे चावणे वाढत जाते. आणि बऱ्याचदा आईचे स्तन ह्यामुळे दुखतात. आणि बाळाला स्तनपान करता येत नाही.

त्यासाठी आईला काही गोष्टी करता येतात त्या कोणत्या ते आपण बघणार आहोत.


१) बाळाला ह्या गोष्टीची जाणीव होऊ द्या की, चावण्यामुळे आईला वेदना होतात. बाळाला तर समजणार नाही पण त्याला हळूहळू त्या शब्दांची सवय पडल्यामुळे बाळ आपोआप समजून घेईल. त्यासाठी तुम्ही बोलू शकता की, “ अरे सोनू मम्मीला त्रास होतो असे नाही करायचे.’’ तुम्ही अशाप्रकारे ज्या नावाने बाळाला हाक मारत असाल ते बोलू शकता.


२) तुमच्या बोटाला हळूच बाळाच्या तोंडात टाका, आणि स्तनाग्र चोखण्यापासून हळूच बाळाला थांबवा. याच्यातून बाळाला समजून जाते की, आता आपले जेवण पूर्ण झाले आहे. तुमचे बाळ जर चावत असेल तर असे करा. असे बऱ्याच माता करत असतात. फक्त बाळाला जोरात स्तनाग्र पासून तोंड काढू नका नाहीतर तुम्हाला वेदना होतील.


३) ज्यावेळी बाळाने तुमच्या स्तनाग्रला चावले तर त्याला १५ मिनिटापर्यंत त्याला पाजू नका. म्हणजे त्याला कळून येईल की, आपण मम्मीला चावले आहे.

४) कधी – कधी बाळ चिडून किंवा कंटाळून आईचे स्तनाग्र चावत असते. आणि जर तुम्ही खूप अवघड जागेवर बसला असाल आणि व्यवस्थित स्तनपान होत नसेल तर बाळ चावत असते. कारण त्याला त्यावेळी खूप भूक लागली असते आणि तुमच्याकडून त्याच्या तोंडात व्यवस्थित दूध जात नाही. त्यामुळे बाळाला दूध पाजताना सर्व कामे आवरून व शांत जागी जाऊन स्तनपान करावे. म्हणजे त्या ठिकाणी बाळ कधीच चावणार नाही.


५) बाळाचे जेव्हा नवीन दात असतात, त्यावेळी बाळाकडून चुकून चावले जात असते. म्हणून बाळाचे दात आले का ? ते तपासून घ्या. आणि जर आले असतील तर त्याला स्तनाग्र पासून हळूच दूर करण्याची सवय लावा.


६) काहीवेळा तुम्ही स्तनपान चुकीच्या स्थितीने करत असतात तेव्हा बाळ स्तनाग्र पकडण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यातच चावले जाते. म्हणून स्तनपान करताना बसून किंवा झोपून करताना दक्षता घ्या.


७) बाळ जेव्हा चावते तेव्हा आईला खूप त्रास होत असतो म्हणून हे उपाय करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वेदना कमी व्हायला लागतील. आम्ही तुमच्या प्रत्येक वेदनेला समजू शकतो.

जर तुमचा ह्या विषयी काही अनुभव असेल तर तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. 

Leave a Reply

%d bloggers like this: