गर्भाशयाच्या संदर्भातील काही अनोख्या गोष्टी

स्त्रियांच्या शरीरातील गर्भाशय हे मल्टी टास्क करणारे एक भाग (अवयव) आहे. हे गर्भाशय मुलीला जन्मताच मिळालेले एक असते. ते मुलीच्या जन्मांपासून ते त्या स्त्रीच्या अंतापर्यँत वेगवेगळे बदल अनुभवत असते. त्यातील सगळ्यात मोठा बदल म्हणजे गरोदर राहणे आणि मुल जन्माला घालणे. या गर्भाशयाबाबत अश्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याबाबत कदाचित तुम्हांला माहिती नसले.

१. गर्भाशय हे खूप लवचिक असते

गर्भाशय हे खूप लवचिक असते. गरोदर असताना बाळाची जस-जशी वाढ होत जाते तसं-तसे ते प्रसारण पावते. मोठे होत जाते . तसेच मुलाच्या जन्मानंतर ते पुन्हा आकुंचन पावते आणि पुर्ववत होते.

२. गर्भाशय हे खूप शक्तिशाली असते

गर्भाशयाच्या मासपेशी या शक्तिशाली असातात. त्या बाळाचा पूर्ण भार सांभाळतात. ९ महिने होणारे बदल सांभाळते. तसेच बाळाच्या जन्मांच्या वेळी होणारे बदल देखील सहज पेलते.

३. समागमा मधील आनंद

स्त्रीला समागमाचा मिळणार आनंदची सुरवात ही गर्भाशयापासून होते. त्यानंतर योनीच्या पेशी आणि इतर अंगापर्यन्त हा आनंद पोहचतो ।

४. स्वतःला ठीक करून पुर्ववत होण्याची क्षमता

प्रत्येक महिन्यात गर्भधारणा करण्याच्या हेतून गर्भाशयाच्या आतील थरात endometrium मध्ये रक्त आणि ज़रूरी पोषक तत्व जमा होतात. परंतु गर्भ धारण न झाल्यामुळे हा थर गळून पडतो. ही प्रक्रिया गर्भधारणा होत नाही तो पर्यंत चालू राहते. या प्रकारे गर्भाशय दार महिन्याला हि प्रक्रिया करते आणि स्वतःला ठीक करून पुर्ववत करते.

५. सी-सेक्शन आणि हिस्टरक्टॉमी (hysterectomies) मुळे गर्भाशय दुखवण्याची शक्यता असते . सी सेक्शन नंतर डॉक्टरांनी सांगितलेली काळजी न घेतल्यास गर्भाशयाबाबत गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

६. मुल जन्माला घालण्यासाठी गर्भाशय असणे आवश्यक असते. जर एखाद्या स्त्रीमध्ये गर्भाशय जन्मताच गर्भशय नसेल किंवा काही कारणास्तव गर्भाशय काढून टाकण्यात आले असले तर त्या स्त्रीला मुल होऊ शकत नाही

७. गर्भाशयात नवीन जीव जन्माला घालण्याची क्षमता असते

गर्भाशय हे एकच असे अंग या(अवयव) आहे ज्यामध्ये दुसरा जीव जन्माला घालण्याची क्षमता असते. गर्भाशयापासून गर्भनाळ निर्माण होते जी आई-आणि बाळाला एकमेकांशी जोडते 

Leave a Reply

%d bloggers like this: