स्त्रियांमधील (Fibroids)ची समस्या म्हणजे काय जाणून घ्या.

स्त्रियांच्या मध्ये फायब्रॉईड विषयी जी समस्या आहे तिच्याविषयी हा ब्लॉग आहे. कारण अगोदर PCOD विषयी माहिती घेतली. फाइब्रॉइड मुळे स्त्रीच्या गर्भाशयावर परिणाम होत असतो. आणि त्याच्यात जर लक्ष दिले गेले नाही तर ते गर्भाशयाच्या बाहेर पसरून योनीवरही परिणाम करू शकते. तेव्हा समजून घेऊ नेमके फाइब्रॉइड काय आहे ?

१) फाइब्रॉइड काय असते ?


फाइब्रॉइड स्त्रीच्या गर्भाशयात होणारी अनैसर्गिक वाढ आहे. त्यात गरजेपेक्षा जास्त सेल्स आणि कोशिका जुळून गाठ तयार व्हायला लागते.

२) फाइब्रॉइड कोणत्या कारणांनी होत असते ?

फाइब्रॉइड ह्या विषयी अजून तर नेमके कारण सापडले नाही पण इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन च्या खूप मात्रेमुळे असे होत असते. पण त्याविषयी आणखी काही कारणे सांगितली जातात.

१. घरात अगोदर कुणाला तरी फाइब्रॉइड झालेले असेल तर.

२. खूप जाड असल्यामुळे

३. खूप अति प्रमाणात मांस खाणे


४. दारू

५. कॅफिन

६. व्हिटॅमिन ड कमी असणे

७. शरीरात व्हिटॅमिन अ ची खूप मात्रा होणे

८. उच्च रक्तदाब मुळे सुद्धा फाइब्रॉइड होऊ शकतो.

३) फाइब्रॉइड चे लक्षणे कोणती असतात ?

फाइब्रॉइड आहे असे बऱ्याचदा समजून येत नाही. असे मानले जाते की, बऱ्याच स्त्रियांना फाइब्रॉइड होत असतो. खालीलप्रमाणे फाइब्रॉइड ची लक्षणे असू शकतात.

१. शरीराच्या खालच्या साईडला म्हणजे पोटाच्या आसपास, गर्भाशय आणि मूत्राशय च्या जवळ वेदना होणे.

२. मासिक पाळीच्या दरम्यान खूप रक्तस्त्राव होत असेल किंवा मासिक पाळीच्या वेळी वेदना होत असतील.

३. पाठीच्या खालच्या भागात खूप दुखणे.

४. खूप वारंवार लघवीला जावे लागत असेल.

५. बद्धकोष्ठता

६. समागम करताना खूप त्रास होत असेल.

४) फाइब्रॉइडवर उपाय म्हणून खूप मोठ्या प्रमाणात हिरवा भाजीपाला खाणे. त्यात पोषक तत्वे असतात.

५) फाइब्रॉइड मधून जीवाला धोका नाही. फक्त ह्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. आणि ते कळत नाही म्हणून तपासून घेत जा की, रक्तस्त्राव कोणत्या कारणासाठी होत आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: