गरोदरपणात होणारे (अ)सामान्य दुखणे

गरोदरपणात स्त्रियांना बऱ्याच छोट्या -छोट्या गोष्टींच्या समस्या असतात. सतत काही ना काही दुखत असते. तेव्हा ह्या ब्लॉगमधून काही दुखण्याविषयी सांगणार आहोत. हा ब्लॉग लिहण्याचे कारण की, बऱ्याच स्त्रियांचे म्हणणे असते की, गरोदरपणात ही समस्या मलाच येत असेल का ? तर ह्या समस्या साऱ्याच स्त्रियांना येतात. 

स्त्रियांना असणारी विविध दुखणे :

१) तुमच्या नाकावर दबाव पडत असतो. त्याचे कारण असे आहे की, ब्लड प्रेशर आणि डोळ्यांची दृष्टी ह्यात खूप गाढ संबंध असतो. म्हणूनच उच्च रक्तदाबाच्या पेशंटच्या डोळ्यावर दबाव पडून दिसत नाही.

सायनस चे दुखणे 

आणि हीच वेदना कपाळ, गाल, आणि नाकाच्या सोबत ही होऊ शकते. आणि ह्या जागा दुखण्याचा अनुभव तुम्ही घेतला असाल किंवा घेणार. ह्या दुखण्याचे असे आहे की, काहीतरी बॅक्टरीया किंवा ऍलर्जी नाहीतर काही संसर्गामुळे नाकाच्या आतल्या नसात सूज येऊन रक्त प्रवाह थांबून जातो.

 कपाळ आणि डोळ्यांच्या वरचा भाग दुखणे

२) कधी कधी तुमचे डोळ्याच्या वरच्या डोक्याचा भाग खूप दुखायला लागतो. आणि खूप दुखल्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे सुद्धा त्याचा उपचार घ्यायला जात असतात. आणि ह्यावेळी तुम्ही झोपून राहता आराम करता तरी दुखणे थांबत नाही.

 मायग्रेन चे दुखणे


३) हे सगळ्यात जास्त गरोदर मातांना छळणारे दुखणे आहे. आणि हे कधीही सुरु होऊन दुखायला लागते. डोक्यातला मागचा भाग खूप दुखतोच पण लाईट कडे नुसते पहिले तरी चक्कर यायला लागतात. त्या स्त्रीला अंधुक दिसते. डोळ्यांवर अंधारी येत असते. काही स्त्रियांना ह्यामध्ये चक्कर येतात, आणि उलट्या होत असतात. आणि काही स्त्रियां ह्या बेशुद्ध ही पडतात पण ह्याचे प्रमाण कमी आहे.

४)  बाळाचे गर्भात जसजसे पोषण होत जाते म्हणजे गर्भात बाळाच्या वजन वाढण्याने पाठीवर त्याचा दबाव पडत जाते. ह्यात पाठीचा कण्याला थोडा धक्का लागत असतो. म्हणून हे दुखणे बळावत असते.

५)  हाताला व पायाला सूज येऊन जाते. व काही प्रमाणात हात व पाय दुखतही असतात. ह्यासाठी क्रीम व बर्फ स्त्रिया लावत असतात. आणि ह्या समस्या प्रत्येक गरोदर स्त्रियांना येतात. त्यामुळे ह्यात खूप घाबरून जायचे कारण नाही. काही स्त्रियांना ह्यापेक्षाही दुसऱ्या समस्या असतील. त्या असतील तर तुम्ही आमच्याशी शेअर करू शकतात.

Leave a Reply

%d bloggers like this: