लग्नानंतर वाढणारे वजन

 

लग्नाआधी अगदी ३० ते ४० किलोच्या दरम्यान वजन असणारे मुलींचे लग्न झाल्यावर अचानक वजन ५० ते ६०च्या दरम्यान होते आणि स्त्रियांमध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला सुरवात होते. शोधाअंती असे दिसून आले हा फरक पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमधे जास्त आढळतो. हे लग्नानंतर वाढणारे वजन का वाढते याची करणे आपण पाहणार आहोत

१. संप्रेरकीय (संप्रेरकीय बदल ) बदल

लग्नानंतर स्त्रियांचा राहणीमान बदलते तसेच शरीरसंबंध नंतर देखील स्त्रीमध्ये संप्रेरकीय बदल घडून येतात. तसेच त या संप्रेरकीय असंतुलनामुळे होणारे आजार देखील होण्याची शक्यता असते आणि यामध्ये वेगाने वजन वाढू शकते.

२) मानसिक सुरक्षितता

तसेच एका अभ्यासद्वारे असे आढळून आले आहे की लग्ननंतर मुलींना काही प्रमाणात मानसिकरीत्या सर्व बाबतीत सुरक्षितता निर्माण होते त्या बिनधास्त जीवन जगू लागतात आणि त्याच परिणाम म्हूणन देखील त्यांचे वजन वाढते.

३. स्वतःकडे दुर्लक्ष करणे

लग्नाआधी मुली आपल्या दिसण्याबाबत आपल्या वजनाबाबत खूप जागरूक असतात आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात. आणि याच मुली स्वतःच्या आयुष्यात इतक्या व्यग्र होतात की स्वतःकडे दुर्लक्ष करतात. वेळी-अवेळी व्यायाम न करणे या गोष्टीमुळे लग्नानंतर मुलींचे वजन अधिक प्रमाणात वाढते

३. झोपेची कमतरता

लग्नानंतर स्त्रियांची झोपण्याचा उठण्याचा अशी कोणती वेळ ठरलेली वेळ नसते. तसेच बऱ्याच वेळा त्याची झोप पूर्ण देखील होत नाही त्यामुळे याचा परिणाम स्त्रियांचे अवास्तव वजन वाढण्यात होतो.

५. बाहेरचे खाणे

घरात मोकळेपण मिळत नसला की नवीन लग्न झालेले जोडपी एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी बाहेर जेवायला जातात आणि हे वारंवार घडल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच नवीन लग्न झाल्यावर या ना त्या कारणावरून नातेवाइकांकडे जाणे किंवा पार्ट्या यामुळे देखील खाण्यात बदल होतो त्यामुळे वजन वाढू शकते

६. वय
 

आजकाल लग्नाचे वय हे २८-३०च्या दरम्यान झाले आहे. या वयात स्त्रियांचा मटाबोलिक रेट कमी होतो आणि त्यामुळे अचानक आणि अति वजन वाढते.

७. तणाव

 

 

मुलींना लग्नानंतर स्वतःला दुसऱ्या घरात सामावयाला वेळ लागतो तो काळ मुलींसाठी तणावपूर्ण असतो त्यामुळे अति तणावमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. तणाव मध्ये अति खाण्याची काही मुलीची सवय असते त्यामुळे देखील वजनात असा फरक पडू शकतो

८) अति काळजी

काही घरांमधील वातावरण खूप मोकळे असते. त्या ठिकाणी सुनेची देखील मुलीसारखी काळजी घेण्यात येते हवे नको आणि खाण्या-पिण्याची सरबराई चालू असते. या अति काळजीपोटी किंवा अति आग्रहामुळे देखील लग्नानंतर मुलींचे वजन वाढू शकते.

लग्नानंतर वाढलेल्या वजनाचा ताण ना घेता जर वजन तुमच्या उंचीच्या मानाने जास्त असले तर योग्य व्यायाम आणि आहार घ्या आणि वजन प्रमाणाबाहेर वाढले असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: