गर्भानिरोधक गोळ्या आणि तुमचे कामजीवन

हे तर नक्कीच खरे आहे की आजकाल गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांचे आणि त्यांच्या जोडीदारांचे आयुष्य सहज आणि ताणमुक्त झाले आहे. चांगल्या गोष्टींचे काही दुरुपयोग पण असतात त्याचप्रमाणे या गर्भनिरोधक गोळ्या तुमच्या शरीरावर काही नकारात्मक परिणाम देखील करू शकतात. हे परिणाम प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळे असू शकतात. काही केसेस मध्ये या गोळ्या एखाद्या स्त्रीच्या कामवासनेवर नकारात्मक परिणाम करू शकतात तर काहीच्या बाबतीत या गोळ्यांचे कोणतेही इतर परिणाम होत नाहीत.

या गोळ्यांमुळे तुमच्या आरोग्यावर आणि कामजीवनावर होणारा परिणाम जाऊन घेऊया.

गर्भनिरोधक गोळ्या कसे काम करतात?

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केवळ नको असलेला गरोदरपणा रोखण्यासाठीच केला जात नाही तर यामुळे तुमच्या लैंगिक संबंधांतून पसरू शकणारे काही आजार तसेच तुमच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीच्या स्थिती रोखण्यासाठी देखील या गोळ्यांचा उपयोग होतो.

या गोळ्यांचे कार्य स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे अनेक परिणाम स्पष्ट करते. पहिली गोष्ट या गोळ्यांद्वारे केली जाते ती म्हणजे तुमच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल घडवून आणणे जेणेकरून ओव्ह्युलैशन म्हणजेच अंडमोचन प्रक्रिया घडून येणार नाही. यासाठी या गोळ्यांमध्ये प्रोजेस्टेरोन अनो एस्ट्रोजेन या संप्रेरकांचा डोस असतो. या संप्रेरकांमुळे बीजकोष उत्तेजक संप्रेरकाची (FSH- Follicle Stimulating Hormone) वाढ खुंटते .गर्भाशयात बिजफलन होयासाठी हे संप्रेरक अत्यावश्यक असते पण त्याची वाढ बंद झाल्याने गर्भाशयात बीजफलन होऊच शकत नाही. 

कामइच्छे होणार परिणाम 

सर्वसाधारणपणे याचा एकूण अर्थ असा की तुमच्या गर्भाशयात अंडमोचन(ओव्हुलुशन) घडण्याची जी प्रकिया असते ती कमी होते आणि तुमच्या गरोदर राहण्याच्या संधी देखील खूप प्रमाणात कमी होतात.

या गर्भानिरोधाकांमुळे टेस्टोस्टेरोन नावाचे संप्रेरक तयार होण्याच्या प्रक्रियेत लक्षणीय कमतरता येते. हे एक पुरुषांच्या शरीरात प्रामुख्याने आढळून येणारे संप्रेरक आहे जे काही प्रमाणात स्त्रियांच्या शरीरात देखील उपस्थित असते. खरेतर या लैगिक संप्रेरकामुळे तुमच्या शरीरातील उर्जा वाढते आणि अंगात उत्साह राहतो जो आता या गोळीच्या प्रक्रियेमुळे अर्थातच कमी होतो. त्यामुळे याचा परिणाम म्हणून तुमची काम इच्छा कमी होते.

एस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे SHBG म्हणजेच Sex Harmone Bilding Globulin या संप्रेरकाची पातळी वाढू शकते. हे संप्रेरक टेस्टोस्टेरोन ला बांधून ठेवते ज्यामुळे त्याची घनता कमी होते. ह्यामुळे द्खील कामईच्छेवर परिणाम घडून येतात.

काही गर्भनिरोधक शरीराची संभोग करतानाची स्नेहन क्षमता कमी करतात यामुळे संभोग करताना अडचणी उद्भवतात आणि तुमचे कामजीवन वेदनादायक ठरू शकते.

काही इतर परिणाम ?

आपण या गर्भानिरोधाकांमुळे कामवासनेत येणाऱ्या कमतरते विषयी चर्चा करत आहोत ते परिणाम सर्वच स्त्रियांवर घडतील असे नाही. काही स्त्रियांना यातुन कोणतेच इतर परिणाम जाणवत नाहीत.

असे म्हणतात की अंडमोचन प्रक्रीयेदरम्यान अचानक टेस्टोस्टेरोन संप्रेरकांची पातळी वाढून स्त्रियांना कामोत्सह जाणवू शकतो आणि या गोळ्यांमुळे तो उत्साह तुम्हला नियंत्रित ठेवता येतो जेणेकरून टेस्टोस्टेरोनच्या पातळीत सामान्य बदल घडतील. यातून काही स्त्रियांना गर्भानिरोधाकांचा वापर करूनही कशाप्रकारे सामान्य कामजीवन अनुभवयास मिळते हे स्पष्ट होते.

संप्रेरकांमधील असमानता हा कामवासनेवर परिणाम करणारा एकच घटक आहे असे म्हणता येणार नाही. तणाव, थकवा, निराशा, आरोग्यातील गुंतागुंतीच्या स्थिती या गोष्टींमुळे देखील तुमची कामवासना मंदावू शकते.

जर या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे तुमच्या शरीरात किंवा कामवासनेवर काही लक्षणीय बदल घडून आले असतील तर दुसऱ्या एखाद्या गर्भनिरोधक गोळीचा वापर करून बघा. किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे शरीर तुम्हाला सगळ्या गोष्टींचे इशारे देत असते. शरीराचे ऐका आणि योग्य पाऊल उचला.    

Leave a Reply

%d bloggers like this: