तुमच्या बाळाला उबदारपणे कसे गुंडाळून ठेवाल.

बाळांना उबदार ठेवण्यासाठी मऊ कापडात गुंडाळून ठेवण्याची पद्धत वर्षानुवषे चालत आलेली आहे आणि बाळाला याने बरेच फायदे मिळतात. बाळ खूप रडत असेल किंवा अस्वस्थ झाले असेल तर कापडात गुंडाळून ठेवण्याने बाळ शांत होण्यास मदत होते नवजात शिशुंना कापडात गुंडाळून ठेवण्याने आईच्या गर्भात असल्याचा उबदार आणि सुरक्षेचा अनुभव त्यांना येतो आणि बाळ गाढ आणि खूप वेळ झोपते. कारण, बाळाच्या अति हालचाली आणि सरकण्याला बंधन येते आणि बाळ पोटावर पालथे पडू शकत नाही.

      बाळाला गुंडाळून ठेवण्याची योग्य पद्धत

१] एक पातळ अंथरूण किंवा कापड पसरवून ठेवा. बाळांना गूंडाळण्यासाठी बनवलेले खास दुपटे हि तुम्ही घेऊ शकता.

२] कापडाच्या वरच्या टोकाला काही इंच दुमडा.

३] दुमडलेल्या भागावर डोके येईल अशा पद्धतीने बाळाला ठेवा.

४] बाळाच्या उजव्या दंडाला बाजूने पकडून ठेवा आणि कापडाची उजवी बाजू बाळाच्या डाव्या बाजूने गुंडाळा आणि कापडाचा खालचा भाग खेचून घ्या.

५] कापडाचा खालचा भाग वरच्या बाजूने दुमडून घ्या, जास्त घट्टपणे गुंडाळू नका आणि बाळाचा चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घ्या.

 ६] उजवी बाजू गुंडाळण्यासाठी वापरलेली पद्धत पुन्हा वापरून डावी बाजू अश्याच पद्धतीने गुंडाळा. जर तुम्ही बाळाला गुंडाळण्यासाठी मिळणारे खास कापड वापरणार असाल तर त्याला हुक किंवा वेल्क्रो लावलेले मिळेल ज्याने बाळ सुरक्षित राहील.

 ७] गुंडाळुन ठेवण्याने तुमचे छोटेसे बाळ उबदार आणि शांत राहील.

Leave a Reply

%d bloggers like this: