तुमच्या लहानग्याला ताप आलाय.. हे लक्षात असू द्या

लहान मुलांनाचे आरोग्य सांभाळणे हि अवघड गोष्ट असते आणि जेव्हा तुमचे छोटेसे मूल अचानक तापाने फणफणते तेव्हा हि अगदी तारेवरची कसरत ठरते. मध्यरात्री तुमचे बाळ रडतच झोपेतून उठते आणि त्या /तिला ताप असल्याचे तुमच्या लक्षात येते तेव्हा ते एखाद्या वाईट स्वप्नासारखेच असते.अशा वेळी बेचैन ना होता शांतपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे असते.

बाळाला ताप येईल तेव्हा काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडतो ना,आम्ही तुम्हाला मार्गदर्शक ठरेल अशी सर्व माहिती येथे देत आहोत. बाळाला ताप असताना संयम बाळगा,काही सोप्या सूचना अंमलात आणा ,शांत राहा.लवकरच तुमच्या बाळाला अगदी बरे वाटेल.

१] हा नक्की ताप आहे का?

साधारणपणे,जेव्हा बाळाच्या शरीराचे तापमान नेहमी पेक्षा थोडे जास्त असते तेव्हा हे ताप येण्याचे लक्षण असू शकते . ताप हा आजार नव्हे पण आजाराचे लक्षण आहे. म्हणजेच कुठल्या तरी संसर्गाचा शरीर सामना करत असते. शरीराचे तापमान नेमके किती आहे हे तपासून ताप आहे कि नाही हे निश्चितपणे समजू शकते.

२] ताप असल्याची खात्री कशी कराल ?

बहुतांश डॉक्टर मानतात कि,लहान मुलांच्या शरीराचे सामान्य तापमान ९७ ते १००.३ डिग्री फॅरेनहाईट म्हणजेच ३६ ते ३८ डिग्री सेल्सियस आहे. तुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान १००. ४ डी /से पेक्षा जास्त असेल तेव्हा ताप आहे याची खात्री असते. तसेच बाळामध्ये जाणवणाऱ्या लक्षणे आणि वागणे याकडे लक्ष असू द्या. शरीराच्या तापमाना पेक्षा बाळामध्ये जाणवणाऱ्या लक्षणे तापाची सूचना देत असतात.याचे उदाहरण म्हणजे,बाळाला थकवा आणि मरगळ आलेली असेल तर हे तापाचे चिन्ह असू शकते.

बाळाच्या शरीराचे तापमान वाढण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात जसे कि शारीरिक परिश्रम,गरम पाण्याने आंघोळ ,जाड किंवा जास्त कपडे घालणे किंवा अगदी हवामान. कधी कधी दिवसाच्या बदलणाऱ्या वेळांनुसार हि तापमान बदलू शकते. दुपारनंतर आणि संध्याकाळी मुलांमध्ये तापमान वाढते आणि मध्यरात्री तसेच पहाटे कमी असते.

३] बाळाच्या शरीराचे तापमान नक्की कसे मोजावे?

तुमच्या बाळाच्या शरीराचे तापमान मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत जसे काखेत थर्मामीटर ठेवणे. काळजीपूर्वक थर्मोमीटर तोंडात ठेवणे. बाळाच्या बाबतीत सुचवले जाणारे परिणामकारक साधन म्हणजे डिजिटल थर्मोमीटर, शरीराचे तापमान मोजण्यासाठीचे हे साधन सुरक्षित आहे आणि खराब झाले तरीही याने बाळाला कोणतीही इजा पोहचत नाही.

४] माझ्या बाळाला नेमका कोणत्या प्रकारचा ताप आहे?

केवळ शारीरिक तपासणीवरून बाळाला कोणत्या प्रकारचा ताप आलेला आहे हे समजणे कठीण असते. त्यामुळे डॉक्ट्रांना विचारून सल्ला घेणे आवश्यक असते. सामान्यपणे,दोन प्रकारच्या तापाची लागण होऊ शकते -संसर्गजन्य आणि जिवाणूजन्य ताप . डॉक्टरांच्या मते, जिवाणूंमुळे होणारे आजार जसे कि आतड्यांचा संसर्ग,सर्दी किंवा फ्लू यांचा सामना बाळाचे शरीर करत असते तेव्हा जिवाणूजन्य ताप येतो. तर सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या संसर्गागामुळे -जसे कि कानाला होणारा संसर्ग (सूक्ष्मजंतू किंवा जिवाणूमुळे होणारे),मूत्रमार्गाचा संसर्ग,सूक्ष्मजंतूमुळे होणार मेंदूज्वर किंवा न्यूमोनिया या कारणामुळे सूक्ष्मजंतूजन्य ताप येऊ शकतो. विषाणूंमुळे होणाऱ्या तापापेक्षा सूक्ष्मजंतू पासून होणार ताप काळजी करण्यासारखा असतो कारण वेळीच उपचार केले नाही तर आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तुमचे बाळ तीन महिन्यांपेक्षा लहान असेल तर तुम्हाला जास्त काळजी वाटणे साहजिक आहे. 

[अ] बाळाच्या शरीरात असणाऱ्या संरक्षक पेशींचे आवरण पातळ असते आणि

[ ब ] जीवघेण्या आजारांची गंभीर लक्षणे शोधून काढणे अवघड असते. तुमचे बाळ तीन महिन्यांपेक्षा लहान असेल आणि त्याला ताप आले तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

५] माझ्या बाळाला ताप असेल तर काय करायला हवे?

प्रथम ही गोष्ट डॉक्ट्रांना सांगणे गरजेचे आहे. डॉक्टर सांगतील तसे प्रथमोपचार चालू करावेत. ताप आलेला असतांना बाळाला जास्तीत जास्त आरामदायक ठेवा. शरीराचे तापमान लवकर कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे स्पॉन्जने बाळाचे अंग पुसून काढणे. कोमट पाण्याने बाळाचे कपाळ आणि काखेचा भाग पुसून काढावा. तसेच बाळाच्या शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी आचे दूध राहा.हलके आणि आरामदायक कपडे आणि घरातील तापमान थंड ठेवण्याने बाळाला आराम मिळेल.

या उपायांनंतरही बाळाला अस्वस्थ वाटत असेल तरच ताप कमी करणारी औषधे बाळाला द्यावीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तीन महिन्यापेक्षा लहान बाळांना औषधे देऊ नयेत.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध तुमच्या बाळाला देऊ नका.

Leave a Reply

%d bloggers like this: