प्रसुतीपूर्व योगाबद्दल तुम्हाला माहित असायला हवे असे काही

प्रसुतीपूर्व योग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होण्याचे एकमेव कारण म्हणजे प्रसूती अगोदर आणि त्यानंतर होणारे अत्यंत सकारात्मक आणि आश्चर्यकारक परिणाम. योग करण्याने तुमचे शरीर बाळंतपणासाठी तयार होते ,तणाव कमी होतो आणि झोप हि चांगली येते. तसेच,पाठदुखी,मळमळ,डोकेदुखी आणि धाप लागणे हि कमी होते. योग करण्याचे खूप फायदे असले तरीही याच्या अतिरेकाने इजा होऊ शकते हे लक्षात द्या. तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शन आणि सल्ल्यानुसार आठवड्यातून दोन ते तीन वेळा प्रसुतीपूर्व योगा करण्यात काहीही धोका नसतो.

खबरदारीचा उपाय म्हणून,नेहमी तुमच्या शरीराची गरज आणि अवस्था याचा विचार करा आणि तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच योग्य करा.तुमच्या शरीराला आरामाची गरज असेल तेव्हा फक्त आरामच करा.योग करतांना तुमच्या शरीराला आधाराची गरज वाटत असेल तर नक्कीच आधार आणि मदत घ्या.श्वसनाचे असे कोणतेही व्यायाम (प्राणायाम) करू नका ज्यात श्वास रोखून धरावा लागतो,कारण जेव्हा तुम्ही श्वास घेणे बंद करता तेव्हा बाळाला हि प्राणवायूचा पुरवठा होते. तोल जाऊन पडणे किंवा उडी मारणे अशा सारख्या इजा होण्याची शक्यता असलेले व्यायाम पूर्णपणे टाळा.

प्रसूतीपूर्व योगवर्गामध्ये साधारणपणे खालील गोष्टींचा समावेश असतो.

१. विविध आसने

बसून,उभे राहून किंवा झोपलेल्या अवस्थेत करायची वेगवेगळी आसने ज्यात शरीराची सौम्य हालचाल करायची असते अशा प्रकारचा योग तुम्हाला करायला सांगितलं जाईल. हि आसने करतांना , तुम्ही टेबल,उशी किंवा पुस्तके अशा वस्तूंचा वापर आधारासाठी करू शकता. शरीराचा समतोल सांभाळण्यासाठी आणि लवचिकता वाढवण्यासाठी त्याच बरोबरीरीने वेगवेगळ्या अवयवांना मजबूत बनवण्यासाठी विविध योगासने मदत करतात.धोकादायक आसने,ज्यात पडण्याची शक्यता असेल जरूर टाळा. तुमच्या शरीराची क्षमता लक्षत घ्या-एखादे आसन करणे तुमच्या शरीराला झेपत नसेल तर अजिबात प्रयत्न करू नका.अशी आसने,ज्यात जास्त वेळासाठी जमिनीवर पडून राहावे लागते करू नका यामुळे तुम्हाला मळमळणे किंवा धाप लागणे असे त्रास होऊ शकतात.

२. श्वासाचे व्यायाम

धाप लागण्याचा त्रास कमी करण्यासाठी श्वसनमार्गाचे व्यायाम करण्याचा चांगला परिणाम दिसून येतो.प्रसववेदना कमी करण्यात हि याचा उपयोग होतो. यात नाकाने दीर्घ आणि हळुवार श्वास घेणे आणि सोडणे अशा व्यायामांचा समावेश असतो. लक्षात असू द्या,अगदी काही क्षणासाठी हि श्वास रोखून धरू नका कारण तुमचा श्वास हाच तुमच्या बाळासाठी प्राणवायूचा एकमेव स्रोत असतो.तसेच,कोणतेही आसन करतांना धाप लागणार नाही याची काळजी नक्की घ्या-योग करतांना तुम्हाला बोलता येत नसेल किंवा हृद्य जोरजोरात धडधडत असेल तर अशी कठीण आणि थकवणारी आसने टाळायला हवीत.

३. आरामदायक आसने

शरीराला आराम आणि शिथिलता देणारी अनेक योगासने आहेत. यात तुम्हाला श्वासावर आणि शरीरातील सर्व संवेदनावर लक्ष केंद्रित करायचे असते. काही मंत्रांचा जप किंवा स्रोत म्हणण्याने नकारात्मक विचारांना आळा बसतो आणि मन शांत राहते.

४. शरीर सौम्यपणे खेचणे

कोणताही व्यायाम किंवा योगासने करण्या अगोदर शरीराच्या विविध भागांना जसे कि मान,हात यांना हळुवारपणे ताणण्याची गरज असते जेणेकरून शरीराची लवचिकता कायम राहते किंवा वाढते आणि वेदना होत नाहीत.भरपूर पाणी पिणे आणि रोज स्नायूंना ताणण्याचा सौम्य व्यायाम करण्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तरीही,स्नायूंना अति ताणण्याने इजा होऊ शकते हे लक्षात ठेवा. एखादे आसन जास्त वेळ करता येईल असे तुम्हाला वाटू शकते कारण तुमच्या शरीरात स्रवणाऱ्या रिलॅक्सिन हार्मोनमुळे सांध्यांचे संतुलन करण्याची शरीराची क्षमता कमी होते.

तर मग योगवर्गाला जाणे सुरु करण्यापूर्वी हे सर्व माहिती लक्षात ठेवा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. लवकरच आई होणाऱ्या तुमच्या सर्व प्रिय मैत्रिणींनाही हि माहिती जरूर वाचायला सांगा.   

Leave a Reply

%d bloggers like this: