गरोदरपणात

तुम्हाला ताप आल्यावर तुम्ही काय करत असतात. तर तुम्ही गोळी घेतात. थोडाही थकवा जाणवायला लागला तर पेनकिलर घेतात. तेव्हा तुम्ही गोळ्या खूप प्रमाणात घेत असतात. पण तुम्ही ह्या गोळयांचा प्रभाव शरीरावर किती होतो ह्याचा विचार केला नसेलच. किंवा काही प्रमाणात केला असेल. ह्या ब्लॉगमधून गरोदर स्त्रीवर ह्या गोळ्यांचा काय परिणाम होतो त्या विषयी सांगणार आहोत.

१) गोळ्या घ्यायलाच हव्यात का ?


ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नेमका कोणता त्रास होतोय त्यावर आहे. म्हणजे जर साधी सर्दी असेल तर थोडं थांबून घ्या. ती लगेच जाते त्यासाठी लगेच गोळ्या घेण्याची आवश्यकता नसते. आणि जर खूप प्रयत्न करून सर्दी जात नसेल तेव्हाच गोळी घ्यावी. आणि खूपच त्रास होत असेल तेव्हाच पेनकिलर घ्यावी. कारण अति गोळ्या घेण्यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू त्या गोळ्यांचा परिणाम कमी व्हायला लागतो. आणि गोळ्यांचा साईड इफेक्टही शरीराच्या इतर भागावर होत असतो.

२) गरोदरपणात अँटिबायोटिक औषध/ गोळ्या घ्यायला पाहिजेत का ?


गर्भावस्थेत अँटिबायोटिक औषधे घ्यायला काही समस्या नाहीच पण मोठ्या प्रमाणात औषधांचे सेवन करू नका. कारण बऱ्याचदा त्याची ऍलर्जी किंवा बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण औषधे घेण्याअगोदर डॉक्टरांना ती सांगितली आहेत आणि ती औषध कंपनीला व त्या औषधाला FDA कडून मान्यता आहे. त्याविषयी खात्री करून घ्या. कारण गरोदरपणात कोणतीच रिस्क घेऊ नका. तुम्हाला औषधांची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांना सांगून द्या. जेणेकरून ते औषध त्यानुसार देतील. चुकीचे औषध घेऊ नका. तुमच्या पोटात बाळ आहे.

३) जर तुम्हाला गोळ्या/ औषधी घ्यायचे नसेल तर


१. खाण्याचा बाबतीत खूप लक्ष द्या.

२. नियमित व्यायाम आणि ध्यान, योग करावा लागेल.

३. मानसिक ताण- तणावाला दूर करा.

४. जर कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल तर तिच्याबाबत जवळच्या व्यक्तीशी बोलून घ्या.

५. वेळ मिळालाच तर तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा.

ह्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही स्वस्थ आणि तंदुरुस्त राहता. आणि तब्येत कधी बिघडत नाही. पण ह्या गोष्टी करणे थोडे कठीण आहे पण गोळ्या घेणे सोपे. निवड तुमची.

४) औषधे आणि गोळ्या घेण्या अगोदर


जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या गोळ्यांचे बिल कमी यायला पाहिजे तर डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहायला सांगा. जर विशिष्ट औषध जेनेरिक मध्ये नसेल तर ठीक आहे. पण जे जेनेरिक औषध असतील ते प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहायला लावा. कारण तुमचे औषधीचे बिल निम्मे कमी होते. आणि जेनेरिक औषध हे हलके नसते. त्याविषयीचा गैरसमज डोक्यातून काढून घ्या. म्हणून डॉक्टरांना जेनेरिक औषध लिहून द्यायला सांगा. आणि ते लिहून देतील. आमचा प्रयत्न हाच की, तुम्ही आरोग्यपूर्ण असायला हवे. आणि खूप पैसेही वाचायला हवेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: