गर्भारपणात मिळणारे ५ अप्रत्यक्ष फायदे

     तुम्ही आई बनणार असतात तेव्हा तुम्हाला खूप टेन्शन येत असते की, आपल्याला काही दिवस खूप त्रास होणार व स्वतःची व बाळाची काळजी घेण्यासाठी खूप पथ्ये पाळावी लागतील. एकदम शरीर सुजून जाते. पण असे असताना तुम्ही सकारात्मक गोष्टी पाहत नाहीत की, ह्या गरोदरपणाच्या दरम्यान काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होत असतो. आणि ह्या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा तुम्हाला मिळत असतो. ह्या ब्लॉगमधून तेच सांगणार आहोत.

१) ९ महिने मासिक पाळीमध्ये होणारा त्रास

प्रत्येक स्त्रीला मासिक पाळी येत असते आणि जर मासिक पाळी आली नाहीतर तिला मातृत्व यायला अडथळा येत असतो. पण हीसुद्धा एक गोष्ट आहे की, मासिक पाळी दरम्यान स्त्रीला, मुलीला खूप त्रास होत असतो. जसे की, पोटदुखी, खूप थकवा, पाठदुखी, डोके दुखी काहींना मायग्रेनचा त्रास होतो. तेव्हा गरोदरपणात तुम्हाला ह्या त्रासापासून ९ महिने तरी आराम मिळतो.

२) हायजिन खाणे

तुमची आवड असो की नाही पण गर्भारपणाच्या दरम्यान तुम्हाला हिरवा भाजीपाला, फळे, दूध इ. जीवनसत्वयुक्त आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्यामुळे तुमची प्रकृती आयुष्यभरासाठी चांगली ठणठणीत होते. त्याचा फायदा प्रसूतीमध्ये होतोच पण नंतरही शरीराला होत राहतो. आणि ह्यात तुम्ही जंक फूड, तेलकट पदार्थ ह्या दरम्यान टाळतात त्यामुळे तुम्ही हायजिनिक होत असतात.

३) कॅन्सर होत नाही

असे आढळून आले आहे की, पूर्ण ९ महिन्याच्या गर्भारपणात बाळाला जन्म देणे, स्तनपान खूप वेळपर्यंत करणे, ह्यामुळे स्त्रीला सवाईकल कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते.

बाळाच्या गर्भात असल्यापासून आणि त्याचा जन्म होईपर्यंत स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सची लेव्हल वाढते किंवा कमी होणे. त्यामुळे स्त्रीच्या आरोग्यावर नैसर्गिक बदल होत असतात. आणि हे बदल मातृत्व आणि स्त्रीला समजून घ्यायला मदत होते.

४) सुंगण्याची क्षमता वाढते

गर्भवती स्त्रीला गरोदरपणाच्या वेळेस हार्मोनल बदलामुळे ही शक्ती मिळत असते.

५) नवीन दृष्टिकोन येतो

स्त्रीच्या जीवनात हे दिवस खूप बदल करणारे असतात. तिचे विचार, समजून घेण्याची वृत्ती, इतरांबाबत ममत्व ह्या सर्व गोष्टीबाबत तिची समजूत खूप वाढीस लागते. ह्यात तिला एक आत्मविश्वास मिळत असतो आणि स्त्रीत्व सुद्धा ह्याच क्षणाला ती मिळवून घेते. डिलिव्हरीच्या वेळी होणारा त्रासातून ती खूप शक्ती मिळवून घेत असते ती तिला पूर्ण आयुष्यभरासाठी ती मिळत असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: