या पाच गोष्टीबाबत तुम्ही जोडीदाराशी संवाद साधणे आवश्यक असते

एकमेकांमध्ये सुसंवाद असणे हे एक चांगल्या नात्यासाठी गरजेचे असते. पतीशी काही गोष्टीत चर्चा केल्याने तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होते. अश्या काही गोष्टी ज्याबाबत तुम्ही तुमच्या पतीशी संवाद साधणे, काही विषयांवर मोकळेपणाने चर्चा होणे आवश्यक असते. यातल्या काही गोष्टीबाबत तुम्ही पतीशी संवाद साधलाच असले पण इतर गोष्टी देखील बोलून बघा

१. आर्थिक गोष्टी

 

 

आर्थिक गोष्टीबाबत बोलणे म्हणजे एकमेकांच्या उत्पनाबाबत चर्चा करणे नव्हे. आर्थिक गोष्टी म्हणजे आर्थिक नियोज करणे. मुलांबाबत नियोजन करणे मुलांचे प्लॅनींग करत असाल तर त्याबाबत आर्थिक नियोजन करणे. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे.

२. शृगांरिक गोष्टी

 

 

 एकमेकांच्या इच्छा अपेक्षा जाणून घेणे. एकमेकांच्या कल्पना समजावून घेणे. ज्यामुळे तुमचे शृगांरिक आयुष्य सुखकर होईल.

३. भविष्यातील स्वप्ने

प्रत्येकाची काही ना काही स्वप्नं असतात आणि ती स्वप्ने आपल्या जोडीदाराकडे बोलावी किंवा जोडीदाराने आपल्याशी बोलावी अशी अपेक्षा असते. जर तुम्ही तुमची स्वप्नं पतीला सांगितली तर ते तुम्हांला तुमच्या स्वप्नांपर्यन्त पोहचायला मदत करतील. तसेच त्यांच्या स्वप्नाविषयी देखील त्यांच्याशी बोलावे ज्यामुळे त्यांना देखील बरे वाटेल आणि आधार वाटेल आणि यामुळे तुमच्यातील बंध घट्ट होतील

४. बालपणीच्या आठवणी

तुमच्या पतीच्या लहानपणीच्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयन्त करा तुमच्या देखील लहानपणीच्या आठवणी त्यांना सांगा. लहानपणी घडलेल्या गंमतीजंमती एकमेकांना सांगा. यामुळे काही काळ का होईना तुम्ही दोघे लहान व्हालं आणि आप -आपल्या कटू गोड आठवणी एकमेकांना सांगाल. यामुळे दोघांना बरे वाटेल

५. भीती आणि कमतरतांबाबत बोला

आपण सगळेजण कश्याला ना कश्याला घाबरतो. कोणी झुरळाला तर कोणी अपयशाला, कश्याचातरी बाबत काही जणांना कसलातरी न्यूनगंड असतो .प्रत्येकात काही-ना-काही कमतरता असते. या सगळ्या गोष्टीविषयी बोला दोघं कश्याला घाबरता दोघांना कसला न्यूनगंड आहे याबाबत संवाद साधल्याने कदाचित तुमचे न्यूनगंड कमी होतील भीती कमी होईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच एकमेकांवरील विश्वास देखील वाढेल. 

Leave a Reply

%d bloggers like this: