लग्नानंतर खूप स्त्रियांचे वजन वाढायला लागते. काही स्त्रियांचे वजन कमीही होत असते. पण ज्या स्त्रियांचे वजन वाढते त्याविषयी ह्या ब्लॉगमधून सांगणार आहोत. संशोधनानुसार ८२ टक्के स्त्रियांचे लग्नानंतर ४ ते ५ वर्षांनंतर स्त्रीचे वजन ८ ते १० किलोने वाढले असते काही स्त्रियांचे यापेक्षा जास्त वाढून जाते. तर हे वजन एकदम कसे वाढून जाते. त्यामागे काही कारण आहे का ? त्याचेच विश्लेषण ह्या ब्लॉगमध्ये केले आहे. आणि ही समस्या बऱ्याच स्त्रियांना त्रासदायक ठरत असते.
१) हार्मोनल बदल

लग्नानंतर प्रसूतीमध्ये हार्मोनल बदल होत असतो त्याचा अप्रत्यक्ष परिणाम वजनावर होत असतो. तुम्हाला माहिती आहेच प्रसूतीनंतर वजन वाढत असते.
२) निष्काळजीपणा

लग्नाअगोदर मुली ह्या स्वतःच्या प्रकृतीची उत्तम काळजी घेतात. पण लग्नानंतर आणि विशेषतः प्रसूतीनंतर तर ती स्त्री स्वतःच्या वजनाकडे लक्षच देत नाही. पण तिच्यामागे बऱ्याच कामाचा ताण यायला लागतो जसे की, बाळ, घर, नवरा ह्या सगळ्यांना संभाळून स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे तिला शक्यच होत नाही. तिला वेळच मिळत नाही ह्या सगळ्या व्यापातून.
३) झोप खूप कमी घेणे

ज्यावेळी मुलगी तिच्या आईच्या घरी असते तेव्हा ती सकाळी खूप उशिरापर्यंत झोपून राहते. पण सासरी आल्यावर तिला लवकर उठून सर्वच काम करायला लागतात. आणि त्यानंतर गरोदरपणात आणि डिलिव्हरीनंतर जोपर्यंत बाळ १ ते २ वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्या आईची झोप व्यवस्थित होत नसते. झोप कमी घेतल्यावर स्त्रियांचे वजन खूप वाढते.
४) बाहेर खाणे

लग्नानंतर प्रत्येक नवरा- बायकोला गप्पा मारण्यासाठी बाहेर जाऊन खायला खूप आवडते. आणि ते करायलाही हवे. पण त्यामुळे वजन वाढायला आणखी एक कारण मिळून जाते. आणि जेवण झाल्यावर आईस्क्रीम किंवा गोड खाणे. ह्या सर्व गोष्टींमध्ये कॅलरी खूप असल्याने वजन वाढते.
५) वय

जर तुमचे लग्न उशिरा झाले तर वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण ३० वर्षानंतर स्त्रीच्या शरीरातील मेटाबोलिक रेट कमी होऊन जातो आणि वजन वेगाने वाढायला लागते.
६) सासरचे खाणे

काही वेळा तुम्हाला असे सासर मिळते की, ज्या ठिकाणी खूप कॅलरीयुक्त जेवण घेत असतात. जसे की, मांसाहारी कुटुंब, खूप तेलकट खाणारी, खूप गोड खाणारी, तेव्हा त्या वातावरणात तुम्हालाही ते खावे लागते. त्यामुळेही वजन वाढत असते. आणि तुम्हालाच ते खाणे बनवायला लागते. आणि हळूहळू तुम्हीही ते खाणे खाऊ लागतात.