तुमच्या पतीला या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित असतात

प्रत्येक लग्न तेव्हाच टिकत ज्यावेळी दोघं पती आणि पत्नी त्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक पतीला आपल्या पत्नीकडून काही सामान्य गोष्टी अपेक्षित असतात त्या कोणत्या आपण जाणून घेणार आहोत. या गोष्टी तुम्हांला तुमच्या पतीच्या आणखी जवळ जाण्यास आणि तुमचे नाते घट्ट होण्यास मदत करतील

१. कौतुक आणि दखल घेणे

प्रत्येक पुरुषाला असे वाटत असते की इतर कोणी नाही केले तरी चालेल पण आपल्या कामाचे कौतुक हे आपल्या पत्नीने करावे. आपण केलेल्या चांगल्या कामाची दाखल घ्यावी. आपली पत्नी जशी नेहमी सांभाळून घेते तसे आपल्या कामाचे आपण केलेल्या प्रयतानाचे कौतुक करावे जसे ऑफिस मध्ये मिळालेला पुरस्कार किंवा घरी खास तुमच्यासाठी पदार्थ तयार करण्याचा केलेला प्रयत्न

मित्रांसमोर/नातेवाईकांसमोर कौतुक करणे

ज्यावेळी मित्राबरोबर एखाद्या पार्टीला जाता किंवा एखाद्या घरगुती गेट -टूगेदर मध्ये तुम्ही त्यांच्या दिसण्याचे त्यांचा चांगल्या कामाचे त्यांच्या तुमच्यावर असलेल्या प्रेमाचे तुम्ही कौतुक करावे असे त्यांना वाटत असते

विश्वास

प्रत्येक पुरुषाला वाटत असते आपल्या पत्नीने आपल्यावर विश्वास ठेवावा. आपल्याबाबत आपल्या नात्याबाबत विश्वास ठेवावा. उगाच कोणत्या गोष्टीची भीती मनात बाळगू नये सिनेमात दाखवत त्याप्रमाणे प्रत्येक पुरुष असतात असे नाही त्यामुळे उगाच मानत पूर्वग्रह ठेवून सगळ्या पुरुषांमध्ये आपल्याला तोलू नये. आपल्या आपल्या बायकोला आपल्या हृदयापर्यंत जाणारा मार्ग माहिती असावा

या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला माहिती आहे ..बरोबर हा मार्ग पोटापासूनच जातो. ही गोष्ट दोघांना लागू पडते. याबाबत दोघांनी प्रयत्न करणे आवश्यक असते

खूप गप्पा

प्रत्येक पतीला हे वाटत असते की आपल्या आपल्याशी खूप आणि वेगवेगळ्या विषयांवर गप्पा माराव्यात. काही उगाच किंवा काही अर्थपूर्ण गप्पा माराव्या. एखाद्या त्यांच्या आवडत्या गोष्टीवर चर्चा कराव्या किंवा कधी उगाच रोमँटिक गप्पा माराव्यात तर कधी उगाच काही खट्याळ बडबड करावी ज्यामुळे तुम्ही कायम तुमच्यातले प्रेम आणि तारुण्य कायम टिकून राहील.

शब्दांविना

काही पतीने असं वाटत असते की आपल्या पत्नीने आपण न बोलता आपल्या मनातल्या गोष्टी ओळखाव्या

नाते टिकवणे हे एकाच्या प्रयन्तने होणारे नसते. वरील सगळ्याच गोष्टी सोप्प्या आणि सहजपणे होणे शक्य नाही परंतु प्रयत्न करणे आवश्यक असते आणि

Leave a Reply

%d bloggers like this: