मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी या गोष्टी करायला प्रोत्साहन द्या

या तंत्रज्ञाच्या युगात मुलांना स्मार्टफोन, टॅबलेट लॅपटॉप विविध गॅझेटबरोबर खेळताना पाहणे हे फार साधी गोष्ट झाली आहे. मुलांना सर्व गॅझेट बद्दल माहिती असणे ही चांगली गोष्ट या खेळाचे किंवा या गॅझेटच्या वापराचे व्यसन त्यांना जडले तर त्यांना ते भविष्यात फार त्यांच्यासाठी शाररिक दृष्टया आणि मानसिक दृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. पुढे अश्या ६ गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मुले गॅझेटऐवजी दुसऱ्या काही गोष्टींमध्ये रस घेतील आणि गॅझेटचे व्यसन जडणार नाही आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल

१. बागकाम

   बागकाम करणे हे आजकाल फार दुर्मिळ होत चालले आहे. जागेच्या कमतरतेमुळे बागकाम करणे अशक्य झाले आहे. जर तुमच्यालहानपणी अंगण किंवा आसपास झाडे लावायला जागा असलेल्या भाग्यवानपैकी असाल तर तुम्हाला या गोष्टीची मजा माहिती असेल. घरात एखादी कुंडी आणून मुलाला त्यात बिया रुजवण्यापासून त्यांचे रोप होईपर्यंत कशी काळजी घ्यायची ते शिकवा त्याचा जोडीने तुम्ही देखील ते करा म्हणजे त्यांना देखील त्यात आवड निर्माण होईल. त्यांचे हात थोडे खराब होतील ते स्वच्छ करत येतील पण त्यातून त्यांना मिळणारा आनंद आणि बी रुजण्यापासून झाड कसे होते याचे मिळणारे ज्ञान हे बहुमूल्य असेल आणि तसेच त्यांना गॅझेटचा विसर देखील पडेल

२. हस्तकला आणि कलाकुसर

त्यांना छोट्या छोट्या हस्तकलेच्या आणि कलाकुसर असलेल्या गोष्टी शिकावा, जसे कागद पासून पक्षी किंवा सजावटीच्या वस्तू तयार करणे. चित्रकला विविध रंगाचा वापर कसा करायचं हे शिकाव. याबाबत हल्ली विशेष वर्ग देखील घेण्यात येतात. अश्या वर्गाना मुलांना पाठवा. यामुळे मुले या वस्तू तयार करण्यात व्यस्त राहतील स्वतःच्या नवनवीन कल्पना लढवतील. यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल आणि मुले आभासी व्हर्च्युअल जगापेक्षा वास्तव जगात रमतील

३. वाद्य शिकणे

मुलांचा कल बघून त्याला एखादे वाद्य शिकण्यास प्रोत्साहन द्या. हल्ली खूप पर्याय उपलब्ध आहेत जसे गिटार पियानो, तबला, बासरी, व्हॉयलीन अशी वाद्य किंवा गाणे शिकायला प्रोत्साहन द्या. वाद्य शिकताना मुलांचा संयम वाढतो. आणि ही गोष्ट त्यांना भविष्यात फार उपयोगी ठरते

४. मैदानी खेळ

मुलांचे लक्ष स्क्रीन वरून हटवून दुसरीकडे वळवण्यासाठी मैदानी खेळायला घेऊन जाणे किंवा इतर खेळ जसे घसरगुंडी सी-सॉ सारखे इतर खेळ असलेल्या ठिकाणी त्यांना घेऊन जा. त्यांना इतर मुलांबरोबर मिसळू द्या. मैदानी खेळ खेळल्यामुळे त्यांचा व्यायाम देखील होईल.

५. वाचन

तुम्ही पुस्तक वाचण्याचे कितीही गॅझेट विकत घेतले तरी पुस्तक हातात घऊन वाचण्याची गंमत काही औरच असते आणि ही गंमत तुमच्या मुलांनी देखील अनुभवावी असे वाटत असले तर त्यांना देखील वाचनाला प्रोत्साहन द्या. वाचनाच्या आवड तुमच्या मुलांमध्ये निर्माण झाल्यावर त्यांना भविष्यात कधीच एकटेपणा जाणवणार नाही

६. वेगवेगळी कामे

वेगवेगळी कामे म्हणल्यावर तुम्हांला वाटले असेल लहान मुलांना काय कामाला लावायचे. पण काम म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना करायला सांगणे जसे पाण्याची बाटली भर, जेवायला बसताना छोट्या-छोटया गोष्टी ने आण करणे तसेच तुम्ही जर कोणता पदार्थ करत असाल तर त्यामध्ये त्यांना त्या सामावून घेणे म्हणजे तुम्ही पोळ्या करत असाल तर एक छोटे लाटणे त्यांना द्या आणि त्यांना त्याच्या पद्धतीने पोळी लाटू द्या ,भाजी निवडत असाल तर त्यानं पण तुमच्याबरोबर काम करायला घ्या, यावर-यावर करताना एक छोटासा झाडू त्यांच्या हातात द्या. यामुळे थोडा पसार होण्याची शक्यता आहे पण मुलांना गॅझेट आणि त्याच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे. 

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

%d bloggers like this: