प्रसूतीच्या वेळी वेदना कमी करण्यासाठी काही हालचाली आणि स्थिती

 

नवीन गर्भ धारण करणाऱ्या स्त्रियांना सुरुवातीला खूपच अडचण येते. बसताना, उठण्यासाठी, झोपण्यावेळी, आणि अशा वेळी त्या स्त्रीला स्वतःच्या तब्येतीपेक्षा बाळाची खूप काळजी वाटते की, ह्याला काही धक्का लागला नसेल ना ! आणि सुरुवातीला पोजीशनही माहित असतात नसतात की, कसे जेवण करायचे, आणि काही स्त्रियांना ह्यात पाठ, पोट किंवा स्नायू दुखत असतात. तेव्हा ह्या ब्लॉगमधून अशा काही पोजिशन त्याच्याने तुम्हाला आराम मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला लेबर पेन ( प्रसूतीच्या कळांचा) त्रास कमी होईल. बाळाचा जन्म सुखकर होईल.

१) बसणे किंवा बसण्याची स्थिती (पोजिशन)

प्रसूतीच्या अगोदर बाळ गर्भात खाली जायला लागते आणि गर्भाचे वजन वाढल्यामुळे त्यावेळी ज्या प्रसूतीच्या कळा होतात त्यापासून अशा बसण्याच्या स्थितीने आराम मिळतो. कारण गर्भाला हळूहळू सवय होत जाते. आणि तुम्हीही बाळाची डिलिव्हरी वेगाने होण्यात मदत मिळते.  आणि ह्यातून पुढच्या बाजूला पडणारे वजन तुम्हाला बॅलेन्स करता येत असल्याने पाठ दुखण्याचा त्रास कमी होतो.   

२) अर्धे बसणे

ह्या बसण्याच्या स्थितीनेही आराम मिळत असतो. तुमचे वजन जर जास्त असेल तर ह्या स्थितीत बसा. आणि असे बसल्याने डिलिव्हरीच्या वेळी अशाच अवस्थेत जर बसावे लागले तर त्यावर सवय होऊन जाते. आणि तुम्ही बसणे आणि अर्धे बसणे ह्या दोन्ही स्थितीचा वापर करू शकता.

३) मोठ्या बॉलचा वापर करून बसणे

हा बॉल थोड्या वेगळ्या प्रकारचाअसतो. ह्यात हवा भरली जाते आणि त्या हवा भरलेल्या बॉलवर तुम्ही बसायचे घाबरू नका हा फुटत नाही. हा बॉल गरोदर मातेसाठीच बनवला असतो. आणि ह्या बॉलवर बसून तुम्ही डिलिव्हरीच्या वेळी असणाऱ्या स्थितीचा सरावही करू शकता. ह्या बॉलवर बसून काही स्त्रियांना तणावरहित शांतता मिळाली आहे. आणि बसण्याच्या वेळी अगोदर कुणाची तरी मदत घ्यायला विसरू नका.

४) उभे राहणे

ह्या स्थितीतून स्त्री जमिनीकडे जोर लावते ह्यामुळे तिला बाळाच्या वजनापासून थोडा आराम मिळतो. ज्या महिलांचे गर्भाचे वजन खूप वाढल्याने पाठदुखी होते व प्रसूतीच्या कळा येतात त्यांच्यासाठी ही क्रिया केली जाते.

५) पाठीवर झोपणे

ह्या क्रियेतून सुद्धा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला त्रास किंवा दुखत असेल तर आराम मिळवू शकता. पायालाही ह्यातून आराम मिळतो.

६) गुडघ्यावर बसणे

 

जर जास्तच त्रास होत असेल तर ह्या स्थितीत बसण्याचा प्रयत्न करा.

Leave a Reply

%d bloggers like this: