अनियमित येणाऱ्या मासिकपाळीसाठी घरगुती उपाय

बहुतेक स्त्रिया त्या काही दिवसांना घाबरतात आणि मनोमन मासिकपाळीचे चार दिवस आले नाहीतर किती बरं होईल. असं म्हणत असतात पण मासिकपाळी नियमित येणे हे स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट असते. ते दिवस आले नाहीतर किती बरं होईल म्हणतात आणि मासिकपाळी वेळत आली नाहीतरी घाबरतात. खरंतर रजोनिवृत्तीच्या वया आधी अनियमित मासिकपाळी हे काळजी करण्यासारखीच बाब असते. नियमित मासिकपाळी येणे म्हणजे एकदा मासिकपाळी आल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा मासिकपाळी येणे होय. काही स्त्रियांना २९,३०, ३२ दिवसांनी मासिकपाळी येते ही काळजी करण्यासारखी बाब नाही. परंतु ज्या स्त्रियांना ४५,५० दिवसांनी किंवा दोन किंवा तीन महिन्याने जर मासिकपाळी येत असेल तर डॉक्ट्रांनाच सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच मासिकपाळी नियमित येण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत त्यामुळे मासिकपाळी येण्यास मदत होत आणि नियमित होते. हे घरगुती उपाय कोणते ते आपण पाहणार आहोत

१. हळद

हळदीमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित करून आपल्या मासिक पाळीत नियमित होण्यास मदत होते .तसेच मासिकपाळीच्या वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गुणधर्म देखील हळदीमध्ये असतात आहेत. आपल्या डॉक्टराच्या सल्ल्याने हळदीचा वापर रोज केला जाऊ शकतो. हळद तुम्ही दुधातून, मध बरोबर किंवा गुळाबरोबर घेऊ शकता

२. कोरफड

मासिक पाळी अनियमिततेवर उपचार करण्यासाठी कोरफड पान त्याचा गर हा उपयुक्त ठरतो. थोडा कोरफडीच्या गरामध्ये एक चमचा मध घालून हे मिश्रण दररोज सकाळी नाश्त्याच्या आधी घ्या असे एक महिना केल्यावर याचा परिणाम दिसू लागेल. पण जर हे घेताना काही त्रास वाटला तर मात्र हे घेणे बंद करा. तसेच मासिकपाळी चालू असताना मात्र हे मिश्रण घेऊ नका

३. कच्ची पपई

मासिकपाळीची तारीख निघून गेली असले आणि गरोदर नसल्याची खात्री करूनच कच्च्या पपईचे योग्य प्रमाणात सेवन करा. तुम्ही पपईचे बारीक तुकडे करून गोड दह्या बरोबर खाऊ शकता. हा प्रयोग एकदा किंवा दोनदाच करावा सतत करू नये. कारण कच्ची पपई ही अति उष्ण असते त्यामुळे मूळव्याध किंवा गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उपायाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक असते

४. आलं

आले हे फक्त अनियमित मासिकपाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त नसून मासिकपाळीदरम्यान येणारे पेटके (cramps) कमी करण्यास मदत करते, अर्धा चमचा किसलेले आले घ्या आणि पाण्यात काही काळ उकळा आणि त्यात थोडी साखर घाला आणि असे मिश्रण हे दिवसातून एकदा तरी घ्या.

५ दालचिनी

दालचिनी ही गरम प्रकृतीची असते त्यामुळे याचा देखील मासिकपाळी नियमित करायला उपयोग होतो शरीरावर तापमानवाढ होण्याचा परिणाम असा होतो. जर तुम्ही रोज दूध पीत असाल तर तर त्यात थोडी दालचिनी पावडर टाकून पीत जा. जर तुम्ही दालचिनीच्या काही काड्या रोज पाण्यातून उकळून चहासारखे ते मिश्रण घेतले तर त्याच उपयोग मासिकपाळी नियमित करण्यास होतो.

६ . योगा आणि ध्यानधारणा

ताण-तणाव हे अनियमित मासिकपाळीच्या मुख्य कारण असते, ताण हे आपल्या आपल्या संप्रेरकांचे( हार्मोनचे) संतुलन बिघडवते. योगा आणि ध्यान-धारणा हे मानसिक ताण-तणाव कमी करते तसेच योगा मासिकपाळी नियमित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो

वरील उपाय करताना लक्षात ठेवा एका वेळी एकाच उपाय करा योग आणि ध्यानधारणा रोज केले तरी चालेल परंतु इतर उपाय एकावेळी एकाच करावा कारण हे सर्व पदार्थ मूलतः उष्ण गुणधर्माचे असल्याने त्याचा प्रमाणापेक्षा अति वापर हे दुसऱ्या दुखण्यास निमंत्रण ठरू शकते.

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: