तुम्हाला तुमच्या बाळाविषयी एक आश्चर्य वाटले असेल किंवा शंका असेल की, जन्मापासून बाळाला सहा महिन्यापर्यंत पाणी का दिले जात नाही. ही शंका सर्वच मातांना असेल. तर त्याचे कारण असे आहे की, जर त्यांना तुम्ही स्तनपान करत असाल तर बाळाला दुधातून पाण्याची तहान भागून जाते. आणि खूप डॉक्टरांचे आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवजात बाळाला ह्या पाण्यातून डायरिया होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्याचबरोबर इंटोक्सिकेशन सुद्धा त्यांना होऊ शकते. म्हणून कमीतकमी सहा महिन्यापर्यंत बाळाला पाणी देत नाहीत.
नवजात बाळाला पाण्याची आवश्यकता का नसते ?

आईच्या स्तनाच्या दुधात खूप प्रमाणात पाणी असते. दुधाच्या ८० टक्यात पाणीच असते. त्यामुळेच त्यांचे ह्या स्तनपानाच्या दुधातून पोषणही होते आणि तहानही भागते. त्याचबरोबर स्तनाच्या दुधात अँटीबॉडीज असतात त्यामुळे बाळाची इम्यून सिस्टम खूप मजबूत होते. आणि बाळ इन्फेक्शन पासून वाचते. आणि ह्या गोष्टी नॉर्मल पाण्यातून मिळत नाहीत. आणि ह्या दुधात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, ह्यांचाही मात्रा असते.
बाळाला पाणी पाजण्यासाठी ६ महिने थांबा

ह्यावेळेत पाणी पाजू नका. नाहीतर बाळ आजारी पडेल आणि बाळाची रोगप्रतिकार शक्ती विकसित झाली नसते. म्हणून बाळाला सहा महिने पाणी पाजू नये.
अडचणीच्या वेळी पाण्याची आवश्यकता असेल तर

जागतिक आरोग्य संघटना सांगते की, कितीही अडचण आली तरी पाणी पाजू नये. खूप ऊन पडत असेल किंवा काहीही झाले तरी पाणी पाजू नये. जर फार्मुला दूध देत असाल तर ह्याची खबरदारी घ्यावी.
नवजात बाळाला पाणी दिल्यावर काय होऊ शकते

१. डायरिया होऊ शकतो कारण हा पाण्याच्या बॅक्टरीया ने बाळाला लगेच होतो. आणि मैल्नूट्रिशन पाणी कितीही स्वच्छ असेल तरीही बाळाला त्याचा त्रास होईल.
२. तुम्ही बाळाला स्तनपान ऐवजी फॉर्मुला दूध देत असाल तर पाणी खूप उकळून घ्यावे. ह्या गोष्टी जोपर्यंत बाळ सहा महिन्याचा होत नाही तोपर्यत अशी समस्या असते.
३. बऱ्याचदा बाळ अचानक उलट्या करायला लागते. काहीही खाल्ले तरी उलट्या करते. त्याचे कारण पाण्याचेही असते.डॉक्टरांचे बिल वाढवू नका. अगोदरच दक्षता घ्या.