पती-पत्नीतील सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय

तडजोड करणे, त्याग करणे, क्षमा करणे, सहनशीलता आणि कौतुक – दीर्घकाळ नाते टिकण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी आहेत. पण दोनही लोक एकसारखे नाहीत आणि कोणीही परिपूर्ण नाही. त्यामुळे पती पत्नीच्या नात्यात देखील काही सामान्य समस्या असतात त्या कोणत्या आणि आणि त्या सोडवण्यासाठी कोणत्या उपायांचा वापर करावा हे जाणून घ्या ज्यामुळे तुमचे नाते टिकून राहील आणि आणखी फुलेल.

१. कौतुकाचा  अभाव

पती किंवा पत्नीने केलेल्या कामासाठी पावती किंवा कौतुक नसणे ही पती-पत्नीच्या नात्यातील मुख्य समस्या असू शकते कदाचित असू शकते. जर दोघे नोकरी करणारे असल्यास. पती ज्यावेळी घरकामात मदत करतो आणि या गोष्टीचं कौतुक होत नाही.     तसेच घरातली कामं करून नोकरी करणाऱ्या पत्नीचे कौतुक होत नाही किंवा पती कामात मदत करत नाही त्यावेळी गैरसमज निर्माण होतात. असे गैरसमज होऊ नये आणि एकमेकां मदत व्हावी यासाठी पुढे उपाय देण्यात आला आहे

उपाय

दोघांनी घरकामाची जबाबदारी समसमान वाटून घ्यावी. त्यामुळे एकावरच कामाचा भार पडणार नाही तसेच कामाची यादी करावी त्यानुसार कामे करण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्या गोष्टीची उघडपणे चर्चा करावी. ज्यामुळे मनात काही राहून नंतर त्याचा स्फोट होणार नाही. आणि जे काम कोणी करू इच्छित नाहीत, ते नेहमी आळी -पळीने करावे.

२. व्यस्त वेळापत्रक

 

सध्याचा काळातील पती-पत्नीमधील ही समस्या आहे . समजा, एखाद्या आठवड्यात किंवा महिन्यात नेहमी पेक्षा जास्त काम असेल तर त्या कामाच्या तणावात तुम्ही घरी वेळ देणे शक्य होत नाही तसेच कामाच्या ताणामुळे चीड-चीड होते आणि त्या भरात तुम्ही तुमच्या जोडीदाराला काहीतरी उलट -सुलट बोलता आणि दुखावता  त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असते.

उपाय

ही समस्या तुम्ही संवादानेच सोडवू शकता. तुम्हांला काम असेल त्यावेळी तुम्ही ती गोष्ट तुमच्या जोडीदाराला आधीच नीट सांगून ठेवा म्हणजे त्यानुसार तुमचा जोडीदार सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित आधीच प्लॅनींग करून ठेवेल  आयत्यावेळी कोणावर ताण येणार नाही

३. आर्थिक समस्या

बऱ्याच जोडप्यामध्ये आर्थिक नियोजनांवरून वाद-विवाद होत असतात. दोघांपैकी एक अति पैसे खर्च करतो तर एक गरजेच्या गोष्टीमध्ये देखील कंजूसपणा करतो, आर्थिक नियोजन न केल्यामुळे भविष्यात पैश्याच्याबाबतीत अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. अशी वेळ येऊ नाय म्हणून पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात 

उपाय

याबाबतीत तुम्हाला एक टीम म्हणून काम करणे गरजेचे असते. कारण एक जबाबदार जोडपे तसेच कुटूंबाचा भाग म्हणून तुम्हांला आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. या आर्थिक नियोजनामध्ये दोघांनी एकमेकांचा मतांचा आदर करावा. एखादा निर्णय पटत नसेल तर त्यावर चर्चा करावी आणि मार्ग काढावा. आणि या समस्येबाबत हलगर्जीपणा करू नये कारण आर्थिक नियोजन वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात 

५. विसंवाद

पती-पत्नींमधील भांडणे ही गैरसमजतून होतात आणि हे गैरसमज संवादाच्या अभावाने होतात. आजकाल दोघे कामामध्ये इतके व्यस्त असतात कि त्यांना धड एकमेकांशी बोलायला वेळ होत नाही. आणि एकमेकांच्या बोलण्या मागचा अर्थ समजवून न घेता त्याचे जे अर्थ लावले जातात आणि आणि एकमेकांच्या हेतूबाबत शंका घेतल्या जातात. आणि त्यामुळे समस्या निर्माण होतात.

उपाय

आठवड्यातून एक दिवस तरी जोडीदारासाठी वेळ काढणे अवश्य काढा आणि त्या दिवशी फक्त आपल्या जोडीदाराबरोबर कुटूंबाबरोबर वेळ घालवा. एकमेकांचे म्हणणे ऐका, तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा तुमचे करियरची तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील पुढील नियोजनाबाबत चर्चा करा. यामुळे तुमच्यातले विसंवाद कमी होऊन सुसंवाद वाढेल आणि एकमेकांच्या मनातील गोष्टी कळतील

६. पालक म्हणून दोघांची असणारी निराळी मते

तुमच्यापैकी एक मुलांचे संगोपन कडक शिस्तीने करू इच्छितो तर दुसरा मुलांच्या कलाने घेण्याच्या मताचा असतो. एका पालकाला वाटते मुलांने खेळांमध्ये पुढे असावे तर एकाला वाटते की त्याने फक्त अभ्यास करावा

उपाय :

असे वाद-विवाद व्हायला लागल्यावर दोघांनी शांत बसून एक-एकाने आपले म्हणणे मांडावे आणि ते मुलाच्या दृष्टीने कसे योग्य आहे हे जोडीदाराला समजावून सांगावे. कारण याबाबत तुमचे वाद होत राहिले तर त्याचे परिणाम मुलावर आणि त्याचा भविष्यावर होणार असतात त्यामुळे हे वाद न करत मुलाच्या योग्य संगोपनावर भर द्यावा 

Leave a Reply

%d bloggers like this: