गर्भावस्थेत वजन वाढू नये यासाठी सोप्या टिप्स

तुम्ही लवकरच एका छोट्याश्या,नविन पाहुण्याचे स्वागत करणार आहात आणि अगदी आतुरतेने त्याच्या आगमनाची वाट पाहताय,होय ना? पण त्यासोबतच तुम्हाला आवडो कि न आवडो पण गर्भावस्था आणि वाढते वजन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गर्भावस्थेमध्ये,शरीरात होणारे बदल आणि खाण्याची अनावर ईच्छा यामुळे वजन वाढणे नैसर्गिक आहे. अनेक संशोधनांतून असे समोर आले आहे कि,गरोदर होण्याआधी शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीज पेक्षा जास्तीच्या ३०० कॅलरीजची गरज गर्भावस्थेत असते. 

या काळात वजन वाढणे नैसर्गिक असले तरीही अति वजन किंवा लठ्ठपणा मुळे बेचैनी किंवा गुंतागुंतीची परिस्थिती उदभवू शकते. गर्भावास्थेत,वजन अति प्रमाणात वाढलेलय स्त्रियांना अनेक आरोग्य समस्या जसे कि,प्रसूती दरम्यान गुंतागुंत ,संक्रमण,गरोदरपणातील मधुमेह आणि झोपेत श्वास रोखला जाणे.

काही गर्भस्थ महिलांना प्रीकॅलॅम्पसिया नावाच्या आजाराला सामोरे जावे लागते ज्यात रक्तदाब वाढल्याने सुज येणे,लघवीवाटे प्रथिने बाहेर पडणे असे त्रास होतात,ज्यामुळे आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. यासाठी, तुमचे वजन धोक्याची पातळी ओलांडणार नाही याची काळजी घ्या.

काही स्त्रिया गाभावस्थेत वजन आटोक्यात ठेवण्यासाठी खाण्यावर काटेकोर बंधने आणतात परंतु,असे करण्याने तुम्हाला आणि तुमच्या बाळाला फायदा होण्यापेक्षा नुकसान पोहचू शकते. भरपूर वजन कमी करणे आणि खाण्यावर बंधने आणणे तुम्ही काही महिन्यानंतरही करू शकता पण याचा अर्थ असा नव्हे वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करावे. तुम्ही काही असे मार्ग अवलंबू शकतो ज्याने गर्भावस्थेत तुमचे वजन वाढण्यास आळा बसू शकतो.

१] तज्ज्ञां ची मदत घ्या

गर्भावस्थेत तुम्हाला खास काळजी घेण्याची गरज असते. कोणत्याही डाएटिंग प्लान किंवा वजन कमी करण्याच्या उपायांचा (ते भले हि सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण असले तरीही) तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तज्ज्ञांच्या योग्य सल्ला आणि मार्गदर्शनाखालीच तुम्हाला आणि बाळाला कोणतेही अपाय ना होता योग्य वजन राखले जाऊ शकते.

२] अति खाणे टाळा

या अवस्थेत सतत भूक लागणे साहजिक आहे,उपाशी राहू नका पण अति खाणे टाळा. अति प्रमाणात खाण्याने अपचन ,मळमळ होणे असे त्रास होऊ शकतात. हे टाळण्यासाठी योग्य अंतराने थोडे थोडे खाणे फायद्याचे ठरते.

३] भूक लागेल तेव्हाच खा

तुमच्या गर्भावस्थेत सर्वजण मैत्रीणी,नातेवाईक,हितचिंतक तुमची आणि होणाऱ्या बाळाची चिंता करत असतात. पोटात असणाऱ्या बाळाचे योग्य पोषण व्हावे यासाठी आईने व्यवस्थित खावे असे त्यांना वाटत असते. या गोष्टीच्या दबावात येऊन काही स्त्रिया भूक नसेल तरीही खातात. सर्वांची काळजी आणि प्रेम कौतुकास्पद असले तरीही तुम्हाला भूक लागेल तेव्हाच खा.

४] तुम्हाला किती कॅलरीजची गरज आहे हे जाणून घ्या

प्रत्येकाची कॅलरीजची गरज वेगवेगळी असते . तुमचे वजन आणि उंची किती आहे यावर तुमच्या शरीराला किती कॅलरीजची गरज आहे हे ठरते.हे गर्भावस्थेतही लागू आहे. अधिक कॅलरीज घेणे बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते ,असा गैरसमज अनेकांत आढळतो.पण हे तुमच्या साठी योग्य नाही कारण बाळ सुदृढ असावे असे वाटत असेल तर तुमच्या शरीराला आवश्यक आहेत तेवढ्याच कॅलरीजचे सेवन करा. याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील.

५] खाण्याचा मोहा आवरा

काळात चटपटीत पदार्थ खाण्याची ईच्छा होत असते. पिझ्झा ,आईस्क्रीम असे पदार्थ खाण्यापासून तर तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही आणि यामुळे तुमचे वजन वाढत राहते.अशा चटकदार आणि खमंग खाण्याने तुम्हाला कितीही आनंद मिळत असला तरीही वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्यपूर्ण आणि नैसर्गिक पदार्थ,जसे कि फळे आणि हिरव्या भाज्या,डार्क चॉकलेट ,दूध आणि दुधापासून बनलेले इतर पदार्थ (कमी चरबीयुक्त), ,पालक,स्ट्राबेरी,नारळपाणी,ऑलिव्ह तेल,शेंगदाणा तेल,अख्ख्या धान्यांपासून बनवलेले ब्रेड आणि कडधान्ये यांचा समावेश आहारात करा. या आरोग्यपूर्ण आणि पोषक आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम दिसून येतो.

६]व्यायाम आणि योग

गर्भावस्थेत,तणाव आणि अस्वस्थता यांना बहुतेक स्त्रियांना सामोरे जावे लागते आणि वजन वाढण्याचे हे एक मुख्य कारण आहे. व्यायाम आणि योग करण्याने तुम्ही तणावापासून दूर आणि सुदृढ राहाल. गर्भवती स्त्रियांसाठी खास आणि सुरक्षित असे अनेक व्यायाम प्रकार आहेत.याबद्दल तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता.

गर्भावस्थेचा हा काळ म्हणजे तुच्या आयुष्यातील अतिशय सुंदर दिवस असतात ,त्यांना मनापासून जगा,आनंदी राहा आणि सोबतच आपल्या आरोग्याची हि काळजी घ्या.

Leave a Reply

%d bloggers like this: