नवजात बाळाचे डोके लहान- मोठे का असते ? जाणून घ्या

बाळाच्या जन्म झाल्यावर तुम्ही पाहिले असेल किंवा बघत असाल की, बाळाचे डोके थोडेसे लहान -मोठे दिसते. म्हणजे थोडे वाकडे -तिकडे दिसत असते. खरं म्हणजे नवजात बाळाचे डोके हे कडक झाले नसते ते मुलायम असते. तुम्ही हात लावून बघितले असेलच. किंवा बघा. आणि ते डोकं कडक का नसते तर ज्यावेळी बाळाचा जन्म होत असतो त्यावेळी योनीतुन काढताना सोपे जावे व त्या स्त्रीलाही त्रास होऊ नये. म्हणून.


१. बाळाच्या डोक्यावरती दोन मुलायम स्पॉट असतात त्यांना फोंटनेल म्हणतात.

२. त्यामुळे बाळाच्या डोक्याचा विकास होत असतो.

३. बाळाचे डोकं व्यवस्थित आकार होण्यात ९ ते १८ महिने लागून जातात.

२) जर तुम्ही बाळाचे डोकं जर तीक्ष्ण पहिले असेल तर किंवा आता पहा. तर बाळाचं डोकं हे मागचा आणि साईडचा भाग चपटा दिसतो. ह्याला पोज़िशनल प्लेजिओसेफाली (positional plagiocephaly) असे म्हणतात. ह्याची काही कारणे आहेत.


१. सामान्य कारण असे की, बाळ एकाच स्थितीत (पोजिशन) मध्ये झोपत असते.

२. तुम्ही जेव्हा बाळाला झोपवत असता त्यावेळी त्यावेळी ज्या विशिष्ट भागावर दबाव पडून तो भाग बाकीच्या भागापेक्षा चपटा होऊन जातो.

३. ह्यामुळे बाळाच्या डोक्याला काहीच समस्या येत नसते. ती प्रक्रिया आहे.

४. काही कालावधीनंतर बाळाचं डोकं सामान्य आकार घेऊन ठीक होते.

जर डोक्याचा आकार खूपच लहान-मोठा असेल तर


१. ह्यासाठी अगोदर तुम्ही बाळाची झोपण्याची पोजिशन बदलू शकता.

२. लक्ष असू द्याकी बाळ एकाच भागाच्या स्थितीत झोपून राहणार नाही.

३. तुम्ही बाळाला काही वेळ पोटावर झोपवू शकता जेणेकरून डोक्यावर थोडासा दबाव कमी होईल.

४. आणि जर ४ महिन्यानंतर बाळाचे डोकं ठीक आकारात येत नसेल तर एक विशिष्ट आकाराचे हेल्मेट बनवले आहे. ते डॉक्टरांकडून (लहान बाळांचे डॉक्टर) तुम्ही घेऊ शकता. हे असे हेल्मेट आहे की, २३ तास त्याला घालून रहावे लागेल.

५. हे हेल्मेट बाळाला १ वर्ष झाल्यानंतर घातल्यावर उपयोग होत नाही.

टॉर्टिकॉलिस(torticollis)


काही बाळांमध्ये, काही डोक्याचे स्नायू मध्ये डिफेक्ट राहून जातो. म्हणून बाळाचे डोके एका बाजूला झुकून जाते. ज्यामुळे बाळाचे डोके विचित्र दिसते, पण फिजिकल थेरपीने ते व्यवस्थित होऊन जाते. 

Leave a Reply

%d bloggers like this: