नैसर्गिक प्रसूती होण्याचा प्रत्येक स्त्रीचा अधिकार असतो. आणि जर खरंच तिला व तिच्या बाळाला काही धोका असेल तेव्हाच डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूती करण्याचे ठरवले पाहिजे. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नैसर्गिक (नॉर्मल ) प्रसूतिविषयी सांगितले आहे. नैसर्गिक प्रसूतीमध्ये बाळ कसे योनीतुन बाहेर निघते. आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर स्त्रीच्या शरीरात काय बदल होत असतात. आणि तिला नॉर्मल प्रसूतीनंतर कसे वाटते तिची प्रकृती कशी राहते. आणि किती कालावधीत ती ठीक (रिकव्हर) होते.

१) नॉर्मल प्रसूती झाल्यावर स्त्रीला वारंवार लघवीला जावे लागते. कारण तुमचे शरीर आवश्यक नसणारे घटक तुमच्या शरीरातून काढत असते. त्यामुळे ते किडणीद्वारे फिल्टर होऊन लघवीच्या स्वरूपात बाहेर येत असते. ह्यात रक्त, प्रोटीन, आणि चरबीचे मिश्रण असते.

२) ह्या नंतर स्त्रीला खूप घाम येत असतो. कारण सर्व शरीरातली घाण घाम याद्वारेच निघते असते. म्हणून एकदम घाम का येतोय ह्यावरून घाबरू नका.
३) आपल्या शरीराच्या काही भागात सूज अजूनही असू शकते. पायात आणि इतर भागात. कारण प्रसूतीनंतर शरीरात बदल होत असल्यामुळे असे होत असते. आणि काही वेळा ही सूज गरोदरपणाच्या वेळी होती त्यापेक्षा जास्त होऊ शकते. काही दिवसानंतर ती सूज आपोआप कमी होऊन जाते.

४) तुम्ही स्तनपान करत असतात म्हणून तुम्हाला ह्यावेळी खूप तहान लागते. त्यामुळे स्तनपान करताना पाणी घेऊन बसावे. जेणेकरून तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी व्हायला नको.
५) काही दिवसपर्यंत तुमच्या स्तनात दुखणे राहील. किंवा सुजून सुद्धा जातील. कारण तुमच्या स्तनात दूध यायला सुरुवात झाली असते म्हणून असे होत असते. आणि त्याचबरोबर स्तनाग्रमधेही खूप वेदना होत असते. पण हळूहळू दिनचर्या व्यवस्थित होऊन आणि तुम्हालाही त्याची सवय होईल.

६) खोकणे, शिंका येणे, हसणे, जर ह्या क्रिया करताना लघवी निघून जात असेल तर ते नॉर्मल आहे कारण तुमच्या मूत्राशयावर गरोदरपणाचा दबाव पडत असतो. आणि त्यामुळे तिथले स्नायू थोडे कमजोर होऊन जातात. जर थोड्या नॉर्मल शारीरिक क्रिया केल्यात तर हा त्रास लवकर निघून जाईल. नाहीतर हळूहळू हे ठीक होऊन जाते.
७) तुमच्या गर्भाशयाच्या आतली जी पातळ कोशिका असते ती निघायला सुरुवात होऊन जाते. आणि हे मासिक पाळी सारखे वाटत असते. आणि ते योनीतुन बाहेर निघत असते. असे ६ आठवडे पर्यंत सुरु राहते. सुरुवातीला हा स्त्राव लाल दिसतो आणि नंतर हळूहळू रंग हलका होतो.

८) नैसर्गिक प्रसूतीमध्ये योनीचे द्वार आणि नितंबाचे द्वार थोडे फाटून जाते. पण ते काही दिवसानंतर ठीक होऊन जाते. ह्यात जी टाके लावली असतात ती सुरुवातीला दुखतात पण नंतर ठीक होतात.

ह्या गोष्टी तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यावर तुमच्यासोबत घडत असतात. त्यामुळे ‘असे अचानक माझ्या शरीरात काय व्हायला लागले’ म्हणून घाबरून जाऊ नका. आम्ही आशा करतो की, प्रत्येक स्त्रीची नैसर्गिक प्रसूती व्हायला हवी. आणि तो तुमचा हक्क आहे.