बाळाची नखं ह्याप्रकारे काढा : बाळाला त्रास होणार नाही

गरोदरपणाबरोबर तुमच्यावर अशा अनेक जबाबदाऱ्या येतात की तुम्हाला जबाबदारी अंगावर घेण्याचं महत्व कळू लागतं. आणि तुमच्या छोट्या देवदूताच्या येण्यानंतर तर हे आणखीनच अवघड होत जातं. तुम्हाला अगदी तुमच्या दिनचर्येपासून तुमच्या जगण्याच्या पद्धतीपर्यंत सगळं बदलावं लागतं. नखं कापणे खूप साधी गोष्ट वाटते पण बाळाचे नखं कापणे एक दिव्यच असते. आणि तुमचाही त्यात जीव घाबरतो म्हणून हा लेख.


तुम्हाला सर्वात आधी बाळाचा आणि त्याच्या गरजांचा विचार करावा लागतो आणि मग तुम्ही नवीन गोष्टी शिकू लागता. तुमच्या बाळाला पाजण्या/भरवण्यापासून त्यांची शारीरिक स्वच्छता राखण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी तुम्ही कोणत्या न कोणत्या प्रकारे शिकून घेतात.  


तुमच्या बाळाची नखं व्यवस्थित ठेवणे हे एक अवघड काम आहे आणि बऱ्याच आयांना ते करायच्या योग्य पद्धती माहिती नसतात. सर्वसाधारण प्रौढ माणसांपेक्षा नवजात बालकांची नखे नाजूक आणि जास्त वाढ असणारी असतात. आणि म्हणूनच, त्यांची निगा राखताना काळजी घेणं आवश्यक आहे.

बाळाची नखं बारीक ठेवणे महत्वाचे असते. स्नायूंवर नियंत्रण नसल्याने त्यांच्या हाता-पायांच्या होणाऱ्या हालचालीमुळे त्यांच्या स्वत:च्याच अंगावर ओरखडे उटू शकतात.

जरी हे अवघड वाटत असलं तरी नीट काम केल्यास ते इतकंही अवघड नाही. आमच्याकडे तुमच्यासाठी आहेत ३ उपाय ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बाळाच्या नखांची निगा राखू शकता.

१) नखं घासून गुळगुळीत करा


तुमच्या बाळाची नखं कापण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे खास बनवलेला एमरी बोर्ड वापरून बाळाची नखं घासून गुळगुळीत करणे. हा उपाय बाकीच्या उपायांच्या तुलनेत थोडासा वेळकाढू असला तरी त्याची उपयुक्तता शेवटीच तुमच्या ध्यानात येईल. मात्र हे करताना नखाखालची नाजूक कातडीला इजा न करण्याची काळजी घ्या नाहीतर ते (तुमच्या बाळासाठी) त्रासदायक ठरू शकते.

२) लहान मुलांसाठीचा उत्तम नेल-क्लीपरच वापरा


बाजारात लहान मुलांची नखे सहजपणे कापता यावीत याचसाठी तयार केलेले बरेच नेल-क्लीपर्स आहेत. पण ती वापरावीत कशी? सुरुवात अशी करा जसे तुम्ही स्वत:चीच नखे कापत आहात. कापण्यापूर्वी बोटाची पेरं हलकीशी आतल्या बाजूला दाबा जेणेकरून नखे कापताना बोटाची कातडी कापली जाणार नाही. पायाची नखे कापण्यापूर्वी बाळाचा पाय घट्ट धरा.

३) बाळ झोपेत असतानाच नखे कापा


जर तुम्हाला बाळ जागे असताना त्याची नखं कापण्याची भीती वाटत असेल तर ते झोपण्याची वाट बघा. जर तुमचं नशीब जोरावर असेल तर तुमच्या बाळाला न उठवता तुम्ही त्याची नखे कापू शकाल. हे काम स्वच्छ प्रकाश असतानाच करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: