या करता बाळाच्या तोंडाची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

जेव्हा मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात दिसू लागतात, तुम्ही तुमच्या बाळासाठीचा पहिला टूथब्रश आणि पेस्ट आणता. तुम्ही डॉक्टरांना विचारता आणि आपल्या लहानग्यासाठी उपलब्ध असलेला बेस्ट, सगळ्यात सेन्सिटीव्ह ब्रश विकत आणता. या सगळ्यात तुम्ही एखादी छोटी गोष्टदेखील विसरत नाही. पण बाळाचे दात येण्याआधी काय? दात येण्याआधीच्या काळातील तोंडाच्या स्वच्छतेबद्दल तुम्ही कधी विचार केलाय?

जरी तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी याचा उत्तर ‘हो’ म्हणून दिलं तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. पण, खरंतर आपल्यापैकी बहुतांश लोकांना असं वाटतं की दात येण्यापूर्वी काही करण्याची आवश्यकता नसते. पण आपलं चुकतय. तोंडाची ही स्वच्छता दात येण्यापूर्वी आणि ते आल्यानंतर सारखीच महत्वाची आहे.

याची कारणं पुढीलप्रमाणे:

१. पॅथॉजन्स

नव्या अभ्यासाअंती असं दिसून आलंय की बाळाच्या तोंडात लहानपणापासूनच मोठ्या प्रमाणात बॅक्टरीया आणि बुरशी (fungus) असते. या पॅथॉजन्समुळे बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी इन्फेक्शन्स होऊ शकतात. याच्यामुळे भविष्यात डेंटल कॅव्हिटी होण्याचाही धोका संभवतो. संशोधक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाच्या हिरड्या ओल्या फडक्याने पुसण्याने या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पॅथॉजन्सचा नायनाट होऊ शकतो.

२. साखर

गोड पेयं आणि अन्नपदार्थांमधील आम्लामुळे दाताचा ऱ्हास/विघटन होऊ शकते. मात्र लहान मुलांना गोड पदार्थ आणि ज्यूस खूप आवडतात. तुमच्या बाळाच्या वाट्याला कमी त्रास यावा यासाठी त्यांचं गोड खाणं कमी करण्याचा प्रयत्न करा. गोड पेयं एका बैठकीत संपवली जातील असा प्रयत्न करा जेणेकरून दातांचा आम्लांशी कमी संपर्क येईल. खाण्यानंतर त्यांचे दात आणि तोंड पुसा, धुवा किंवा ब्रशने घासा.

३. सवयी

बाळाचं तोंड धुण्याची सवय लागण्या एक मोठा फायदा म्हणजे तुमच्या बाळाला सुरुवातीपासूनच तोंड धुण्याच्या संवेदनेची सवय लागेल. याच्यामुळे, जेव्हा दात येतील तेव्हा बाळाला दात घासण्याची सवय लावणे सोपे जाईल. हिरड्या चोळण्याची सवयदेखील या बाबतीत फायदेशीर ठरेल. 

तोंडाची उत्तम निगा राखणे बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. बाळाला दात नाहीत असं म्हणून हे काम न टाळू नये.

Leave a Reply

%d bloggers like this: