तुमच्या बाळाच्या बाबतीत टाळायच्या ५ गोष्टी

आई झाल्यावर ‘हे असं कर’ किंवा ‘हे असं करू नको’ असे सल्ले तुम्हाला तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांकडून नेहमीच मिळतील. जसे की ‘बाळाला घट्ट गुंडाळून ठेऊ नको’, ‘बाळाला बाहेर नेऊ नको’, ‘बाळाला पुरेशी हवा मिळेल याची काळजी घे’, इ. तेव्हा काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतात. त्या खालील प्रमाणे

तुमच्या बाळाच्या बाबतीत टाळायच्या ५ गोष्टी आणि त्याची कारणे:

१) अनोळखी व्यक्तींना तुमच्या मुलांचा पापा घेऊ देऊ नका

जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यात बाळ आजारी पडण्याची दाट शक्यता असते कारण या काळात ते कोणत्याही प्रकारच्या बक्टेरिया किंवा व्हायरसेस यांच्या संपर्काशी अति-संवेदनशील असतात. जेव्हा कोणीतरी ‘तुमचं बाळ किती गोड आहे’ असं म्हणतं तेव्हा पुढे काय होणार याची तुम्हाला कल्पना असतेच (बाळाला जवळ घेऊन कुरवाळणं आणि ‘पापा’ घेणं)! म्हणूनच, तुम्ही शक्य तितक्या प्रकारे हे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरीही कोणी तुमच्या बाळाला जवळ घेत असेल, त्यांचे हात स्वच्छ धुतलेले असतील याची काळजी घ्या.

२) डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स चुकवू नका

पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या रेग्युलर अपॉइंटमेंट्स घेणे आणि दुसरी गोष्ट कि त्या कधीही न चुकवणे. तुमचं बाळ भलेही तुमच्या बघण्यातलं सगळ्यात निरोगी/गुटगुटीत बाळ असेल, डॉक्टरांकडून ठराविक काळात चेक अप करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला बाळाच्या एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटत असेल किंवा सगळं ठीक आहे असेदेखील वाटत असेल तरी त्याबद्दल डॉक्टरांना विचारणे हाच ते जाणून घ्यायचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच, तुमच्या मोबाईल किंवा कॅलेंडरवर याचे रिमाइंडर (reminder) लावून ठेवा व या अपॉइंटमेंट्स चुकवू नका.

३) अस्वच्छ डायपर्स खूप वेळ अंगावर ठेवू नका

मुलं जर डायपर्स घाण करणारच असतील तर उगाचच का ते सारखे बदलावेत नाही! चूक! तुमचं बाळ ते अनकर्म्फर्टेबल (uncomfortable) असल्याचं (बोलून) सांगू शकत नाही, पण घाण झालेले डायपर्स खूप वेळ तसेच राहू दिल्यानं डायपर रॅशेस किंवा इन्फेक्शन होऊ शकते. म्हणूनच ठराविक वेळाने/नियमित डायपर्स बदलत रहा आणि तुमचे बाळ आनंदी राहील आणि मोकळेपणाने हालचाल करू शकेल याची काळजी घ्या.

४) पॅसिफायर (pacifier) देणे टाळा

बाळ रडू लागले की पालक पहिल्याप्रथम त्या बाळाला पॅसिफायर (pacifier) देतात. जर तुमचे बाळ भुकेले असल्यामुळे रडत असेल तर त्याला पाजण्याऐवजी पॅसिफायर देण्याची चूक करू नका. लहान वयापासून पॅसिफायर वापरल्यामुळे बाळांचा पाजण्याच्या वेळान्बद्दल गोंधळ उडू शकतो. त्याऐवजी बाळाला स्वत: किंवा बाटलीने पाजा कारण तुमच्या बाळाला इतर कशाही पेक्षा तुमच्या प्रेमाची आणि अंगच्या उबेची जास्त गरज असते.

५) बाळाला पालथं झोपवू नका

एका अंगावर किंवा पालथं झोपल्याने मुलांना (विशेषतः एक वर्षाखालील) SIDS (सडन इन्फन्ट डेथ सिंड्रोम -Sudden Infant Death Syndrome) होण्याची शक्यता वाढते. SIDS ची खरी करणे अज्ञात आहेत. मात्र बाळाला कपड्यात व्यवस्थित लपेटून ठेवणे किंवा बाळाला पाठीवर झोपवणे यासारखे उपाय केल्यास बाळाला SIDS होण्याची शक्यता कमी असते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: