या १० गोष्टी पतीसोबतच्या भांडणात कधी ही करू नका

प्रेम परिकथे सारखे असते जे तुम्हाला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते आणि लग्नबंधनात अडकल्या नंतर जाणवते कि वास्तव नेहमीच मखमली नसते. तुमच्या जोडीदारावर प्रेम करणे म्हणजे तडजोडीच्या महासागरात उडी घेणे आणि खूप संयम आणि समजदारीने वागणे. तुम्हाला वाटते ते नेहमीच घडून येत नाही. दोन व्यक्ती नेहमी सोबत राहत असतांना वाद होणे साहजिक आहे. सहजीवनात खूप वेडीवाकडी वळणे येतच असतात.

कधी कधी जोडीदाराचे वागणे इतके विचित्र असते कि काही समजणे अवघड होऊन बसते आणि तुमच्या भावनांचा उद्रेक होतो आणि भांडण होते. अशी भांडणे नकोशी वाटतात आणि तुम्हा दोघांतील वादांचे आणखी एक मोठे कारण हि छोटी छोटी भांडणे ठरतात. त्यामुळे भांडणात भावना अनावर झाल्या तरीही आपण काय बोलतो आहोत याचे भान असू द्या.

वाद चालू असतांना या गोष्टी ‘कधीही’ बोलू किंवा करू नका.

१.’नेहमीच’ आणि ‘कधीच ‘ या शब्दांचा वापर टाळा

एकमेकांना दोष देण्यात काहीही मजा नसते. तुमच्या पतीलाही हा प्रकार नकोच असतो. ‘नेहमीच ‘ आणि ‘कधीच’ या शब्दांचा वापर करून तुमचा जोडीदार कुठल्या गोष्टी नेहमी करतो आणि कुयहल्या कधीच करत नाही हे दाखवून देणे आणि तुमच्या नात्यात जे काही वाईट होते आहे त्यासाठी फक्त तुमचे पतीला जवाबदार ठरवणे. असे बोलून परिस्थिती आणखी चिघळते कारण,गैरसमज आणि वादांचा दोष पूर्णपणे स्वतःवर घेणे कुणालाही आवडत नाही.

२. अपशब्दांचा वापर टाळा

तुमच्या जोडीदाराला नेहमी ज्या नावाने हाक मारता ,भांडणात हि त्याच नावाचा वापर करा. वाईट ,अपशब्दांचा वापर करून जोडीदाराचा पारा चढवू नका. तुमच्या भांडणांचे हे एक कारण असेल तर स्वतःची चूक लगेचच सुधारा.मतभेद होऊ नयेत यासाठी काही गोष्टी ठरवून टाळा.

३. ‘सॉरी ‘ म्हणण्याने मनाच्या जखमा नेहमी भरून येत नाहीत

तुम्ही पतीचे मन दुखावले असेल तर फक्त कोरडे ‘सॉरी ‘ म्हणू नका तुम्ही चुकला असाल तर मनापासून त्याची माफी मागा. तुमच्या साठी तो आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती आहे हे त्याला लक्षात आणून द्या आणि त्याचे मन ज्यामुळे दुखावले आहे त्या गोष्टी परत कधीही ना बोलण्याचे वचन द्या.

४. टोमणे मारणे सोडून द्या

वाद चालू असतांना तुमचे हताश होणे साहजिक आहे. पतिला टोमणे मारून घायाळ करणे बऱ्याच स्त्रियांसाठी रामबाण अस्त्र असते पण हे अजिबात करू नका कारण सततच्या टोमण्यांनी तुमचे पती वैतागतील आणि भांडण जास्त वाढेल.

५. चुकीचे अर्थ काढू नका

 

अति विचार करून कोणत्याही चिंकीच्या निष्कर्षापर्यंत पोचू नका. जोडीदाराशी बोलण्याअगोदर संयम ठेवा आणि समतोल विचार करा.

६. भांडणापासून पळ काढू नका

झालेल्या भांडणाबद्दल तुमच्या जोडीदाराला तुमच्या सोबत चर्चा करायची असेल तर त्याला नक्की करू द्या. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता हे तुम्हाला माहित आहेच. वादाच्या कारणाबद्दल विचार केल्यानंतर तुमच्याशी बोलून चर्चा करण्याची मोकळीक त्याला द्या. अशा वेळी माघार घेणे म्हणजे भांडण वाढायला वाव देणे ठरते.

७.शरीरसंबंध ठेऊन भांडण पूर्णपणे मिटत नाही

झालेला वाद आणि कटुता विसरण्यासाठी लगेचच शरीरसंबंध ठेवण्याने खरेच फायदा होत नाही. दोघांनी एकमेकांना ‘सॉरी’ म्हणून झाले आहे आणि तुमच्या जवळ येण्यासाठी तो पुढाकार घेत आहे तर तुम्हीहि यासाठी तयार असालच असे नाही. कोरडेपणाने जोडीदाराला टाळू नका तर कोमल आणि गोड शब्दांनी त्याचे मन जिंकून घ्या. हलकीशी मिठी मारून त्याचे चुंबन घेऊन सांगा,”तू परत माझ्या जवळ येतो आहेस तर मला छानच वाटत आहे पण मला थोडा वेळ हवा आहे.”

त्याला प्रेमाने हळुवार कुरवाळा,तो सर्व काही समजून घेईल.

८.प्रयत्नांचा अतिरेक टाळा

तुमच्यात भांडणे होत आहेत म्हणजे तुमचे नाते सुधारण्याची गरज आहे.भांडण आणि वाद ना मिटण्याने नाते अजून बिघडत जाते. तुमचा जोडीदार जेव्हा हात झटकून निघुन जातो तेव्हा समजून घ्या कि या क्षणी तरी प्रेम आणि रोमान्स च्या भावनांपासून तुमचा जोडीदार दार आहे. तुमच्या प्रयत्नांचा उपयोग होणार नाही असे जाणवले तर एका मर्यादेपर्यंतच प्रयत्न करा.

९.जिंकण्यासाठी भांडू नका

लग्न म्हणजे खेळ नव्हे ज्यात तुम्ही हरण्या किंवा जिकंण्यासाठी भांडण करता. दोष कुणाचा आहे हे ठरवत बसण्यापेक्षा वाद सोडवण्यावर भर द्या.

१०. खोटे बोलणे टाळा

 स्वतःला आणि स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी खोटे बोलण्याचा फारसा उपयोग होत नसतो. खोटे बोलून तुमचे आनंदी सहजीवन संकटात टाकणे आणि गैरसमजांना निमंत्रण देणे ठरते. पतीसोबतचे नाते खरेपणाने निभवा.

Leave a Reply

%d bloggers like this: