अश्याप्रकारे तुमच्या आई-वडिलांशी तुमच्या पतीचे नाते निर्माण करा.

   

आई -वडिलांचा आदर करणारी जोडपी आनंदी सहजीवन जगत असतात.  जेव्हा या नात्यात दुरावा येतो. फक्त पत्नीलाच स्वतःच्या सासू-सासऱ्यांबद्दल तक्रारी असतात असे नव्हे तर पतिलाही या अवस्थेतून जावे लागते. या मागचे कारण अगदी क्षुल्लक  किंवा काही गंभीर, पती आणि आई-वडिलांच्या या वादात तुम्हीच भरडल्या जाता.  

तुमचे पालक आणि पती यांच्यातील दुराव्याची  ही ४ कारणे  आणि त्यावर काय उपाय कराल.  

१) अहंकाराचा  संघर्ष

अहंकार आणि गर्व यामुळे तुमचे मित्र ही दुरावतात. तुमच्या पती आणि आई -वडिलांमध्येही ही  समस्या असू शकते. एखाद्या छोट्याश्या, हलक्या-फुलक्या संभाषणाचे रूपांतर कदाचित अश्या मोठ्या वादात झाले असेल ज्यामुळे त्यांचातील चांगले संबंध बिघडले असतील. कधी कधी हा दुरावा लवकर मिटत नाही. पती आणि तुमच्या आई-वडिलांचे एकमेकांशी बोलणे बंद होते.  

यावर कसा मार्ग काढाल : परिस्थिती विचित्र असली तरी पूर्णपणे हाताबाहेर गेलेली नाही. तुमचे पती आणि आई-वडील दोघांशी बोला. ते दोघेही तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत आणि अगोदर सर्वानी एकत्र एक कुटुंब म्हणून कशी खूप मजा केलेली आहे याची त्यांना आठवण करून द्या. तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीशिवाय त्या दोघांचे बोलून घडवून आणा आणि वाद मिटवायला सांगा.  

२)  आई-वडिलांना तुमचे पती तुमच्यासाठी ‘फारसे योग्य’ वाटत नाहीत

आई-वडिलांसाठी स्वतःची मुलगी सर्वांत लाडकी असते आणि तिच्या साठी सर्वोत्तम पती मिळावा हे त्यांचे स्वप्न असते. त्यांची पसंती नसणारा आणि त्यांच्या अपेक्षा पेक्षा कमी असणारा मुलाची निवड मुलीने केली आहे हे बघून पालकांचे मन दुखावते. तुमचे पती कदाचित चांगले असतील पण तुमच्या आई-बाबाचे मन ते जिंकू शकत नाहीत ते याच कारणामुळे. जस जसे दिवस जातात हा दुरावा आणि कटुता वाढतच जाते.

२.    यावर कसा मार्ग काढाल : मुलीलाच या संकटाचे उत्तर शोधावे लागते.नवऱ्याचे चांगले गुण आणि तुमचे वैवाहिक आयुष्य सुखात आहेत हे  आई-वडिलांच्या लक्षात आणून द्या. पती आणि आई-वडिलांमध्ये संवाद वाढेल यासाठी प्रयत्न्न करा. तुम्हाला ही खूप दमवणारी गोष्ट आहे पण आशा सोडू नका. आज ना उद्या तुमचे म्हणणे तुमच्या पालकांना नक्की पटेल.

३) आजी-आजोबांचे प्रेम आणि माया

एकदा आजी-आजोबा झाल्यानंतर तुमचे पालक तुमच्या पेक्षा जास्त तुमच्या मुलांवर प्रेम करायला लागतात.त्यांना आलेले अनुभव तुमच्या कामी येतात कारण तुमच्या पिलांचे योग्य संगोपन कसे करावे हे तेच तर तुम्हाला समजावतात. तुम्ही आणि पतिने, शिस्त लावण्यासाठी  मुलांवर ओरडणे आणि आधुनिक पालकत्वाच्या पद्धती त्यांना आवडत नसतील. तुमच्या पालकाची हि ढवळाढवळ आणि मुलांवर मालकी गाजवणे हे तुमच्या पती आणि पालकांमधील वादाची ठिणगी पडण्याचे निमित्त ठरू शकते. जर वेळीच या समस्येला आवरले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

३.    यावर मार्ग कसा काढाल : तुमचे पती आणि पालक दोघेही बरोबर असतील किंवा चूक पण याची जाणीव त्या दोघीना ही  असायला हवी. आधुनिक पालकत्वाचे फायदे तुमच्या आई-बाबाना समजावून सांगा. त्याच बरोबर,त्यांच्या मतांचा ही आदर करा. तुमचे पालक करतात त्या सर्वच गोष्टी चुकीच्या नसतात हे पतीच्या लक्षात आणून द्या. पती आणि तुमचे आई-बाबा या दोघांच्या मतांचा आदर करून मुलांच्या बालपणाचा आनंद घ्या.

४) मर्यादा आखून ठेवा

जेव्हा एक मुलगी कुणाची पत्नी बनते तेव्हा आई-वडील आणि पती याच्या सोबतच्या नात्याचा तोल कसा सांभाळला जातो यावर खूप काही अवलंबून असते. प्रत्येक जोडप्यात भांडणे आणि वाद होतातच. अशा क्षुल्लक वादापासून तुमच्या पालकांना दूरच ठेवा. रागाच्या भरात तुमचे पालक पतीबद्दल वाईट बोलू शकतात. पतीसोबतची भांडणे कोणत्या मर्यादेपर्यंत पालकांना सांगायची याची मर्यादा आखून घ्या. तुमच्या या छोट्याशा मुर्खपणामुळे पती आणि पालकाचे नाते कायमचे बिघडू शकते हे लक्षात घ्या.

४.  यावर मार्ग कसा काढाल

तुम्ही निर्माण केलेला हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता.महत्वाच्या तेवढ्याच गोष्टींची चर्चा करा याने त्यांच्या तीळ नाते घट्ट बनेल. बोलण्याअगोदर विचार करा. संवाद निर्माण करा विसंवाद नव्हे !!

Leave a Reply

%d bloggers like this: