अश्या प्रकारे तुमच्या मुलांच्या कलागुणांना वाव द्या.

प्रत्येकाला आपले मुल हुशार सर्जनशील म्हणजेच क्रिएटिव्ह असावं असं वाटत असते,पण या सगळ्या गोष्टी मुलं बघून-बघूनच शिकत असतं आणि त्यामुळे त्याच्या अंगीभूत कलागुणांना वाव मिळतो. मुलांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि खुश ठेवण्यासाठी तसे वातावरण निर्माण करणे हे पालकांचे काम असते. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी पुढील गोष्टी करणे आवश्यक असते

१. त्यांना घरात कलाकुसर दाखवण्याची संधी द्या. 

मुलांना घरात भिंतीवर त्यांची कलाकुसर दाखवण्यास परवानगी देणे हे तसे सोपे नाही. परंतु संशोधनाने असे दिसून आले आहे की ज्या मुलांनी लहान वयात भिंती रंगवल्या आहेत किंवा भितींवर आपली कलाकुसर दाखवली असले अश्या मुलांनी कलाक्षेत्रात सर्जनशील कार्य करून दाखवले आहे. थोड्या भिंती खराब होतील किंवा तुम्ही त्यासाठी भिंतीवर चिटकवायचे मिळणारे फळे चिटकवू शकता. त्यामुळे भिंती खराब होणार नाही आणि तुमच्या मुलांच्या कलागुणांना वाव देखील मिळेल.

२.  त्यांच्यावर सतत बॉसिंग करणे टाळा

मुलांना सतत हेच करा तेच कर असे सतत सांगत राहणे चुकीचे आहे  अश्यामुळे त्यांना तुमच्या बोलण्याचे सतत दडपण येते. आणि अश्या दडपणामुळे ते त्यांना स्वतःच्या सर्जनशीलतेला (क्रिएटिव्हिटी ला )वाव देता येत नाही. ते सतत दडपणाखाली वावरतात आणि तुम्ही म्हणाल तश्याच पद्धतीने  गोष्टी करायचा प्रयन्त करतील. 

३. त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या गोष्टी द्या 

आपण आपल्या मुलांसाठी बऱ्याच गोष्टी विकत घेतो गोष्टी खरेदी करता आणि ते त्यांचा वापर देखील करत नाहीत तर त्याऐवजी त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच गोष्टी त्यांना द्या, त्यांना अश्या गोष्टी द्या ज्या मुलाच्या सृजनशील विकासातच वापरता येतील. त्यांना बाहुल्या किंवा शोभेची खेळणी देण्यापेक्षा त्यानं विविध रंगाचे खडू विविध रंगाची माती किंवा ठोकळ्यांची खेळणी किंवा अशी खेळणी द्या ज्यामुळे त्यांचा कलागुणांना वाव मिळेल

४.त्यांना प्रोहत्सान द्या

तुमचे मुल एखाद्या कलेत किंवा खेळात रस घेत आहे हे लक्षात आल्यावर त्याला त्या गोष्टीसाठी प्रहोत्सन द्या, त्यांना त्याविषयक पुस्तकांचे वाचन करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करा, त्यांना रस असलेल्या कलेमध्ये कोणती शैली आवडते ते जाणून घ्या. आणि त्यांना विविध कला आणि उपक्रमात भाग घेण्यास मदत करा. यामुळे त्यांना फक्त प्रोहत्सान मिळत नाही तर त्यांना त्यांच्यात लपलेले कौशल्य बाहेर आणण्यासाठी देखील मदत करेल .

५. त्यांना त्यांची मते मांडू द्या.

कुठल्याही प्रकाराच्या विकासातील सर्वात पहिला टप्पा म्हणजे त्या दिशेने जात असलेली विचार प्रक्रिया. जर आपण मुलाला काय करावे आणि काय नाही हे सतत सांगत राहिल्यास त्याची स्वतःची मते तयार होणार नाही आणि ते स्वतःचे तर्क वापरू शकणार नाहीत. त्यांना नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करू द्या. लांबून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. त्यांची काही म्हणणे तुम्हांला पटणार देखील नाहीत पण त्यांना त्यांचा मनाप्रमाणे करण्याची संधी द्या. त्यांचे चुकत असेल तर त्यानं त्याचे दुष्परिणाम सांगा आणि ते भोगायची तयारी आहे का ? हे विचारा त्यांना कोणत्याही गोष्टीला एकदम कारण न देता नाही म्हणू नका किंवा त्यांच्या मतांना थेट विरोध दर्शवू नका याच नाकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 

सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी)आपण विकत घेऊ शकत नाही. ती शिकावी लागते आणि विकसित करावी लागते तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे वातावरण दिल्यावर बघा ते चकित करणाऱ्या कलाकृती निर्माण करतील 

Leave a Reply

%d bloggers like this: