तुम्ही रोजच्या दिनक्रमांत या ५ चुका करत नाही ना ?

आई झाल्यावर काही स्त्रियांचे स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला सुरवात होते. तसेच इतर स्त्रियां देखील रोजच्या धावपळीच्या रोजच्या दिनक्रमात काही चुका करतात त्यामुळे तुम्हांला भविष्यात इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. रोजच्या दिनक्रमातील काही गोष्टी पुढे-मागे होणे साहजिक आहे, परंतु पुढील ५ चुका करणे टाळावे ज्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

१.उशिरा उठणे

उशिरा उठलात तर ते आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक असते तसेच त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस गडबडीत आणि धावपळीत जाईल आई झाल्यावर रात्री निवांत झोप होऊन सकाळी लवकर उठण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे. आणि नवमातांना देखील ही गोष्ट पटण्यासारखी नाही परंतु जर तुम्ही तुमचा दिवस लवकर सुरु केलेत तर तुम्हांला स्वतःला द्यायला वेळ मिळेल. तुमचं बाळ उठायच्या आधी उठलात त्याची पुढील तयारी करण्यास वेळ मिळेल त्यामुळे तुमचा दिवस कमी धावपळीचा आणि गडबडीत जाईल.

२. पुरेसे पाणी न पिणे

पुरेसा पाणी न पिण्यामुळे त्याचे परिणाम तुमच्या पूर्ण शरीरावर होतात. तसेच मूत्रविषयक समस्या निर्माण होऊ शकतात तसेच जर तुम्ही नवमात असाल तर बाळावर देखील त्याचे परिणाम होतात. बाळाला देखील योग्य प्रमाणात पाण्याचे मिळत नाही. स्तनपानाचे दूध देखील घट्ट येणाची शक्यता असते.

३. नाश्ता न करणे

बऱ्याच वेळा नवमात आणि इतर स्त्रियादेखील सकाळच्या गडबडीत सकाळचा नाश्ता करत नाही. सकाळचा नाश्ता म्हणजे न्याहारी यांच्याकडे अजून देखील एक अनावश्यक जेवण म्हणून नाश्ता पाहतात आणि सकाळी पोषक आहार न घेता त्यांच्या दिवसाची सुरवात करतात किंवा आपल्याकडे फक्त एक कप चहा किंवा कॉफी घेण्याची सवय आहे. आणि चहा आणि कॉफि हे काही पौष्टिक नाश्ता नाही.त्यामुळे दिवस सुरू करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली ऊर्जा आपल्याला मिळावी यासाठीसकाळी पुरेसा नाश्ता करणे आवश्यक आहे त्यामुळे योग्य कार्बोहायड्रेट्स किंवा प्रथिनं युक्त नाश्ता घ्यावा

४. व्यायाम न करणे

शाररिक हालचालीने दिवसाची सुरवात केल्यामुळे तुमच्या तुमच्या शरीरातील रक्तभिसरण योग्य प्रकारे होते. त्यामुळे जर दिवसाची सुरवात जरा काही साध्या शाररिक हालचाली यांनी केली तर तुम्ही पूर्ण दिवसभर ताजेतवाने आणि प्रसन्न राहू शकता आणि त्यामुळे तुम्हांला दिवसभरातील धावपळीचा तणाव जाणवणार नाही. त्यामुळे रोजच्या दिनक्रमात हलका व्यायाम आणि शाररिक हालचाली आवश्यक असतात. नाव मतानं व्यायाम आणि शाररिक हालचाली डॉक्ट्रांच्या सल्ल्याने कराव्यात.

५. त्वचेतील ओलाव्याचे संतुलन न राखणे 

शरीरातील ओलावा सतत कमी होत असतो. आणि त्याचे संतुलन न राखल्यास त्वचा रुक्ष आणि निस्तेज होण्याची शक्यता असते. आपण दररोज रात्री झोपायला जाताना त्वचेतील ओलावा कमी होतो असे घडते. त्यामुळे रात्री झोपताना स्वतःला मॉश्चराइझ करणे आवश्यक असते रात्री झोपताना तुमच्या त्वचेला सूट होईल अश्या मॉश्चराइजर ने किंवा तुपाने त्वचेतील ओलाव्याचे संतुलन ठेवणं आवश्यक असते त्यामुळे आपली त्वचा कायम तुकतुकीत आणि तरुण राहते.

तुम्हांला तुमचे आरोग्य तसेच तुमची कार्यक्षमता वाढवायची असल्यास तुम्हांला वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे 

Leave a Reply

%d bloggers like this: