एपिड्यूरल आणि स्पायनल ऍनेस्थेशिया म्हणजे काय ?

प्रत्येकाला माहित आहे की बाळाला जन्म देणे हे अत्यंत वेदनादायक असते . त्याच वेळी, काही अश्या नशीबवान महिला आहेत ज्या या वेदनाशिवाय मुलाला जन्म देतात. त्यांना फक्त मासिक पाळीसारख्याच वेदनांचा अनुभव येतो . जेव्हा वेदना खूप जास्त असतात आणि स्त्रीच्या सहनशीलतेच्या पलीकडे जातात त्यावेळी डॉक्टर वेदनांवर उपाय देऊ करतात

      जर परिस्थिती गंभीर असेल तर ते सामान्य भूल (general anaesthesia) थेट देत नाहीत कारण सामान्य भुलीमुळे बाळाला लागण्याची दाट शक्यता असते. जे प्रसूतीच्या वेळी हितकारक नसते . त्याऐवजी, ते एपिड्यूरल किंवा स्पायनल ऍनेस्थेसिया यापैकी एका प्रकारच्या भुलेची डॉक्टर निवड करतात.

एपिड्युरल अॅनेस्थेशिया आणि स्पाइनल अॅनेस्थेशिया हे भुलीचे दोन वेग वेगळे प्रकार आहेत

एपिड्युरल अॅनेस्थेशिया

एपिड्युरल अॅनेस्थेशिया देताना पाठीचा मणका आणि स्पाइनल द्रवपदार्था यांच्या मध्ये भुलीचे इंजेक्शन दिली जाते. हा भुलीचा प्रकार अमेरिकेत प्रसूतीच्या दरम्यान वेदना होत असताना वापरण्यात येतो. परंतु या प्रकारची भुलीचा परिणाम होण्यासाठी अधिक वेळ लागतो.

प्रथम, जेथे इंजेक्शन द्याचे आहे तो भाग बधिर करतात आणि नंतर ते नंतर सुईद्वारे कॅथेटर घालून कॅथेटरमधून ऍनेस्थेटिक इंजेक्शन देतात. जर अधिक औषधे देण्याची आवश्यक असेल तर ते कॅथेटर पाठीवर तसेच ठेवले जाते.

स्पाइनल ऍनेस्थेशिया

यामध्ये स्पाइनल द्रवपदार्थात थेट इंजेक्शन दिले जाते. एपिड्यूरल ऍनेस्थेशिया सारखी याला कॅथेटरची आवश्यकता नसते. या प्रकारची भुल देताना ज्या ठिकाणी भुलेचे इंजेक्शन द्यायचे आहे तो भाग लोकल ऍनेस्थेशिया (भुल) देऊन बधिर करतात,

स्पाइनल ऍनेस्थेशिया हा एपिड्यूरल ऍनेस्थेशियापेक्षा जास्त प्रभावी असतो. यामध्ये तुम्हांला काहीच जाणवत नाही . म्हणजे भुल उतारे पर्यंत तुम्हांला पायाच्या भागातले भागातील काहीच जाणवत नाही.

एपिड्यूरल ऍनेस्थेशिया मध्ये तुम्हांला मासिकपाळी दरम्यान जाणवणाऱ्या वेदनांसारख्या वेदना जाणवतील परंतु स्पाइनल ऍनेस्थेशिया मध्ये कमरेखालच्या भाग पूर्णतः बधिर होतो. त्यामुळे तुम्हांला कोणत्याच वेदना जाणवत नाही.

CSE (combined spinal-epidural)

सध्या आजकाल स्पाइनल ऍनेस्थेशिया आणि एपिड्यूरल ऍनेस्थेशिया या दोनच भुलीचा मिळून एक संयुक्त CSE (combined spinal-epidural) हा प्रकार वापरण्याची पद्धत फार लोकप्रिय होत आहे. यामुळे भूल जास्त प्रभावी होते आणि जास्त प्रमाणात स्पाइनल ऍनेस्थेशियाचा वापर करण्याची गरज लागत नाही. हे सगळे प्रकार प्रसूती वेदना कमी करून प्रसूती सुखकर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे

CSE (combined spinal-epidural) हा प्रकार सी-सेक्शन प्रकारची प्रसूती करताना वापरण्यात येतो . त्यामुळे आईला काहीच वेदना जाणवत नाही. एपिड्यूरल ऍनेस्थेशिया हा प्रकार साधारणतः नॉर्मल म्हणजेच योनिमार्गाद्वारे होणाऱ्या प्रसूतीसाठी वापरण्यात येते. या प्रकारात आईला काही प्रमाणात प्रसूती वेदना जाणवतात आणि ती त्या दरम्यान हालचाल करू शकत असते.ऍनेस्थेशिया एपिड्यूरल ऍनेस्थेशिया सी सेक्शनसाठी देखील वापरण्यात येतो.

कोणत्या भुलीचा प्रकार कधी वापरायचा कसा वापरायचा याचा निर्णय त्यावेळची परिस्थितीचा अंदाज घेऊन स्त्रीच्या वेदना सहन करण्याच्या क्षमतेचा अंदाज घेऊन डॉक्टर निर्णय योग्य तो घेतात. हे प्रसूतीच्या आधी ठरवणे कठीण असते 

 

Leave a Reply

%d bloggers like this: