काही लहान मुलांना दूध का पचत नाही….

दूध हा बाळाच्या आहारातील महत्वपूर्ण भागांपैकी एक आहे. ह्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. जी बाळांना विकासासाठी आवश्यक असतात पण काही बाळांना दूध पचवण्यास असमर्थ असतात किंवा दुधातील लॅक्टोज हा घटक पचवणे अवघड जाते अश्या स्थितीला लॅक्टोज इंटॉलरन्स असे म्हणता . तर हे लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे नक्की काय हे पुढील माहितीच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करू .

लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय ?

लॅक्टोज म्हणजे दुधात नैसर्गिकरित्या आढळणारी प्राथमिक साखर. लॅक्टोज मातेचे दूध फॉम्र्युला दूध किंवा प्राण्यांचे दूध)आणि इतर डेअरी उत्पदनामध्ये आढळून येते. लॅक्टोज हे लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या कर्बोदकांचा महत्वाचे स्त्रोत आहे. पण त्यास पचविण्यासाठी आणि त्याचा शरीरासाठी वापर करण्याकरता शरीरात,लॅक्टेस नावाचे पाचक द्रव्य निर्माण होणे आवश्यक असते. आणि हा द्रव तयार करून स्त्रवण्यास ज्यावेळी बाळाचे शरीर असमर्थ ठरते त्यावेळी लॅक्टोज इंटॉलरन्स निर्माण होतो

लॅक्टोज इंटॉलरन्स ही गायच्या दुधातील प्रथिनेयुक्त एलर्जीसारखेच नसते

लॅक्टोज इंटॉलरन्स आणि गाईच्या / प्राण्याच्या दुधाची ऍलर्जीं फरक

लॅक्टोज इंटॉलरन्स आणि गाईच्या दुधाची ऍलर्जीं यांची काही लक्षणे ही सारखीच असली तरी हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत.त्याची करणे देखील वेगळी आहेत.

लॅक्टोज इंटॉलरन्स हे लॅक्टोज पचवू न शकल्यामुळे निर्माण होणारी समस्या आहे. या समस्येचा संबंध प्रतिकारक शक्तीशी येत नाही त्यामुळे ही कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीं मुळे निर्माण झालेली समस्या नाही गाईच्या किनगाव प्राण्यांचा म्हणजे म्हैस बकरी यांसारख्या प्राण्यांच्या दुधामुळे निर्माण होणारी ऍलर्जीं ही अन्नपदार्थ ऍलर्जीं मध्ये येते. जी यादुधात असलेल्या काही घटकांमुळे होते. त्वचेवर पुरळ येणे, हात- पाय चेहरा ओठ सुजणे, घशाला सूज येणे. श्वास घेण्यास त्रास होणे अश्या प्रकारची लक्षणे गाईच्या आणि इतर प्राण्याच्या दुधाने ऍलर्जीं झाल्यावर दिसून येतात

लॅक्टोज इंटॉलरन्सची करणे :

१.प्राथमिक कारण :

हे दुग्धजन्य पदार्थाचे सेवन कमी झाल्यास होते. हे सामान्यतः प्रौढांमध्ये आढळते.

2.द्वितीय कारण :

आतड्यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्यामुळे तात्पुरता लॅक्टोज इंटॉलरन्स निर्माण होण्याची शक्यता असते

३. जन्मजात कारण

आनुवांशिक कारण जेथे बाळांच्या शरीरात जन्मजात किंवा कमी प्रमाणात किंवा लॅक्टेस असते. हे कारण फार दुर्मिळ आहे

अपुऱ्या दिवसांच्याजन्मलेल्या बाळामध्ये देखील लॅक्टोज इंटॉलरन्स होऊ शकते. करंज त्यांच्या आतडी लॅक्टस तयार करण्यासाठी पुरेसे विकसित झालेले नसतात. तथापि, लहान मुले मोठी झाल्यावर सामान्यतः ही स्थिती सुधारते होते

लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणे

काही बाळांमध्ये आणि प्रौढांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्सची काही लक्षणे आढळून येत नाही ते काही त्रासाशिवाय दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करतात. परंतु काही बाळांना आणि प्रौढांना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे अस्वस्थता जाणवू लागते. तर काही बाळांमध्ये आणि प्रौढांमध्ये पुढील लक्षणे अढळतात ·अतिसार, जुलाब

· पोटात /ओटीपोटात दुखणे

·पोट फुगणे

· मोठ्या प्रमाणात गॅसेस होणे

लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणे इतर पोट दुखीचा लक्षणांसारख्या असू शकतात त्यामुळे ते ओळखणे कठिण होऊ शकते.

उपचार आणि काळजी

लॅक्टोज इंटॉलरन्ससाठी विशेष अशी कोणती उपचार पद्धती नाही. पण जर बाळ स्तनपान करणारे असले तर त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने लॅक्टेसचे काही थेंब आईच्या दुधात मिसळून तुम्ही बाळाला देऊ शकता ज्यामुळे बाळाल लॅक्टोज पचवण्यास मदत होईल. व त्यानंतर तुम्ही बाळाला स्तनपान देऊ शकता. परंतु हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे .

पदार्थतील घटकांची माहिती करून घ्या.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा इतर बाहेरचे काही पदार्थ जसे केक,कुकीज किंवा काही बिस्किटे ज्यामध्ये लॅक्टोजचे प्रमाण आढळण्याची शक्यता असते अश्या पदार्थतील घटक मुलांना देण्यापूर्वीं माहिती करून घ्या

योग्य प्रमाणातील लॅक्टोज

काही बाळांमध्ये थोड्याप्रमाणात लॅक्टोज पचविण्याची क्षमता असते त्यामुळे अश्या बाळांना योग्य प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ देण्यास हरकत नाही

लॅक्टोजविरहित पदार्थ खरेदी करा

आजकाल लॅक्टोज विरहित पदार्थ मिळतात ते मुलांसाठी खरेदी करा त्यामध्ये नेहमीच्या दुग्धजन्य पदार्थमध्ये आढळणारे पोषक घटक अढळतात फक्त ते लॅक्टोज विरहित असते 

Leave a Reply

%d bloggers like this: