गरोदरपणाच्या कंबर दुखण्यावर बेली बेल्ट वापरू शकता

बेली बेल्ट गरोदर असताना कंबरेचा खालचा भाग आणि पोटाला अतिरिक्त आधार देण्यासाठी उपयोग करत असतात. काही मातांना खूप त्रास होत असतो. गरोदरपणात काही मातांना खूप त्रास होत असेल तर तुम्ही ह्या बेली बेल्टचा वापर करू शकता.

कंबरेचे दुखणे कमी करते


ज्यावेळी तुम्ही गरोदर असतात. त्यावेळी दुसऱ्या त्रैमासिकानंतर तुम्ही हळूहळू चालायला लागतात कारण शरीराच्या पुढच्या भागात खूप वजन पडायला लागते. त्यामुळे कंबरेवरती व खालच्या भागात, स्नायू, आणि लिगामेंट्स वरती दबाव पडतो. कधी कधी पोटावर आणि नितंबावरही खूप दबाव पडत असतो. आणि हे दुसऱ्या त्रैमासिकात होत असते. ह्यात जर तुम्हाला हा त्रास सहन होत नसेल तर तुम्ही ह्या बेल्टचा वापर करू शकता.


२) पेल्विकच्या आसपास (SIJ – sacroiliac joint) नावाचा त्रास होत असतो. आणि हे गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदल आणि शारीरिक हालचालीत स्थिरता होण्यासाठी होत असते. हे शरीराच्या खालच्या भागात होणारे (shock absorption) साठीही ओळखले जाते. कारण गरोदरपणात हार्मोनल बदल व गर्भाचे वजन ह्यामुळे पेल्विक भाग दुखत असतो.

३) आवश्यक आधार


बेली बेल्ट तुमच्या पोटावर स्पोर्ट्स ब्रा सारखा बसतो. सौम्य दबावासोबत बेली बेल्ट तुमच्या गर्भाशयाला आधार देऊन दिवसभर जो त्रास होत असतो त्याला कमी करत असतो. पण लक्षात घ्या बेल्ट खूप ताणून घालू नका. कारण त्यामुळे नसांवर ताण पडू शकतो. आणि अपचनही होऊ शकतो.

४) व्यायाम


गरोदरपणात व्यायाम करणे खूप फायदेशीर असते. पण गर्भामुळे करता येत नाही तेव्हा जर तुमची व्यायाम करण्याची इच्छा असेल तर हा बेली बेल्ट घालून करू शकता. ह्यामुळे ताण पडत नाही. पण हा बेल्ट घालूनही हळूहळूच व्यायाम करावा. काही शारीरिक हालचाली नक्कीच करू शकता. तुम्हाला प्रसूतीवेळी ह्याचा फायदा होईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: