घरात बाळ आल्यावर हे आनंददायी बदल घडतात

लग्नानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारबरोबर आनंदी वैवाहिक आयुष्य जगत असताना, एक दिवस तुमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची चाहूल लागते. ते म्हणजे तुमचं बाळ जे तुमचं आयुष्य पूर्णत्वास नेतं आणि अधिक आनंदी बनवतं.

बाळाचा जन्म तुमच्या पती बरोबर नातं अधिक मजबूत करतं आणि ते कसं हे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

१) एक जोडपं ते एक परिपूर्ण कुटुंब

काही दिवसापूर्वी तुम्ही आणि तुमचे पती एक जोडपं होता, पण तुमचं बाळ त्याला कुटुंबामध्ये रुपांतरीत करतं. पालकत्वाच्या भावनेने तुम्ही दोघं अधिक जवळ येता. आणि बाळ तुम्हाला एका धाग्यात जोडून ठेवणारा दुवा बनतो.

२) नवऱ्याला मुलाशी खेळताना बघून तुम्ही पुन्हा त्यांचा प्रेमात पडता

ज्यावेळी नवरा बाळाशी खेळतो, तुम्ही कामात असता त्यावेळी कधीच न मदत करणारा तुमचा नवरा बाळ आल्यावर मदत करायला लागतो. एकदम तुमचीही खूप काळजी घ्यायला लागतो. रात्री बाळ रडत असेल तर तोही उठून बाळ झोपत तोपर्यंत जागा असतो. बाळाला खेळवताना बघून तुम्ही नवऱ्यावर खूप हसता. हे सर्व क्षण तुमच्यासाठी आयुष्यभर पुरणारी शिदोरी ठरते.

३) बाळ तुमच्यासाठी हसण्याचे कारण ठरते

लहान बाळ तुमच्या घराचे वातावरण बदलून त्याला आनंद आणि हास्याने भरून टाकते. त्याच्या छोट्याश्या हालचाली, त्याचं हसणं, त्याचं रडणं, तुमचे नाव उच्चारण्याचे चाललेले त्याचे प्रयत्न, या सर्व गोष्टी तुमचं घर आणि तुमचं आयुष्य उजळून टाकतात. त्याचे तुमच्या जीवनात असणे तुमच्या हास्याला आणि तुमच्या उत्साही राहण्याला कारणीभूत ठरते.

४) एकटे असताना देखील आनंदात असता

बाळाच्या जन्माआधी नवरा गेल्यावर सर्व घर खायला उठते पण बाळ आल्यानंतर तुमचा वेळ कसा जातो हे तुम्हाला कळतही सुद्धा नाही. बाळ आल्यावर तुम्हाला कधीच एकटेपणा वाटत नाही. तुम्हाला टी.व्ही, मोबाईल काहीच लागत नाही.

५) बाळ तणाव कमी करण्यास मदत करते

असं म्हणतात की वैवाहिक जीवनातील तणावास लहान बाळ कारणीभूत असते. झोपेची कमतरता आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या दोघांमध्ये तणाव निर्माण करतात. पण दिवस कितीही मोठा असला आणि तुम्ही कितीही थकलेले असलात, ज्या क्षणी तुमचे बाळ तुमच्याकडे धावत येते किंवा तुम्हाला हाक मारते तेव्हा तुम्हाला सर्व ताण तणाव विसरून शक्य तितक्या मार्गांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याची इच्छा निर्माण होते. त्यांचाशी खेळणे हे तुमच्यासाठी ताण कमी करण्याचे साधन आहे. तीच गोष्ट नवरा कामावरून आल्यावर खूप थकून जातो पण बाळाला बघताच सर्व थकवा निघून जातो.

६) एकमेकांना वेळ देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संघर्ष करता

बाळ जन्माला येण्याआधी, एकमेकांसाठी वेळ काढणे ही सोपी गोष्ट होती. पण आता, जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासोबत दिवसभर व्यस्त असता, तुमचे पती तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुम्हाला भेटवस्तू आणि आश्चर्याचे धक्के देतात. या सर्व गोष्टी तुमच्या नात्याला मजबूत बनवतात आणि तुमच्यातील प्रेम आणखी वाढण्यास प्रोत्साहन देतात.

७) तुमच्या भविष्याचे नियोजन करणे आनंदाची भावना असते

एकत्र बसून तुमच्या जोडीदाराशी मुलाच्या प्राथमिक शाळेविषयी, खेळाविषयी आणि पाळणाघराच्या पद्धतीविषयी चर्चा करणे तुमच्या नात्याला बळकट करण्यास मदत करू शकते.

तुमचं बाळ तुमच्या जीवनाला फक्त एक चांगली दिशाच देत नाहीतर तुम्हा दोघांतील प्रेम सुद्धा वाढवते. 

म्हणून सख्यांनो, आई होण्यास घाबरू नका. एक नवीन सुरुवात तुमची वाट बघत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: