स्तनपान करूनही बाळाचे वजन का वाढत नाही ?

स्तनपान करूनही बाळाचे वजन वाढत नाही. अशी समस्या खूप मातांना असते आणि आम्हालाही खूप मातांनी विचारले होते की, स्तनपान करून बाळाचे वजन वाढत नाही. आणि बाकीचे पदार्थ बाळाला देता येत नाही. आणि स्तनपानही तितकेच महत्वाचे असते तेव्हा स्तनपान करताना काही गोष्टी चुकतात का ? त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी बाळासाठी महत्वाच्या आहेत. तेव्हा त्या जाणून घ्या.

१) तुमचे बाळ दूध पीत आहे की नाही ?


बऱ्याच वेळा असे होते की, बाळ स्तनपानात दूध पीतच नसते. कारण बाळ व्यवस्थित स्तन पकडत नाही. फक्त एकाच स्तनातून दूध पीत असतो. फक्त काही विशिष्ट्य वेळच दूध पिणे, किंवा हार्मोनल समस्येमुळे आईच्या स्तनातून दूध येत नसते. खूप कमी प्रमाणात दूध येत असते आणि त्यामुळे बाळाचे पोट भरत नसते. आणि बाळ बोलू शकत नाही म्हणून ह्या गोष्टी समजून घाव्या लागतात आणि ह्याच कारणाने बाळाचे स्तनपानातून पोट भरत नाही.

२) बाळाची प्रकृती बिघडलेली असणे


तान्हे बाळ असल्याने आणि त्याची रोगप्रतिकार शक्ती विकसित न झाल्याने बाळाला लगेच वातावरण बदलाचा परिणाम होऊन प्रकृती बिघडते आणि त्याला दूध पिणे खूप कठीण जाऊन त्याचे पोट भरत नाही. आणि काही वेळा ह्याचमुळे श्वास घ्यायला त्रास, हृदयाचा त्रास, नस दुखणे, दुधाची ऍलर्जी, रक्त कमी असणे, स्नायू दुखणे, काही वेळा लॅक्टोस अधिक प्रमाणात असल्यानेही बाळाचे वजन वाढत नाही. त्यामुळे बाळाला काही त्रास होतोय का बघून घेत चला. त्यावरून निदान कळेल.

३) बाळाला काही ना काही अडचण येतच असते.


बाळाचे वजन कमी राहिले तर त्यांना झोप खूप लागते. आणि ते व्यवस्थित स्तनपान करत नाही. आणि त्यांना आवडतही नाही. बऱ्याचदा ते स्तनपान करता – करताच झोपून जातात. आणि मातांच्या स्तनातही दूध कमी यायला लागते. ह्यावर तुम्ही फॉर्मुला मिल्क देऊ शकतात पण अगोदर पूर्ण तपासून घेऊन द्या.

४) बाळाचे वजन दर आठवड्याला तपासून घेत चला


बाळाचे वजन दर आठवड्याला मोजल्यामुळे आपल्याला त्याचे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतात. स्तनपानातून वजन वाढत नसेल तर सहा महिन्यानंतर बाळाला इतर पदार्थ तुम्ही देऊ शकता. ह्याबाबत काही ब्लॉग/ लेख अगोदर लिहले आहेत ते तुम्ही वाचू शकता. पण बाळाला स्तनपान करणे सोडू नका.

५) प्रयत्न करूनही . . .


बरीच प्रयत्न करूनही बाळाचे वजन वाढत नसेल तर लहान मुलांच्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्याकडून बाळाच्या प्रकृतीनुसार आहार लिहून घ्या. आणि त्याप्रमाणे किती वजन वाढेल असे वेळापत्रक तयार करून घ्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: