तुम्हांला DUTCH या तपासणी बद्दल माहिती आहे का ?

डीयूटीसीएच किंवा डच तपासणी म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. डीयूटीसीएच किंवा डच तपासणीस सध्या शब्दात आपण शरीरात असलेल्या संप्रेरकांच्या पातळी विषयी माहिती देणारी तपासणी म्हणू शकतो. त्याद्वारे आपण स्त्रीच्या त्यावेळच्या आरोग्यविषयक परिस्थिती जाणून घेऊ शकतो. तसेच संप्रेरकांची त्यावेळची पातळी स्त्रीच्या आरोग्यावर काय परिणाम करू शकते हे देखील या तपासणीद्वारे कळते

डीयूटीसीएच किंवा डच तपासणी

DUTCH म्हणजे ‘ ड्राय युरीन टोटल कम्प्लिट हार्मोन्स. तशी ही खूप सोप्पी तपासणी असते. जी आपल्या असंतुलित संप्रेरकांना (हार्मोन्स) ना कोणत्या उपचारांद्वारे संतुलित करता येईल हे निदर्शनास आणून देते

ही तपासणी कशी करतात


१.या तपासणी मध्ये रुग्णाला आपल्या लघवीचे ४ नमुने द्यावे लागतात. 

२.या तपासणीची रिपोर्ट हा तुम्हांला साधारण १४ तासानंतर मिळतो. 

३.लाळेपेक्षा लघवीच्या तपासणीमध्ये संप्रेरकाच्या पातळी विषयक सखोल माहिती मिळते

तपासणीत काय दर्शवते ?

जर तुमच्या शरीरात अचानक काही बदल घडले असती आणि त्याची कारणे जर तुम्हांला कळत नसतील त्यावेळी ही तपासणी तुम्हांला उपयुक्त ठरेल. तसेच संप्रेरकांच्या असंतुलनमुळे निर्माण झालेल्या समस्यांविषयी माहिती मिळेल आणि त्याद्वारे त्यावरील उपचार पद्धतीची माहिती मिळू शकते. तसेच स्त्रीच्या संपूर्ण आरोग्य विषयी संपूर्ण माहिती मिळू शकते.

तुम्हांला हे माहिती आहे का?

या तपासणीद्वारे तुम्हांला थायरॉड आहे की नाही याची माहिती मिळते

मी हि तपासणी का करावी?


१) तुमच्या संप्रेकांची योग्य पातळी जाणून घेण्यासाठी

२) तुम्हांला जर काही समस्या अचानक निर्माण झाल्या असतील तर त्याचे कारण जाणून घेण्यासाठी.

३) संप्रेरकांच्या असंतुलनामुळे निर्मण झालेल्या समस्यविषयक माहिती मिळवून त्यावर उपचार करण्यासाठी

४) तुमच्या आरोग्य विषयक संपूर्णात माहिती मिळवण्यासाठी

५) तसेच ही तपासणी इतर संप्रेरकीय समस्यविषयक तपासणीपेक्षा सोयीस्कर असते. 

Leave a Reply

%d bloggers like this: