(स्त्री-पुरुष संबंधानंतर) स्त्रीबीज आणि पुरुषाच्या शुक्राणूंचे मिलन झाल्यावर गर्भबीज ३ दिवस प्रवास करत गर्भाशयात रुजते,आणि गर्भधारणा होते. आणि ९ महिने गर्भाची टप्प्या-टप्प्याने वाढ होयला सुरवात होते. त्यातील पहिल्या त्रैमासिकात बाळाची वाढ कशी होते हे व्हिडिओच्या आधारे पाहणार आहोत
व्हिडीओ स्रोत -वेबएमडी
गर्भावस्थेचे ३ प्रमुख टप्पे मानण्यात येतात
१)पहिले त्रैमासिक १ते३ महिने
२) दुसरे त्रैमासिक ३ते ६ महिने
३) तिसरे त्रैमासिक ६ ते ९ महिने
१) पहिले त्रैमासिक
पहिल्या महिना
त्रैमासिकात गर्भधारणा झाल्याचे समजते मासिकपाळी बंद होते. कोरड्या उलट्या उमासे सुरु होतात. हे तीन महिने तसे नाजूक असतात. या ३ महिन्यात स्त्रीने जपणे गरजेचे असते. जड उचलणे, धावपळ करणे, शारीरिक आणि मानसिक ताण या गोष्टी टाळाव्या. तसेच आहार देखील सकस ठेवावा.
दुसरा महिना
या काळात गर्भ नाळेद्वारे आईशी जोडला जातो. त्यामुळे आईच्या आहाराद्वारे बाळाला पोषण मिळू लागते. या महिन्यात बाळाच्या हृदयाचा विकास होऊ लागतो त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.
तिसरा महिना
तिसऱ्या महिन्यात बाळाची हाडे आणि कान याचा विकास होऊ लागतो. याकाळात डोके हा शरीराचा सर्वात मोठा भाग असतो तसेच हिरड्या,स्वरयंत्र,पापण्यांच्या विकास सुरु होतो. बाळाच्या पापण्या ७व्या महिन्यापर्यंत बंद असतात
या त्रैमासिकात बाळाच्या सर्व मुख्य अवयवाच्या विकास होत असतो त्यामुळे याकाळात जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक असते