पोटात असताना बाळाला कोणत्या गोष्टीचा धोका असतो ?

काही स्त्रियांचे २० आठवड्यांच्या गरोदरपणानंतर गर्भ पडून जाते. ह्याला गर्भपात (मिसकॅरेज) म्हटले जाते. कमीतकमी ५० टक्के स्त्रियांना स्वतःच्या गर्भावस्थेत असताना गर्भपाताला सामोरे जावे लागते. आणि ८० टक्के गर्भपात हे गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्यातच होत असतात. गर्भपात न होण्याचा चान्स २० आठवड्यानंतर खूप कमी होऊन जातो. आणि त्यानंतरही होत असेल तर शक्यता खूपच कमी असते. त्याला लेट मिसकैरेज असे म्हणतात. कोणत्या गोष्टीचा बाळाला धोका असतो त्या गोष्टी ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.

१) गर्भपात होण्याची शक्यता :

१. खूप ब्लीडींग होणे


२. पोटात खूप वेदना होणे / पोट खूप दुखणे


३. खूप ताप येणे


४. तुमच्या पोटाच्या आसपासचे स्नायू खूप दुखणे आणि त्यात खूप वेदना होणे


५. अशक्तपणा


६. असह्य पाठ दुखी


जर तुम्हाला गरोदरपणाच्या सुरुवातीला ह्या गोष्टी तुमच्याबाबतीत होत असतील तर तुमच्या प्रसूतितज्ञाला भेटून घ्या. आणि सर्व तपासण्या करून घ्या. जेणेकरून कोणतेच रिस्क नको. ह्या गोष्टी नॉर्मलही होत असतात पण जर असह्य त्रास होत असेल तर तपासून घेतलेले बरे.

बरीच गर्भपात होण्याचे कारण बाळांमध्ये जेनेटिक मैल्फ़न्क्शन असणे. त्यात स्त्रीचा दोष नसतो. व आणखीही काही कारणे आहेत की, त्यामुळेही गर्भपात होऊन जातो.

२) इन्फेक्शन


३) त्या स्त्रीला डायबेटीस किंवा थायोराइड असणे


४) हार्मोनलमध्ये अति असंतुलन


५) इम्युनिटी खूप कमी असणे


६) ती स्त्री खूप तणावात असणे


७) कमकुवत गर्भाशय (यूरेट्स)


८) ह्या परिस्थितीत गर्भपात होण्याची शक्यता वाढून जाते

१. जर त्या आईचे वय ३५ पेक्षा जास्त आहे.

२. जर त्या आईला डायबिटीस किंवा थायोराइड आहे.

३. जर त्या आईचे ३ गर्भपात होऊन गेले असतील.

९) सार्विकल कमकुवत असणे


तुमची सर्व्हिस कमकुवत असल्याकारणाने तुमचे गर्भ बाळाला सांभाळू शकत नाही. म्हणून बऱ्याचदा दुसऱ्या त्रैमासिकात गर्भपात ह्या कारणाने होते. काही लक्षणे अशीही आढळून आली आहेत की,

१. गरोदर स्त्रीला तिच्या गर्भाशयाच्या खालच्या भागात खूप जड -जड वाटेल आणि त्यामुळे तुमच्या होत असलेल्या बाळाच्या शरीरासोबत जी अम्बिलिकल कॉर्ड आणि खूप रक्त तुमच्या योनीद्वारे पडायला लागते. ह्यामुळेही गर्भाला धक्का बसून गर्भपात होऊ शकतो.

ह्या कारणांनी गर्भपात होऊ शकतो म्हणून आधीच त्याची कारणे जाणून घ्या. आणि होणाऱ्या बाळाला वाचवा. आणि हा ब्लॉग इतर होणाऱ्या व असलेल्या मातांना पाठवून त्यांनाही मदत करा. 

Leave a Reply

%d bloggers like this: