मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काही टिप्स

प्रत्येक आई-वडिलांना हेच वाटत असतं की आपलं मुलं आत्मविश्वास असलेले खंबीर असे असावे. त्याच्यावर कोणतंही संकट आल्यावर त्या संकटाशी सामना करण्याची तयारी आपल्या मुलात असावी. लहान असताना मुलांवर केलेले संस्कार हे कायम त्याचा लक्षात राहतात म्हणून या काळात त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचं योग्य काळ असतो. त्यासाठी तुम्हांला खूप लवकर मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यास सुरुवात करावी लागेल. ३ ते ५ वर्ष वय असताना मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यास सुरवात करावी त्यासाठी काही टिप्स पुढील प्रमाणे

१. एक चांगले उदाहरण व्हा

तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक आदर्श म्हणून हे अतिशय महत्वाचे असता. मुले आपल्या आई-वडिलांचे अनुकरण करतात, तुमची लहानशी कृती त्यांच्या विकसनशील मनावर प्रभाव टाकत असते. उदा- तुम्ही तुमच्या सोयीसाठी खोटे बोलल्यास, तुमच्या मुलांना सोईनुसार खोटे बोलणे योग्य असते असे वाटेल. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या वर्तणुकीवर लक्ष द्या. अशी व्यक्ती बना जसं तुम्हाला तुमचं मुल व्हावे असे वाटते

२.मुलांना कोणतंही बिरुदे चिटकवू नका

मुलांना एखाद्या विशिष्ट बिरुद चिटकवू नका लाजाळूच आहे, खूपच भावनिक आहे, किंवा कठोर आहे विरुद्व चिटकवू नका. हे मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम करतात, जरी आपल्या मुलाचे/मुलीचे वागणे बोलणे आणि स्वभाव लाजाळू आणि भावनिक, घाबरणार असला तरी सतत त्याची जाणीव करून जेऊ नये. अश्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होईल. उदा- जर मुलं आत्मविश्वास वाढवून जर सामाजिक होण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही त्याला सतत लाजाळू , कमी आत्मविश्वास असलेले म्हणाल तर तो/ती अजून कोशात जातील आणि सामाजिक होणार नाहीत

३. तुमचं मुल अद्वितीय आहे हे समजून घ्या

बरेच पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांबरोबर करतात. त्यामुळे मुलाला कधीही आपण ‘चांगले’आहोत असे वाटत नाही. प्रत्येक मूल अद्वितीय असते आणि आपल्या मुलांमधील अद्वितीय गुण शोधून त्याना प्रोहत्सान देणे हे पालकांचे काम असते . प्रत्येक मुलाची बलस्थाने त्यांच्यातील दोष आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्या जाणून घेऊन त्याचे व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करणे आवश्यक असते .

४. मुलांचा छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या.

मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टी ऐकून घ्या, त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांना छोट्या-छोट्या- गोष्टींमध्ये उत्तजेन देण्याची गरज असते ते द्या. तुम्ही त्यांची गोष्ट ऐकून घेतल्यामुळे आहेत  त्यांना तुमच्या विषयी एक विश्वास निर्माण होतो आणि ते त्यांच्या सगळ्या समस्याबाबत तुमच्याशी न घाबरता चर्चा करतील.त्यामुळे  तुमच्यातील मोकळेपणा वाढेल आणि भविष्यात या गोष्टीचा त्यांना उपयोग होईल. 

५. इतर मुलांबरॊबर मिसळण्यास प्रोत्साहन द्या

समूहात खेळणे आणि आपल्या मुलाच्या वयातील इतर मुलांशी संवाद साधणे यामुळे मुलांची क्षितिजे विस्तारित होण्यास मदत होईल आणि त्यामुळे खरे-खोटे, चांगले-वाईट समजण्यास मुलांना मदत होईलमिळून-मिसळून राहण्याची सवय होईल तसेच इतरांना बरोबर राहून कसे एकत्र काम कारायचे याचे धडे मिळतील आणि त्यांना ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतील.

६. नियम महत्वाचे आहेत पण…

मुलांसाठी काही नियम निश्चित करा मुलं त्याचे पालन करतील याची खात्री करा. परंतु ते नियम पाळण्यासाठी अति कठोर होऊ . जर झोपायची वेळ रात्री ९ ठरली असेल आणि मुलांचा आवडीचा काही कार्यक्रम चालू आहे आणि ९ चे ९.३० किंवा १० वाजता असतील तर कधीतरी मुलांना थोडीशी मोकळीक द्यावी. मुलांना नियम मोडल्याचे काय परिणाम असतील हे त्यांना नीट सांगा आणि शिक्षा देखील अति कठोर आणि मुलांना शाररिक हानी होईल अश्या नसाव्या. सुरवातीला मुलांना प्रेमाने समजावून सांगा आणि जर ऐकले नाही तर शिक्षा द्या. यामुळे मुलाच्या मानत नियम आणि तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होणार नाही.तसेच नियम पाळण्याबाबत त्यांचा मनात नकारात्मकता येणार नाही. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: