योनीस्त्रावाचे प्रकार आणि त्याची कारणे

योनी स्त्राव म्हणजे गर्भाशयातील श्लेष्मा(म्युकस) आणि योनीतील द्रव यांचे मिश्रण म्हणजे योनीतील स्त्राव. योनिस्राव ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु काही विविध रंगांचे आणि प्रकारचे योनीस्त्राव हे शरीरातील विविध बदल आणि योनीबाबतच्या आजारांची लक्षणे दर्शवतात.कोणता योनीस्त्राव काय दर्शवतात हे जाणून घेऊ या

योनीस्त्रावाचे प्रकार

१. पांढऱ्या रंगाचा योनीस्त्राव

या रंगाचा योनीस्त्राव हा तसा सामान्य मानण्यात येतो. हा स्त्राव साधारण मासिकपाळीच्या आधी किंवा नंतर स्त्रवतो. परंतु जर तुम्हांला या दरम्यान कंड (खाज) जाणवली आणि स्त्रावचे स्वरूप जाडसर असेल तर हे इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. आणि जर हा स्त्राव स्वच्छ आणि चिकट असले तर हे ओव्यूलेशनचे लक्षण असते

२. तपकिरी (Brown) आणि रक्ताचा अंश असणारा योनीस्त्राव

जरा असा स्त्राव जर मासिकपाळीनंतर आढळला तर हे सामान्य आहे. त्यावेळी हा स्त्राव मासिकपाळी मुळे झालेला असतो. तसेच महिन्याच्या इतर काळात असे झाले आणि या दरम्यान जर तुम्ही समागम केला तर तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता जास्त असते. पण तसेच जर तुम्ही गरोदर असतानाच्या सुरवातीच्या काळात आणि असा स्त्राव होत असेल तरते गर्भपाताचे लक्षण असू शकते. असा स्त्राव जास्त प्रमाणात झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आवश्यक ठरते.

३.पिवळा किंवा पिवळसर रंगाचा योनीस्त्राव

साधारणतः या रंगाचा स्त्राव हा योनीच्या इन्फेक्शनचे लक्षण असते. आणि हा स्त्राव घट्टसर किंवा जाड आणि वाईट वास असणारा असेल तर हे योनीविषयक संक्रमण (इन्फेक्शन) आणि योनीविषयक आजाराचे लक्षण आहे.

४. हिरवा किंवा हिरवटसर योनीस्त्राव

या रंगाचा योनीस्त्राव हा नक्कीच योनीविषयक आजाराचे ठळक लक्षण असते. साधारणतः हा स्त्राव जाडसर आणि वाईट वासाचा असतो. बऱ्याचवेळा स्त्रियांना ज्यावेळी विविध जीवनसत्वाची औषधे( व्हिटॅमीन सप्लिमेंट) घेत असतात त्यावेळी त्यांना असा योनीस्त्राव होत असल्याचे स्त्रियांनी सांगितले आहे

योनीसंबंधित कोणती लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा ?

खालील लक्षणे दिसल्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांना त्वरित भेट द्या:

१) जर लघवी करताना जळ-जळ होत असले तर

२) जर योनीतून तीव्र वाईट वास आला तर

३) आपल्या स्त्रावच्या पोत मध्ये बदल आढळून आला तर

४) मासिकपाळीच्या काळात रक्तस्त्राव

५) सतत योनीमार्गत सुटणारी कंड (खाज)

ही माहिती इतर महिलांना देखील शेअर करा आणि त्यांना देखील आपल्या योनीसंदर्भातील आरोग्यविषयी माहिती द्या. 

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Reply

%d bloggers like this: